Dr Amit Pawarr

Dr Amit Pawarr about life, happiness & health.

स्वराज्य निर्माण करणारे,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराज शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचं शौर्य, कार्य, कर्तृत्व...
19/08/2023

स्वराज्य निर्माण करणारे,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराज शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचं शौर्य, कार्य, कर्तृत्व पराक्रम, विचार आणि राजकीय चातुर्य आजही, ५०० वर्षांनी सुद्धा जनमानसात मनामनात आहे....
स्वराज्याचा विचार आणि मुहूर्तमेढ शहाजीराजे भोसले यांनीच केली, या बापमाणसाने कृतिशील विचार दिला, आणि तो घरामध्ये रुजवला. स्वराज्याची संकल्पना सुरू झाली.. आपल्या स्वराज्यामध्ये सुद्धा बाप माणसाचे म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचे अनन्य साधारण महत्व आहेच आणि ते अधोरेखित होते..
प्रत्येक क्षेत्रामध्ये, कुटुंबा मध्ये
प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप माणूस असतोच, प्रत्येक यश किंवा उत्तुंग भरारी ही त्यामागे असणाऱ्या बापमाणसामुळेच असते, त्या बापमाणसाला sophisticated असा मेंटोर (mentor ) हा शब्द वापरला जातो,
पण आमच्यासाठी वजनदार शब्द म्हणजे बाप माणूसच..

हाच बापमाणूस,
प्रसिद्ध व्याख्याते आमचे मित्र मा. गणेश शिंदे यांनी अतिशय भावनिक मार्मिक पौराणिक आणि इतिहासातील असंख्य दाखले देऊन.. नगरकरांच्या मनात बाप माणूस अधोरेखित केला.

नगर बदलतंय टीमचे
आणि प्रसिद्ध व्याख्याते माननीय गणेश शिंदे यांचे आभार.....

_Dr. Amit Pawar

17/10/2022

एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही.

मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."

यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे.मला अंधार आणि उजेड सारखेच.मला या कंदिलाचा काय उपयोग…?

"हा कंदील तुझ्या साठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे.या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला. हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.

मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला. संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला, "अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? "

त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?"

हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"नाही लक्ष्यात आलं, पण आज एक गोष्ट मात्र कळली, उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही."

म्हणून "अत् दिप भव" म्हणजे "स्वयंप्रकाशित व्हा"...!

हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक गृहस्थ रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला व...
10/10/2022

हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक गृहस्थ रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, " तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?" तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." गृहस्थ म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो" थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील " गृहस्थ घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला. सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण .झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता. गृहस्थ माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “ साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली"

तात्पर्य:
जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो. आश्वासन देताना नक्कीच विचार करत जा. 🙏

" One may walk over the highest mountain one step at a time. "
09/10/2022

" One may walk over the highest mountain one step at a time. "

संयम आणि शांतता = यशप्राप्ती हे सूत्र शिवणारा अवलिया Happy Birthday Mahi....
07/07/2022

संयम आणि शांतता = यशप्राप्ती हे सूत्र शिवणारा अवलिया

Happy Birthday Mahi....

किती छान सुट्टीत ला गृहपाठ....पालकांसाठी सुट्टीतला गृहपाठ पालकहो, नमस्कार!! मागच्या अनेक महिन्यात आम्ही तुमच्या मुलांची ...
03/05/2022

किती छान सुट्टीत ला गृहपाठ....
पालकांसाठी सुट्टीतला गृहपाठ
पालकहो, नमस्कार!! मागच्या अनेक महिन्यात आम्ही तुमच्या मुलांची काळजी घेतली. सुट्ट्या लागल्या. आता तुमची मुले पूर्ण वेळ तुमच्यासोबत असतील. सुट्टीचा हा कालावधी फलदायी आणि आनंदमय जाण्यासाठी या काही टिप्स.
1. तुमच्या मुलांसोबत दिवसातील कमीत कमी 2 जेवणे घ्या. त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्व पटवून द्या आणि अन्न वाया न जाऊ देण्याची शिकवण द्या.
2. जेवणानंतर मुलांना त्यांचं ताट धुवू द्या. अशी कामे केल्याने मुले कोणतेही काम लहान दर्जाचे नसते हे शिकतात.
3. त्यांना तुम्हाला स्वयंपकात मदत करू द्या. त्यांना सॅलड वगैरे सारख्या सोप्या गोष्टी स्वतः बनवू द्या.
4. मुलांना 5 नवे इंग्रजी शब्द शिकवा आणि ते वहीत लिहून ठेवा.
5. तुमच्या 3 शेजाऱ्यांना मुलांसह भेट द्या आणि त्यांच्याशी छान मैत्री करा.
6. मुलांना आजी आजोबांची भेट घालून द्या आणि त्यांना एकमेकांसोबत मनसोक्त वेळ घालवू द्या. त्यांचे एकत्र फोटो काढा. त्यांचं प्रेम तुमच्या मुलांसाठी खूप महत्वपूर्ण आहे.
7. मुलांना तुमच्या कामाच्या ठिकाणी न्या. त्यांना हे कळू द्या की तुम्ही कुटुंब चालवण्यासाठी किती काम करता ते.
8. मुलांना घेऊन सण साजरे करा. त्यांना सणांचं महत्व सांगा.
9. मुलांना घेऊन जत्रा बघा.
10. मुलांना बागकाम शिकवा. लहान लहान कुंड्यांमध्ये स्वयंपक घरात लागणार्‍या भाज्या कशा उगवता येतील ते शिकवा. आपण पेरलेल्या बिया अंकुरित होताना पाहून त्यांना आनंदित होऊ द्या.
11. मुलांना तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगा. तुमच्या घराण्याचा इतिहास सांगा. मुलांना त्यांचं मूळ कळू द्या. मोठे झाल्यावर हाच मुलांसाठी खूप मोठा वारसा ठरतो.
12. मुलांना बाहेर खेळू द्या. त्यांचे कपडे खराब होऊ द्या. त्यांना थोडं फार लावुन घेऊ द्या. कधी तरी थोडं फार लागल्याने काही होत नाही. नुसते बसून राहण्यामुळे मुले आळशी बनतात.
13. त्यांना एखादा पाळीव प्राणी पाळू द्या - कुत्रा, मांजर, पक्षी, मासा इत्यादि
14. त्यांना लोकगीते शिकवा.
15. मुलांसाठी रंगीत चित्रे असणारी गोष्टीची पुस्तके आणा.
16. त्यांना चित्रे रंगवू द्या. त्यांना कागदाच्या वेगवेगळ्या गोष्टी बनवायला शिकवा.
17. मुलांना टीव्ही, मोबाईल, कंप्यूटर सारख्या गोष्टींपासून दूर ठेवा. पुढचं पूर्ण आयुष्य त्यांना ते करता येईल.
18. मुलांना चॉकलेट, बिस्किट, केक, चिप्स, समोसा, कोका कोला अशा गोष्टी खायला देणे टाळा.
19. तुमच्या मुलांच्या डोळ्यात पहा आणि तुम्हाला इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. काही वर्षांनी तुमची ही मुले खूप मोठी होतील. त्यांच्या बालपणात सुंदर रंग भरा.
तुमचा वेळ ही तुमच्या मुलांसाठी सगळ्यात महत्वाची गिफ्ट आहे.
मुलांच्या सुट्टीसाठी अनेक शुभेच्छा..

Unknown

21/04/2022

फ्लॅट आले घरे गेली
नाती मात्र फाटत गेली,
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण वडिल, आई वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
मुले सारी विसरून गेली.

आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला बाई, आणायला बाई
घरच्या मायेला पारखी झाली..

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
सारी 'extremely busy' झाली
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..
हॉटेलिंगची फॅशन आली
घरची जेवणे बंद झाली..

Modular च्या kitchen मध्ये
मुरंबा,लोणची बंद झाली

खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..
चिमुकल्यांची मनेच तुटली..

पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
माणुसकीही सोडून दिली

फेसबुक, गुगल, सगळे असून
डिप्रेशन ची पाळी आली
प्रत्येकाला शुगर, बीपी ..
हार्ट चीही गोळी आली !

इंटरनेट ने क्रांती केली !
मोबाईल ने जादू केली !
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसं आता मग्न झाली..

माणसं जाऊन यंत्रे आली !
यंत्रांची मग तंत्रे आली !
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला जवळच कोणी नाही..
दु:ख ऐकायला आपलं कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणुसकी मात्र उरलीच नाही.

एकमेकांकडे जात जा
विचारपूस करत रहा
कसला मान आणि अपमान
नाती आपली जपत जा.

🙏🏻

21/04/2022

जबाबदारी शांत असते,
अपेक्षा
' दंगल '
घडवतात.

सेल्फ रिस्पेक्ट आणि ईगो यांच्यामध्ये अगदी बारीकशी समजुतदारपणाची एक तार असते. ही तार तोडायची की जगण्याचे स्वर छान निघावेत...
20/03/2022

सेल्फ रिस्पेक्ट आणि ईगो यांच्यामध्ये अगदी बारीकशी समजुतदारपणाची एक तार असते.
ही तार तोडायची की जगण्याचे स्वर छान निघावेत म्हणुन हळुवार छेडायची हे ज्याला कळते त्याला माणसं कळतात. आपुलकी, स्नेह, मायेचा ऊमाळा, प्रेमाचा ओलावा जपुन आयुष्यभर नाती जपण्याचा काळ हा मुर्दाड, भावनाशुन्य,दुर्लक्षित, कोरड्या शुष्क मनांच्या कप्प्यात आता गाडला गेला. ओढ ही निरंतर असते पण बदलतात ती नाती, कितीही खोल रुजवा शेवटी होते त्यांची माती... !!
काही माणसांसाठी आपण निर्व्याज, निरपेक्ष आंतरिक जिव्हाळ्याने खुप साऱ्या गोष्टी करतो ; तेव्हा आपण स्वत:ला खुप नशीबवान समजतो की खरच आपल्या आयुष्यात अशी माणसं आहेत....
पण, आयुष्याच्या एका अनपेक्षित वळणावर एकमेकांच्या चुका दिलदार मनाने माफ करण्याचा मोठेपणा खुप खुप कमी माणसांकडे असतो. काहींची अपेक्षा असते की आपण त्यांची मन वाचावीत पण अशांऩी इतरांचीही मन जपण्याची कला अवगत करुन घेतली पाहिजे. हल्ली एक फेमस वाक्य कानी पडतं.."कुण्णाकडुन कसलीच अपेक्षा ठेवायची नाही म्हणजे आपण हर्ट होत नाही". खरचं रोजच्या जगण्यात अस शक्य आहे का? एखाद्या ग्रेटफुल व्यक्तीला हे जमु शकत पण सामान्य जीवन जगणा-या माणसांच काय ? पावला पावलावर इतरांकडुन तर कधी स्वता:कडुनची अपेक्षा त्याची परीक्षा घेत असते....

समुद्रातल्या चमचाभर पाण्याइतकी तरी अपेक्षा नक्कीच ठेवायला हवी कारण त्याशिवाय आपलं चांगलं चिंतणार नक्की कोण हे कळत नाही. शुन्य अपेक्षा ठेवली तर लोकं गृहीत धरायला सुरु करतात. हे गृहीत धरण वाढत जाऊन त्यांना आपला आदर, मान-सम्मान या गोष्टी काहीसुध्दा मैटर करत नाहीत. निरपेक्षतता हे मुल्य किंवा भावना ही खरेच एक ग्रेट गोष्ट आहे ती ज्याला जमली त्यानं आयुष्याला जिंकलं. पण सध्याच्या काळात अस राहण फार फार कठीण आहे.
आणि असा धडपडता असा केविलवाणा प्रयत्न आपण करायला जावा नि...माणसांनी समजुन न घेता एक खोलवर रुजलेले नाते मुळापासुन ऊपटुन टाकण्याची असुरी मजा घ्यावी हेच ज्यादातर घडत जात....व संवादाला श्रध्दांजली वाहिली जाते.

मग, आदरणीय व. पु. म्हणतात तस... प्रत्यक्ष मृत्युपेक्षा जित्या जागत्या माणसांमधला संवाद संपणं हेच त्याच खर मरण असतं !! अशावेळी, निव्वळ बेगडी स्माईल, नि ओळखीचे असुनही अनोळखी असल्याचे भासवण्याचा सराईत अभिनय या दोन गोष्टींमध्ये माणसं पक्की मुरत जातात. मग, अशांना स्वत:च्या ईगोची मुरलेल्या लोणच्यासारखी ऊगाच तोंडी लावण्याइतपतची चव मिळते पण मनापासुन नाते निभावणाऱ्यांच्या नशीबी ऊरतो तो केवळ यातनादायी आंबटपणा, व पुढे जाऊन कडुपणाही.... !!

06/03/2022

परत फिरण्याची वेळ
आपण आयुष्याची ४०/५० वर्षे पूर्ण केली असल्यास, “परत फिरण्याची” तयारी सुरू करा....

हे सर्व केव्हा करायचं तर आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर ! का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे ? जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते..ते आपणास सांगतो.
*परत येणे ..... कधीच सोपे नसते*

एक व्यक्ती आपल्या राज्याच्या राजाकडे गेला. राजा समोर जाताच म्हणाला, "मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे." राजा दयाळू होता. त्याने विचारले. आपल्याला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?"

त्यावर माणूस म्हणाला. "कसायला थोडी जमीन द्या."

राजा म्हणाला: "उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू जेवढे चालू शकशील, जेवढे धावू शकशील, तेवढी संपूर्ण जमीन तुला देण्यात येईल. परंतु एक लक्षात ठेव, तू ज्या ठिकाणाहून धावणे सुरू करशील, त्याच ठिकाणी सूर्यास्तापर्यंत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही!"

माणूस खूश झाला. सकाळी राजासमोर हजर झाला. अन् तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहिला; सूर्य‌ माथ्यावर चढला होता .. पण त्या माणसाने धावायचं थांबवले नाही .. अजून थोडी मेहनत .. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती ! संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, आपल्याला परत ज्या ठिकाणाहून आलो आहे, तेथे सूर्यास्ताअगोदर पोहचायचे आहे, नाहीतर आपल्याला काही मिळणार नाही! त्याने मागे वळून पाहिले तेव्हा आपण खूप दूर आलो आहे ..हे जाणवले. आता आपल्याला परत पोहचायला हवे .. आकाशातील सूर्य पश्चिमेकडे वळला होता.. तो व्यक्ती थकला होता. पण वेळ वेगाने निघून जात होती .. आराम करता येत नव्हता.अजून थोडी मेहनत.. न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला.. पण त्या व्यक्तीला आता श्वास घेणंही कठीण झालं होतं. तो खाली पडला .. आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला !

राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला, याला फक्त सात फूट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता! शेवटी त्या व्यक्तीच्या हाती काहीच लागले नाही. रिकाम्या हाताने आला होता. रिकाम्या हातानेच गेला.

आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा. आपण पण तीच चूक तर करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा अफाट आहेत! आपण जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आपण तसा प्रयत्न करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आपल्याकडे काहीही वेळ ना काळ शिल्लक राहत नाही. मोहापोटी आपण पूर्ण सर्वस्व गमावून बसतो.

मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो.. आजपर्यंत मी कुठे पोहचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेल? हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा! संपत्ती जरूर कमवा पण संध्याकाळी आपल्या जागेवर नक्की पोहचा..

सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. आपल्यालाही कसे परत फिरावे हे माहित नाही. एक मात्र लक्षात ठेवा आपल्याला एक न एक दिवस हे सर्वकाही सोडून जायचे आहे. तेव्हा थोडं थांबा, आजूबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलंय याची खंत आयुष्यभर राहून जाईल. किमान आज या एका क्षणापुरतं खूश व्हा.

म्हणून सांगतो मित्रानो, साधेपणाने जगा. सर्वांशी प्रेमाने वागा. एकमेकांचा आदर करा.. सर्वांची काळजी घ्या.. सर्वांच्या नेहमी संपर्कात रहा.. सुरक्षित रहा..!!

मिञ-नातेसंबंध सुधारा

#नाती #मित्रा #मित्रपरिवार #खुश

28/11/2021

गंभीर बनू नका

फार गंभीर बनून जगू नका.हे विश्व करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले.
कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक, मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाणे रहा. धर्म, जात, तत्व या गोष्टी माणसाने निर्माण केल्या. त्यामध्ये अडकून पडू नका. स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका. इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका. त्यांचे जीवन ते जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या. आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे ओळखा. उगीच फालतु गोष्टीत नाक खुपसू नका.
हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना, क्षुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका. जीवन गंमतीने जगा. जरा मोकळेपणाने हसा. इतरांनाही आनंदी करा. लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका. लहान
सहान गोष्टींचा आनंद घ्या. सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला. त्यामध्ये कमीपणा मानू नका. तुम्ही स्वतःला काहीही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात. कुणाचाही द्वेष करु नका. सूडबुद्धीने वागू नका. आपल्या अवतीभोवतीचे जग बघा. किती गंमत आहे चोहीकडे. मुंग्याची रांग
बघा. पाखरांचे थवे बघा. बघा कावळ्याची स्वच्छता. खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटा
तुम्हाला खुणावत आहेत. जा उंच डोंगरावर
किती प्रेमाने तो डोंगर खांद्यावर खेळवतो. विचारा त्या कोकीळेला, इतकी सुंदर कशी गातेस?
विविध रंगाची फूले बघा. आयुष्यात विविध रंग भरा. एकसारखे जीवन जगू नका. नवी ठिकाणे नवी माणसे यांच्याशी मैत्री करा. प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा. कटकटी कमी
करा. अधिक आनंदी जगा. आनंदाने जगण्यासाठी सर्वांना मनमोकळ्या शुभेच्छा ...

एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. असं आपण क्वचित कधी म्हणून जातो आणि त्या शब्दात अडकतो!

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !

भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या...

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो..

भावना दुखावली,असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो !

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली, तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं..

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं..

कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात.. तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं.

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना
आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं..

बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.
म्हणून...

कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच ..!!

गंभीर बनू नका ..
क्षमाशील रहा ..
जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगा..
Be happy....

04/08/2021

"शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो ."

"चढलेला मोठा आवाज"...
आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा.

घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.
घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.

शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.

एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. एखाद्या सफाई कामगाराला बक्षिस दिले तर तो हात उंचावून आशिर्वाद देणार नाही, थँक यु म्हणणार नाही पण
त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरींमुळे तुमच्या शरीरा भोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळावेगळा उत्साह वाटेलच.
म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे.

फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते.
म्हणून संवाद साधतांना, मंत्रपठण करतांना, स्तोत्रे म्हणतांना, आरती करतांना, पोथी वाचतांना, आपला स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.

Address

Ahmednagar
Ahmednagar
414003

Telephone

+919371919999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Amit Pawarr posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Amit Pawarr:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram