13/03/2024
रिदम हार्ट आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अकलूजचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न !
रिदम हार्ट आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अकुलजचा भव्य उदघाटन सोहळा ४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झाला. या हॉस्पिटलच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे उपचार या परिसरातील लोकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या निमित्ताने रिदम हार्ट आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ने उत्तम दर्जाचे रुग्णसेवा पुरवण्याच्या मुख्य उद्देश्याकडे टाकलेले हे एक यशस्वी पाऊल आहे.
रिदम हार्ट आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री.विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या उदघाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री श्री.हर्षवर्धन पाटील , सोनाई दूध संघाचे सर्वेसर्वा श्री . दशरथदादा माने पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पुणे श्री. प्रदीपदादा गाररटकर, चेअरमन दि. सा . मा . शु . फॅक्टरी लि माळीनगर श्री. रंजनभाऊ गिरमे, माजी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सोलापूर श्री. प्रकाश पाटील, माजी सरपंच अकलूज ग्रामपंचायत श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील, संस्थापक अध्यक्ष जिजामाता शि. प्र. मंडळ सराटी श्री. अप्पासाहेब जगदाळे, हृदयरोग तज्ञ डॉ. श्री. एम. के. इनामदार इत्यादी मान्यवर उपस्तित होते. उदघाटन समारंभाची ही काही खास क्षणचित्रे.