Priyal_my_fight_with_cancer

Priyal_my_fight_with_cancer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Priyal_my_fight_with_cancer, Amravati.

Since 6 months i m fighting c cancer i just want to tell u all abt my journey c cancer, my mental, physical an emotional condition that i m facing yet..an want to encourage cancer patients..

25/11/2025

त्यांना त्यांचं करू द्या....

17/11/2025

Gratitude....🙏

15/11/2025

देवाला नेहमी चांगलेच लोक प्रिय असतात. आपल्या आयुष्यातले चांगले लोक, प्रिय व्यक्ती सोडून जाण्याचे दुःख हे फार असतं.
आज माझ्या लाडके मामे सासरे Dr. पंजाबराव महाले, दानापूर, अचानक पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ही बातमी ऐकताच खरंच खूप खिन्न झाले.
दर पंधरा दिवसातून आमचा फोन असायचा. मामा स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला सारखं मार्गदर्शन करायचे.
तुम्ही स्वतःच्या भाच्याची कधीच बाजू घेतली नाही. नेहमीच माझ्या बाजूने खंबीर उभे राहिले. एकच गोष्ट मला म्हणायचे मी नेहमी खऱ्याचीच बाजू घेणार. माझी बाजू घ्यायची म्हणून स्वतःच्या भाच्याचाही रोश त्यांनी उडवून घेतला. नाती तुटली...
नवऱ्यापासून विभक्त झाली. पण त्याच्या नातेवाईकांपासून कधीच नाही. नेहमी सगळ्यांनी मला आपलंच मानलं...
माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी सगळ्यांनी प्रेमच दिल...
आज सकाळी बातमी ऐकली आणि खूप मोठा धक्का मला बसला..
मामा फक्त वैद्यकीय क्षेत्रातच नावलौकिक होते असे नाही त्यांचे सामाजिक क्षेत्रातही ख्याती होती... एक नावलौकिक व्यक्तिमत्व हरवल..
भावपूर्ण श्रद्धांजली मामा...💐🙏 Always in our heart...

03/11/2025
31/10/2025
20/10/2025

एक सिंगल मदर म्हणून अचानक ज्या ढीगभर जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन पडल्या आहेत, त्या पार पडत असताना कधी कधी विस्मरण होऊन जात मीच माझ्या मुलीची आई आणि बाबा हे दोन्ही आहे. तिचा मानसिक कल समजून घेण्यात कधी कधी मी चुकते. आणि आपली चूक लक्षात आल्यानंतर मला वाईट वाटतं. लगेच मी माझी चूक सुधारते....
थोडक्यात काय अनेक जबाबदाऱ्यांचे ओझं, शारीरिक स्वास्थ्य, व्यवसाय आणि एक आई म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना कुठेतरी कमी होतं. मुलांची मानसिकता समजून घेण्यात कधीतरी चूक होते. पण ती लगेच सुधारली गेली की मग समाधानही वाटतं.

02/10/2025

वाचन करत असताना बरेच वाचन मनाला भारावून जात आणि कायम ते लक्षात राहत. असेच कुठेतरी वाचण्यात आलेली ही कविता... कोणी लिहिले माहित नाही पण छान आहे...
आज मी ती फक्त माझ्या तोंडून सादर केली....
.
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा 💐

01/10/2025

Every ending has a new beginning....
जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता सर्व संपलं, आयुष्यात अशी एक परिस्थिती येतेकी तुम्हाला वाटतं की आता काहीच होऊ शकत नाही.तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर येऊन पोहचता की तुम्ही सगळी hope सोडलेली असते...
पण हीच तर खरी गंमत आहे...
सर्व संपलं हे माहीत असतानाही परत शून्यातून नवीन विश्व उभारण्याची ताकद त्याही परिस्थितीत जो दाखवतो, आपल्या पायांना, आपल्या मनाला जो डगमगू देत नाही. त्याही परिस्थितीत स्थैर्य आणि धैर्य याचा समतोल तो साधतो. आपल्या मनातून निघणारे असंख्य नकारात्मक आवाज तो थांबवतो, तो आयुष्यात त्याच्या आयुष्याला परत नव्याने उभारतो. तेही पहिल्यापेक्षा 10 पट ताकदीने, दहा पटीने चांगल... तो खरा गेम चेंजर असतो...
त्या विखुरलेल्या परिस्थितीतही तो एक नवीन दिशा शोधतो आणि नव्याने घडतो....
म्हणूनच म्हणते जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत कधी आलात तर डगमगू नका. परत नव्या जोमाने नव्या उमेदीने नव्या ताकदीने विखुरलेल आयुष्य परत समेटा....

30/09/2025

घरातल्या लक्ष्मीचा आदर केला कि ती मंदिरात ली लक्ष्मी आपोआपच प्रसन्न होते.....
तुम्ही घरातल्या लक्ष्मीला दुखवता, तिचा आदर करत नाही. काय हवं नको तिथे मन कधीच झोपल्या जात नाही. ती तुमच्या घरासाठी, घरातल्या लोकांसाठी, सगळं आपलं म्हणून करत असते. ते करताना अगदी आनंदाने ती करते कारण ती सगळ्यांना तिचं समजत असते. कितीही दुःख असलं, आजारी असू दे सगळं आनंदाने ती करते. घरातल्या लोकांसाठी आपली सगळी स्वप्ने बाजूला ठेवते. आणि हे सगळं करून त्याची फक्त एकच अपेक्षा असते ते म्हणजे आदर ,प्रेम.....
म्हणून म्हणते तुमच्या घरातील लक्ष्मी आनंदी राहिली मग ती तुमची आई असो तुमची बहीण असो तुमचे पत्नी असो तुमची मुलगी असो.. त्यांचा आदर ,त्यांच्या विचारांचा आदर, सुखदुःखात त्यांच्या पुढ सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे सामर्थ्य हे प्रत्येकामध्ये असल्या पाहिजे. घरातली स्त्री हीच खरी लक्ष्मी असते...

माझा श्वास तू,माझा जीव तू, माझ्या जगण्याचा एकमेव ध्येय तू......जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐
28/09/2025

माझा श्वास तू,माझा जीव तू, माझ्या जगण्याचा एकमेव ध्येय तू......
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyal_my_fight_with_cancer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram