19/11/2020
*आला हिवाळा आरोग्य सांभाळा*
हिवाळ्यात शरीरोष्मा शरीरात संचित होतो व जाठराग्नी प्रदीप्त होऊ लागतो. म्हणून भूक वाढते व अधिक आहाराची इच्छा उत्पन्न होते. म्हणूनच यावेळी मात्रा गुरू व प्रकृति गुरू असा आहार घ्यावा. अधिक मात्रेत पचण्यास जड असे पदार्थ खाऊ शकतात.
* तेल, तूप, लोणी आणि स्नेहद्रव्यांचा भरपूर यथेच्छ वापर करता येतो.
* गहू, उडीद, साखर, दूध इ.चा आहारात समावेश हवा. या ऋतूंत गहू-तांदळापेक्षाही बाजरी अधिक प्रमाणात खाणे योग्य ठरते. बाजरी ही उष्ण आहे पण तशीच रुक्षही आहे. म्हणून भाकरी करताना त्यात तिळ मिसळले जातात..
*तूर, मूग, मटकी, हरभरा, चवळी इ. कडधान्ये.
*भुई कोहळा, बटाटा, रताळी, कांदा यांसारखी कंदमुळे व नवलगोल, दोडके, पडवळ, वांगी, मुळा इ. विशेष पथ्यकर आहेत.
* मांस-मच्छी-कोंबडी-अंडी एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचा मांसाहार या ऋतूंत वरचेवर खावा.
*मांसाहार न करणार्यांनी दूध, दही, लोणी, मलई, बासुंदी, पेढे, गुलाबजाम, बर्फीसारखे पदार्थ यथेच्छ खावेत.
*अनेक प्रकारची पक्वान्ने तयार करून खावीत ती याच ऋतूंत!!* द्राक्षे, मनुका, सफरचंद, केळी, चिक्कू, कवठ, नारळ, पेरू, डाळिंब, जर्दाळू, खारीक, पिस्ता, काजू, बदाम या प्रकारची एक ना अनेक फळे व सुकामेवा अवश्य खावा.
ःः हेमंत ऋतूंत रात्र मोठी व दिवस लहान असतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. या ऋतूंत सकाळी उठल्याबरोबर न्याहारी व तीही पोटभर केली पाहिजे.
ःः शिशिर ऋतूंत सर्वच उष्ण पदार्थ उपयुक्त ठरतात. उदा. गुळाची पोळी. म्हणून जानेवारीच्या मध्यावरच येणार्या या मकरसंक्रांतीला तीळ व गूळापासून बनविल्या जाणारा तिळगूळाचे लाडू वाटण्याची पद्धत आहे.
ःः पौष महिन्यात धुंधुरमांस पाळण्याची पद्धत आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून स्नानादि आटोपून सकाळच्या उन्हात बसून मुगाची खिचडी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत अशा प्रकारचा आहार घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ रेणुका कौस्तुभ वडुलेकर
राधा क्लिनिक
वेळ संध्याकाळी 7 ते 9