16/09/2025
13/09/25
आर्वी :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पुनर्वसन येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर व साहित्य वाटप तसेच शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वीच्या महिला विभागाद्वारे करण्यात आला होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अरुण पावडे संस्थापक इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वी, नंदकिशोर दीक्षित, रमेश जंवजाळ डॉ प्रतिभा पावडे, डॉ अनिता भुतडा, केंद्रप्रमुख संजय कोहचाडे,मुख्याध्यापक पराग टेकाम, सरपंच रज्जाक भाऊ अली आदी मान्यवर उपस्थित होते
रेड क्रॉस सोसायटी द्वारे शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व दंत तपासणी डॉ अभिलाष धरमठोक, डॉ उमेश गुल्हाने,डॉ देवेंद्र खंडेलवाल डॉ. सुभाष बुधवानी यांनी केली
केंद्रप्रमुखसंजय कोहचाडे मुख्याध्यापक पराग टेकाम, माजी मुख्याध्यापिका मनीषा ठाकरे, रवींद्र ठाकरे, अलका टेकाम, रूपाली राजनेकर, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका तज मुन्नीसा बशीरमॅडम व शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी छबू बाई उईके शोभाबाई उईके, नानुबाई महाजन तसेच रेड क्रॉस चे शिक्षक सदस्य यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन रेडक्रॉस महिला विभागाद्वारे सत्कार करण्यात आला
डॉ प्रतिभा पावडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्या करिता व्यायामाचे महत्व व व्यसनापासून दूर राहण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले.
पुनम राठी यांना विद्यार्थ्यांचे जीवनात अभ्यासाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अरुण पावडे यांनी विद्यार्थ्यांना या गावाप्रती आपली असलेली जबाबदारी ओळखून मोठे झाल्यानंतर या परिसराच्या विकासाकरता आपण पुढे यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले
कार्यक्रमाचे संचालन सुजाता चांडक व रुपाली राजनेकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पराग टेकाम यांनी केले
रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य रवी शहा,किशोर चोरडिया, प्रमोद पाटणी, डॉ सतीश ठाकरे, अरुण ढोक, प्रा अभय दर्भे, प्रेमसिंग राठोड, सुशील लाठीवाला, मोहन चांडक, गिरीश राठी, प्रज्वल कसर,
ज्योती भट, वृषाली सोनटक्के,नीलिमा ढोक,शितल चोरडिया, पूनम पाटणी, मीरा राठोड, शुभांगी कलोडे,नम्ररा,उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजश्री धुर्वे, जया धुर्वे, सविता नारे ,आशाताई, किशोर वैद्य, व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले