MULLA Medical Store

MULLA Medical Store Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MULLA Medical Store, Borgaon.

22/12/2016

मुंबई : बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.

बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.

बदामाचे फायदे.

१. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.

२. बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.

३. बदामाने काही काळ भूक भागवली जाते.

४. डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.

५. बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत.

६. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.

७. संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.

८. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.

९. बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.

१०. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

29/10/2016

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

* दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...*

*शुभेच्छुक=अब्दुल मुल्ला✨ मुल्ला परीवार बोरगाव।

13/07/2016

डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतात. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच वापर होत नाही तर याचे अनेक फायदेही आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील.

विक्स वेपोरबचे हे १० फायदे

आपले कपडे तसेच त्वचेवर विक्स वेपोरब लावल्यास मच्छर दूर होतील.

विक्स वेपोरबच्या वापराने सायनसमुळे होणारी डोकेदुखी बरी होण्यास मदत होते.

ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल मात्र विक्स वेपोरब पिंपल्सवर लावल्यास पिंपल्स बरे होतात.

अनेकदा नाटक, सिरीयल्सच्या चित्रिकरणादरम्यान कलाकारांना खोटे अश्रू काढावे लागतात. तर थोडासा वेपोरब डोळ्यांच्या खाली लावा.

कीटक, पतंगांनाही दूर राखण्याचे काम विक्स वेपोरब करते. खाण्याच्या टेबलावरुन माशा दूर करायच्या असल्यास टेबलावर विक्स वेपोरबची डबी उघडून ठेवावी.

खरचटल्यास विक्स वेपोरबमध्ये थोडेसे मीठ मिसळून खरचटलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल.

स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठीही विक्स वेपोरबचा वापर होतो. नियमितपणे स्ट्रेच मार्कवर विक्स वेपोरब लावल्यास दोन आठवड्यांत तुम्हाला परिणाम दिसू लागतील.

ड्राय स्किनसाठी विक्स वेपोरब एक मॉश्चरायझर म्हणून काम करते.

टेनिस एल्बोचा त्रास असल्यास विक्स वेपोरब तुम्हाला नक्की फायदा होईल. यातील मेंथॉल आणि कापूरमुळे दुखणे बरे होते.

तळपायाला भेगा पडल्यास त्यावर विक्स वेपोरब गुणकारी आहे. रात्री झोपताना विक्स वेपोरब लावल्यानंतर पायात सुती मोजे घालून झोपा.

25/09/2014



Memory Slips in Senior Years and Dementia Risk

for more health and medical info, visit www.medicalobserverPH.com

25/09/2014
25/09/2014

डॉ. अविनाश भोंडवे

अँटिबायोटिक्सबद्दल जेवढे ठाम गैरसमज अस्तित्वात असतील तेवढे, आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील आजार, उपचार आणि औषधं यांबाबत क्वचितच सापडतील. १९२८ मध्ये डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंगला अचानकपणे त्याचा शोध लागला. त्यातून जंतूंद्वारे होणाऱ्या आजारांविरुद्धच्या लढ्यात वैद्यकीय शास्त्राला एक अमोघ अस्त्रच मिळालं. मात्र तेव्हापासून आजतागायत त्याबाबत अनेक उलटसुलट विचार आणि कल्पना जनमानसात ठाण मांडून आहेत.

या साऱ्या गैरसमजांची सुरुवात अँटिबायोटिक्स या शब्दापासून होते. 'अँटी' म्हणजे विरुद्ध आणि 'बायोटास' (किंवा बायोस) म्हणजे जीवन. त्यामुळे त्याचा शब्दशः अर्थ होतो, 'जीवनाविरुद्ध'. साहजिकच अनेकांना असं वाटतं, की मानवी शरीरातल्या क्रियांमध्ये काहीतरी उलथापालथ करणारी ही औषधं आहेत. खरं तर यातील 'जीवन' म्हणजे, मानवी शरीराला रोगग्रस्त करणारे जंतू. त्यामुळे अँटिबायोटिक्स या शब्दाचा वाच्यार्थ, जीवजंतूंचा नाश करणारी औषधं, असा आहे.

आजही कित्येक सुशिक्षितांचा असा पक्का समज असतो, की अॅलोपॅथिक औषधं म्हणजे 'अँटिबायोटिक्स'. त्यामुळे अगदी रक्त खूप कमी झाल्यामुळे लोह आणि जीवनसत्वाच्या गोळ्या महिन्या-दोन महिन्यासाठी लिहून दिल्यावर, कपाळाला आठी घालून रुग्ण विचारतात, 'एवढे दिवस ही अँटिबायोटिक्स घायची?' त्यांना सांगावं लागतं, 'डॉक्टर्स देतात ती सारी अँटिबायोटिक्स नसतात. जेव्हा एखादं इन्फेक्शन होतं, तेव्हाच ती दिली जातात.' वैद्यकीय शास्त्रात असंख्य प्रकारची औषधं असतात, सूज कमी करणारी, ताप उतरवणारी, वेदनाशामक, रक्तदाब उतरविणारी, हृदयविकार टाळणारी, हार्मोन्स, शर्करा कमी करणारी अशी असंख्य प्रकारची औषधं असतात आणि त्या त्या आजारात ती द्यावी लागतात. सरसकट सगळी औषधं म्हणजे अँटिबायोटिक्स नव्हे.

अँटिबायोटिक्स ही खूप 'स्ट्राँग' औषधं असतात आणि त्याची 'पॉवर' ही त्याच्यापुढच्या आकड्यात असते, हा तमाम सुशिक्षितांचा लाडका समज सर्वत्र आढळून येतो. उदा. अॅमॉक्सिसिलीन ५०० मि.ग्रॅ. म्हणजे ५०० पॉवरची गोळी, असं सर्रास बोललं जातं. खरं म्हणजे ५०० मि.ग्रॅ. हे त्या गोळीतल्या औषधाचं वजन असतं, पॉवर नसते. त्याहूनही अधिक परिणामकारक औषधे २०० मि.ग्रॅ. वजनात किंवा कमी परिणामकारक औषधे १००० मि.ग्रॅ.मध्ये उपलब्ध असतात असतात. साहजिकच औषधाची पॉवर वजनावर ठरवू नये.

औषधांचे डोस हे त्या रुग्णांच्या शारीरिक वजनावर ठरवलेले असतात. रुग्णाच्या शरीरात शिरलेले रोगजंतू नष्ट करण्यासाठी, रुग्णाच्या दर कि.ग्रॅ. वजनाला किती औषध द्यावं याचं प्रमाण, ते औषध बाजारात येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय अभ्यास चाचण्या आणि प्रयोग करूनच निश्चित केलेलं असतं. त्यामुळे एखाद्या औषधाचा, ५००मि.ग्रॅ. दिवसातून तीन वेळा हा डोस 'पॉवरफुल' नसून रास्तच असतो. 'पॉवर'च्या या गैरसमजामुळे रुग्ण बहुतेक वेळा अशा गोळ्या चक्क नकोच म्हणतात, नाहीतर तीनऐवजी एक वेळाच घेतात व साहजिकच रोगजंतू नष्ट न होता वाढतच जातात आणि आजारही.

प्रत्येक अँटिबायोटिक किती दिवस घेतल्यास जंतू नष्ट होतात, याचं गणितसुद्धा आंतरराष्ट्रीय चाचण्यांत ठरलेलं असतं. त्यामुळे काही औषधं तीन ते पाच दिवस, तर काही सात, तर काही १४ दिवसांपर्यंत घ्यावी लागतात. क्षयरोगावरची अँटिबायोटिक्स सहा महिने ते दीड वर्षापर्यंत घेणं नितांत आवश्यक असतं. काही औषधं सुरुवातीला जास्त मात्रेत देऊन नंतर कमी करावी लागतात. या मध्ये औषधांचा परिणाम सुरू झाल्यावर रुग्णाची लक्षणं उदा. ताप, खोकला वगैरे कमी होतात; तरीसुद्धा रोगजंतू शरीरात शिल्लक असतातच. त्यामुळे त्या त्या आजाराप्रमाणे किती दिवस औषधं घ्यावी हे डॉक्टर्स रुग्णाला सांगतात. लक्षणं कमी झाली म्हणजे, 'मी बरा झालो आता कशाला ती औषधं?' असं समजून रुग्ण ती स्वतःहून बंद करतात. परिणामतः शिल्लक जंतू औषधं बंद झाल्यावर जोमानं वाढतात आणि आजार बळावतो. त्यामुळे आपल्याला वर वर बरं वाटलं, तरी डॉक्टरांना पुन्हा एकदा दाखवून घ्यावं आणि 'तुम्ही बरे झालात,' असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानेच ती औषधे बंद करावीत.

Address

Borgaon

Telephone

+919890009712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MULLA Medical Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram