12/05/2021
***Arjunarishta अर्जुनारिष्ट***
अर्जुनारिष्ट ला पार्थादिरिष्ट म्हणून ही ओळखले जाते.नेचुरल फेर्मेंटेशन प्रोसीजर मधून हे तयार होते.यात सेल्फ जनरेटेड अल्कोहोल असते. आयुर्वेदिक ग्रंथ भैषज्य रत्नावली मध्ये हृदयरोग चिकित्सा प्रकरणात पार्थादिरिष्ट म्हणून याचा उल्लेख आहे. बेसिकली हे औषध ह्दय रोगा संबधीत छातीत दुखणे उच्च रक्तदाब, हार्ट फेल, मायोकार्डीयल इन्फ्राकशन, ब्लाँकेजेस, इस्केमिक कार्डियोमायोपैथी ,कोरोनरी धमनी यासाठी हर्बल कार्डियक टॉनिक आहे. यात अर्जुन सादडा या वनस्पतीची साल वापरली जाते.जी कार्डियोप्रोटेक्टिव आहे.
अर्जुनारिष्ट मध्ये फ्लेवोनोइड्स, टैनिन आणी खनिज विपुल प्रमाणात असतात ज्यात एंटी-ऑक्सीडन्ट, एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे लिपिड कमी करतात. याच्या सालीत इनोट्रोपिक आणि हाइपोटेंशन शक्ती असतात जे कोरोनरी धमनी चा प्रवाह व्यवस्थित ठेवतात.
मुख्य घटकःअर्जुनसाल, मनुका, धातकी अथवा धायटीची फुले ,गुळ,मधुका म्हणजे मोहाची फुले.
फायदे
*ह्दया संबंधित विकृती डाइलेटेड कार्डियोम्योंपेथि, हाइपरट्रॉफिक कार्डियोमायोपैथी, Myocardiopathy, प्रतिबंधित कार्डियोमायोपैथी मध्ये फायदेशीर.
*Breathing Problems श्वास घेताना अडचणी मध्ये फायदेशीर.
*रक्तदाब, रक्तसंबधीत विकारांवर गुणकारी.
*कार्सिनोमा,कँन्सर वर लाभप्रद.
*अम्ल अपच, अम्लपित्त यात गुणकारी.
*रक्तशर्करा नियंत्रित करते.
*उच्च रक्तदाबात फायदेशीर.
*मुळव्याधीत रक्तप्रवाह थांबवते.
*Fractures हाड जुळणीत फायदेशीर.
*निर्जलीकरण / Dehydrationयात उपयोगी.
*सारखा घाम येणे यात फायदेशीर.
*किडनी साठी फायदेशीर डँमेज होण्यापासून वाचवते.
*लिव्हर स्ट्युमिलंट टाँनीक आहे.
*आयरन / Iron मात्रा नियंत्रित ठेवते.
*लंग्ज डिसीज मध्ये उपयुक्त
*थ्रोट इनफेक्शन मध्ये उपयोगी.
*विष बाधेत उपयोगी.
*विसर्प / Erysipelas मध्ये लाभप्रद.
*कुष्ठरोगा लेप्रसीत उपयोगी.
*जुलाब, आव,दस्त / Diarrheaफायदेशीर.
*घशात कोरडपडणे यात उपयोगी.
*ल्युकेरीया, प्रदर रोगात उपयोगी
*गुदाभ्रंश,अँनस मधील तक्रारी मध्ये उपयोगी
*Menorrhagia विकारात खूप उपयोगी.
*मिर्गी / फिट ,आकडी Epilepsy यात उपयोगी.
*त्वचा रोगात लवकर रिकव्हरी साठी उपयोगी *Hyperglycemiaउच्च रक्त ग्लूकोज, उच्च रक्त शर्करा यावर नियंत्रण मिळवते.
*Fever/ तापात लाभप्रद
*वेदना मधून आराम देते.
*तणावमुक्त राहण्यासाठी उत्तम.
*मायक्रो गँनिझम इनफेक्शन मध्ये उपयोगी.
*सिरोसिस / Cirrhosis मध्ये ही फायदेशीर.
*रक्ताचा स्तर शरीरात वाढवते.
*ल्युकेरीया वगैरे त्रासात उपयुक्त.
*अर्जुनारिष्टाचा उपयोग म्योकार्डिअल इन्फ्राक्शन आणि कंजेस्टिव हार्ट फेल मध्ये केला जातो.
*कार्डियो-वैस्कुलर मध्ये सुधार करते आणिरक्तदाब सामान्य स्तर स्थिर वर नियंत्रित करते. अर्जुनारिष्ट मधील सक्रिय फाइटोकेमिकल्स आणि शारीरिक गुणा मुळे हे शक्य होते.
*दम,धाप, श्वास असले प्रकार बंद करून शक्ती वाढवते ह्रदयाची
*जेव्हा वेंट्रिकल आकरसतात व माईट्रल व्हाँल मधून रक्त येते अशा स्थितीत उपयुक्त.खूप चांगले कार्य करते
*अस्थमा, जुनाट ब्रोंकाइटिस सीओपीडी जुने श्वसन रोग यात बहुगुणी फेफड़ों च्या टिश्यूना मजबूत करतो.
* धूम्रपान, फ्री-रेडिकल्स, धूळ अन्य विषाक्त पदार्था पासून होणार्या नुकसाना पासून लंग्जची रक्षा करुन सीओपीडी (क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज) ची वाढ रोखतो.
*एंटी-अस्थमेटिक या गुणामुळे श्वसन मार्गात तयार झालेले कफाचे बेटके हटवण्यात महत्वपूर्ण भुमिका वठवते.
*कोलँस्ट्राँल लेव्हल नियंत्रीत ठेऊन धमन्यातील ब्लाँकेजेस दूर सारते.
*शुक्राणूंची क्वालिटी सुधारुन त्यात सक्रियता आणते.
सेवन विधी.
हे नेहमी दोन ते चार चमचे दोन्ही जेवणानंतर दोन वेळा घेऊ शकता.ह्दय विकाराशी संबंधीत व्यक्ती नी यासोबत दूध घेतल्यास अधिक फायदेशीर आहे.आपण असेही पाण्या सोबत घेऊ शकता.
कोणी घेऊ नये.
गर्भवती महीला, स्तनदा माता,अनियंत्रित इनशुलिन अवलंबित्व असललेल्या व्यक्त्ती नी चिकित्सकाचा सल्याने घ्यावे. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमा,मेंदूसंबधीत विकृती,लंग्जमधील गाठी असलेल्या मंडळींना चिकित्सकाचा परवानगी ने द्यावे.हे जरी सेफ औषध असले तरीही तीन महीन्या नंतर आपल्या संबधीत आजाराचा टेस्ट करुन गरज असल्यासच चिकित्सकाचा सल्याने परत घेत रहा.दिर्धकाळ घेतले तरीही नुकसान दायक नाही.
कुठलेही औषध सुरू करण्यापूर्वी.
कुठलेही नवीन औषध सुरु करण्या पुर्वी आपल्या चिकित्सकाला आपल्या शरीराची वर्तमान स्थिती अवगत करा.रोग,सुरु असलेली औषध यांची माहीती द्या.,आपण वात,पित्त, कफ या कोणत्या प्रकृतीचे आहात याची सल्ला घेण्यापूर्वी कल्पना द्या. कारण एका प्रकृती ला चालणारी औषधे दुसर्याला वरदानच ठरतील अशी खात्री देता येत नाही.
व्याधी अनेक उपचार एक हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे.
माझ्या या सदरात मांडलेली मत ही आयुर्वेद शास्त्राने मांडलेली आहेत. यासाठी मी खाली दिलेले संदर्भ ग्रंथाचे आधार ही दिलेले आहेत.
शासनाची भुमिका ःअँलोपँथी औषधाच्या तुलनेत ही औषधे साईड इफेक्ट्स विरहित सवय न लावणारी असल्याने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक जडीबुटीची औषधे म्हणूनच तर अँलोपँथी सारखी बंधनात न ठेवता विदाऊट प्रिस्क्रिप्शन विक्रीची सोय केलेली आहे. कोणीही व्यक्ती स्वतः साठी ओव्हर द काऊंटर ही औषध विकत घेऊ शकतो. आयुर्वेदाच्या याच गुणधर्मामुळे अन्न औषध प्रशासनाने याच्या विक्री साठी कुठलेही विशेष लायसन्स अथवा तज्ञांनी च विक्री करावी अशीही सक्ती केलेली नाही. एकंदरीत सांगायचा मतितार्थ ही औषध ही अँलोपँथी व होमिओपॅथी च्या तुलनेत नगण्य साईड इफेक्ट्स वाली आहेत
पोस्ट लिहतांना भैष्यज्य रत्नावली ,आयुर्वेद सार संग्रह,रसतंत्रसार सिध्दप्रयोग,आयुर्वेद सहाय्यक, औषध बनवण्याचे तंत्र.या जुन्या पुस्तकाचा आधार यासाठी घेतला असून काही फायदे निरिक्षण व अनुभवातून आलेले आहेत.प्रयोजन केवळ औषधाची सखोल माहिती सर्वांना व्हावी व निरामय आयुष्य जगताना ही औषधे सहाय्यक व्हावीत हे आहे.