10/03/2022
💐अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐
योग विद्या धाम धुळ्याच्या इतिहासात पहिल्यांदा एक सुवर्णमय असा क्षण आला, योग विद्या धाम चे कार्याध्यक्ष श्री जितेंद्र भामरे व कोषाध्यक्ष श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी योगशास्त्र ह्या विषयात पी.एचडी प्राप्त केली आहे. योग विद्याधाम च्या संपूर्ण परिवारा तर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन. *डॉ. जितेंद्र भामरे हे योगशास्त्र विषयात एम.ए. व नेट तर अविनाश धर्माधिकारी हे योगशास्त्रात एम. ए.* परीक्षा पास झाले आहेत.
सदर पी.एचडी कार्याकरिता डॉ. वैभव सबनीस सरांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. डॉ. भामरे सर व डॉ. धर्माधिकारी सर यांचे गाईड डॉ. रविकुमार शास्त्रीं होते. यात डॉ. जितेंद्र भामरे यांच्या आई व अर्धांगिनी सौ. दिशा भामरे तर डॉ. अविनाश सरांना *त्यांच्या 93 वर्षाच्या आईंच्या शुभ आशीर्वादा* सोबत अर्धांगिनी सौ. शमा धर्माधिकारी यांचे ही अनमोल सहकार्य मिळाले. या शिवाय योग विद्या धामचे सचिव श्री.यशवंत पाटील, श्री. चंद्रकांत निमगुळकर, श्री. भालचंद्र नेरपगार, श्री. राजेंद्र परदेशी, ह्यांनी मोलाची साथ दिली. डॉ. जितेंद्र भामरे सरांनी आपल्या शिवाजी संस्थेच्या शिक्षकी पेशा व योग विद्या धाम चे कार्याध्यक्ष पद सांभाळून तर डॉ. धर्माधिकारी सरांनी योग विद्या धामचे कोषाध्यक्ष पद सांभाळून वयाच्या ६५व्या वर्षी यश संपादन केलेले आहे.
त्याबद्दल योग विद्याधाम चे अध्यक्ष आप्पासो. श्री. किशोर पाटील, गुरुवर्य डॉ. बार्चे सर, सौ. बार्चे मॅम, बापुसो. अरुण महाले, दादासो सुधाकर बेंद्रे, भैय्यासो. डॉ. संजय पाटील आणि योग विद्याधामचे सर्व पदाधिकारी, योग शिक्षक आणि योग साधकांनी अभिनंदन केले आहे. 💐💐🙏🙏