07/05/2020
"लॉकडाऊन मधील नैराश्याच्या अंधारातून चला करु या वाटचाल पुन्हा एकदा प्रकाशाकडे"
कोरना विषाणूंने जगभरात मृत्यूचे थैमान घातले आहे. आपल्या भारतात व त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे व मृत्यूचे प्रमाण ही आकाशाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहे. या अतिसुक्ष्म विषाणूंने फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक हानी पण होऊ घातली आहे. या लॉकडाऊन मुळे व covid-19च्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्या मनात एक अदृश्य भीती थैमान घालत आहे.
हा आजार मला किंवा माझ्या कुटुंबियांना झाला तर? व या टाळेबंदीच्या काळात अनेकांना सतावत असलेला प्रश्न, आता पुढे काय होणार? असे किती दिवस घरात अडकून पडणार? विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेची चिंता, भविष्याची काळजी निर्माण झाली आहे. किंवा आता घरात राहून राहुन कंटाळा आलाय....जाम बोर किंवा उदास वाटतंय.... याही पुढे जाऊन लोकांना ऐका वेगळ्याच अनामिक भीतीने ताण जाणवू लागला आहे.
ही अनामिक भिती किंवा बैचेनी, नैराश्य जे नेमके कोणत्या गोष्टीमुळे आहे नक्की कळेनासे झाले आहे. आपण कोणत्यातरी मानसिक आजाराने ग्रस्त होत आहे अशी भीती वाटतेय. हे आजार कोणते असे एक ना दोन अनेक प्रश्न लोकांच्या , विद्यार्थ्यांनच्या , पालकांच्या मनात तांडव करत आहेत.
ही प्रलंयघंटा तर नव्हे? माहीत नाही, बहुधा नाहीय, पण एक जाणवतंय की एका नवा इतिहास घडतोय, व आपल्या समोर लिहला जात आहे
असे असताना घरात बंदिस्त लोक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात आहेत, आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी व्यक्ती घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेतो तर कधी शेजाऱ्याकडे किंवा मित्राकडे धाव घेतो. पण लॉकडाऊन मुले हे शक्य नाही किंवा ते हितावह नाही. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांना समर्थपणे सामोरे जाण्याची कुवत सर्वांमध्ये असतेच असे नाही. आणि यामुळे लोकांच्या , विद्यार्थ्यांनच्या , पालकांच्या मनावरचा ताण वाढतच चालला आहे. ज्याच्यात परिस्थितीला सामोरे जाण्याची श्रमता , धेर्य, आत्मविश्वास कमी असतो, अश्यांच्या बाबतीत उधभवणाऱ्या समस्या , योग्य उपचार आणि मार्गदर्शना अभावी गंभीर रूप धारण करू शकतात. परिणामी ताण, निराशा, न्यूनगंड, वैफल्य, भिती, हिंसा, चिंता, अस्थिरता, नैराश्य आणि असुरक्षितता या सारख्या नकारात्मक व विघातक भावनांच्या गर्तेत सापडून व्यक्ती आपले मानसिक संतुलन हरवून बसतो.
थोडक्यात ताण म्हणजे एखादी दबावकारक वा अप्रिय परिस्थिती आली की, आपल्या मनानध्ये त्या परिस्थितीचे क्षणार्धात पूर्वीच्या मानसिक सवयींनुसार विश्लेषण होते.परिस्थितीचे विश्लेषण जेव्हा नकारात्मक, इच्छेविरुद्ध, अपेक्षेपेक्षा वेगळ्या दिशेने वा आपल्या हाताबाहेर अशा दिशेने जाऊ लागते, तेव्हा तणावाला सुरुवात होते. पण आपण वेळीच या प्रक्रियेत सकारात्मक हस्तक्षेप व बदल केले, तर आपण तणावाला मुळाशीच रोखू शकतो.
आताच्या परिस्थितीत जेव्हा सर्व जगावर कोरोनाचे संकट समोर उभेटाकले आहे, आणि त्याची खबरदारी म्हणून सगळे आपापल्या घरात बंदिस्त झाले आहेत. तेव्हा थोडी चिंता किंवा भिती वाटणं साहजिकच आहे. परंतु जेव्हा ही चिंता किंवा भिती सतत जाणवते आणि त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाते तेव्हा त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
ह्या चिंतेचे मुख्य कारण हे असू शकते की आपल्यावर होणारा माहितीचा भडिमार. सोशल मीडिया,- जसे वॉटसप, फेसबुक, TV, न्युझपेपर, यावर येणारी कॊरोनाची माहिती, 'इतके रुग्ण वाढले, इतके रुग्ण मृत्यू पावले,' उपासमार, घरापासून दूर अडकले, नोकरी गमावणे, यासारख्या माहितीमुळे ताण वाढतोय.
स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी रोजची नवीन माहिती अवगत असणे गरजेचे आहे. परंतु पुन्हा पुन्हा wattsup पाहणे, दर दोन मिनीटांनी येणारी ब्रेकिंग न्यूज पाहणे, या सगळ्यांनी मानसिक अनामिक भिती निर्माण होते.तेंव्हा आपण ही माहिती दिवसातुन फक्त एक किंवा दोनदाच जाणून घ्यावी. जेणे करून आपण अपडेट तर राहूच पण अकारण चिंता वाढणार नाही.
सोशल मीडिया-wattsup, facebook, चा वापर नातेवाईकांशी ,मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी करावा. थोडक्यात सोशल डिस्टन्स हा नियम पाळत संवाद चालू ठेवावा.
व्यसनाधीन लोकांना या अनामिक भिती व बेचैनी मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे झोप न लागणे, हात पाय थरथर कापणे, एकट्यानेच बडबड करणे, चिडचिड करणे, शिवीगाळ करणे, गृहलक्ष्मीला मारहाण करणे, मुलांवर खेकसने यासारख्या घटना समोर येत आहेत.
अशी लक्षणे दिसून येत असतील तर मात्र त्वरित समुपदेशकाशी किंवा मानसतज्ञांशी संपर्क साधावा. परंतु कधी कधी व्यसन करणाऱ्या व्यक्तीत मध्ये वरील लक्षणे दिसत नाही त्यानी संधी समजुन व्यसनांपासुन दूर जाण्यासाठी प्रयत्न करावा.
अशा परिस्थितीत पुनःपुन्हा व्यसन करण्याची इच्छा झाल्यास, त्या व्यक्तीने भरपुर पाणी प्यावे, निबू सरबत , शिकजी प्यावी, जेणे करून तल्लफ दूर होईल. तसेच तंबाखूचे सेवन करणार्यांनी लवंग, जेष्ठमध ,बडीशोप, वेलदोडा, मनुके या सारख्या पर्यायाचा वापर करावा. ज्या मुले नुकसान होणार नाही व तल्लफ दूर होईल.
लॉकडाऊन मुले लोकांना वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरगुती हिंसाचार , आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरतर पहता कोणती ही व्यक्ती, एका क्षणी आत्महत्येचा विचार करते आणि दुसऱ्या क्षणी आत्महत्या करते असे होत नाही, बऱ्याच वेळा ती व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्ती जवळ "मला मरावेसे वाटते" असे बोलून दाखवतो, वागणुकीत बदल दिसून येतो,जसे ऐकटे ऐकटे राहणे, इतरांशी संवाद न साधने, अचानक अथवा सतत चिडचिड करणे, हे बदल कुटुंबातील व्यक्ती ओळखु शकल्या तर आत्महत्या निश्चितच रोखल्या जाऊ शकतील.
या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य ही आशा अनेक कारणांनी बिघडत चालले आहे.
या साठी NCERT न्यु दिल्ली व SCERT पुणे यांनी समुपदेशक नियुक्त केले आहे तरी गरजुनी त्याचा लाभ घ्यावा.
या लॉकडाउनच्या काळात ज्यांना खालील लक्षणे जाणवत असतील त्यांनी समुपदेशकाशी संपर्क साधावा.
लक्षण-
1. झोप न लागणे
2. एकटे एकटे वाटणे
3. कुणाशी ही न बोलणे
4. भूक कमी किंवा जास्त लागणे
5. सतत कंटाळवाणे व उदास वाटणे
6. अनामिक भिती वाटणे
7. सतत छातीत धडधड होणे
8. रडावेसे वाटणे
9. सतत चिडचिड होणे
10. बैचेनी किंवा चिंता
11. सतत स्वंशय येणे
12. मरून जावे असा विचार येणे
13. सतत डोके दुखणे
14. स्क्रीन एडिकट होणे
15. पटकन खूप राग येणे
16. स्वतःशीच बडबड करणे
आज आपण एका महत्वाच्या transition time मध्ये आहोत म्हणजे असे की आता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरिता एक प्रकारचं Once in a lifetime घटना आहेत. या वेळेत संयमित विचारांचा घोडेस्वार आपल मन ताब्यात ठेवू शकतो.
उपाय-
1. परिस्थितीचा स्वीकार
2. नियमित व्यायाम
3. मेडिटेशन, प्राणायाम
4. कुटुंबातील व्यक्तीशी सुसंवाद
5. Affirmative वाक्यांचा वापर करणे
6. जुन्या आनंददायी आठवणींना उजाळा व शेरिंग
7. गोष्टीची शाळा व हास्याचे फवारे ( जोक्स व गोष्टी ऐकणे)
8. विविध घरगुती खेळ खेळणे( बुद्धिबळ, लुडो, सारीपाट, सापसीडी, गाण्यांच्या भेंड्या इ.)
9. गृहकार्यात मदत करणे
10. सुंदर , आध्यत्मिक, मजेदार, गमतीशीर लेखन वाचणे( पु.ल. देशपांडे लिखित पुस्तके, गीता पठण)
11. रोजचे स्वतःचे सकारात्मक किंवा नाकारत्मक विचार डायरीत लिहणे.
12. मित्र मैत्रिणीशी व नातेवाईकांशी गप्पा मारणे.
13. चित्र व कला जोपासणे
14. आपला छंद जोपासणे( ग्रीटिंग तयार करणे)
अधिक माहितीसाठी खालील फोन नंबरवर फोन किंवा wattaup करू शकतात.
लिना चौधरी (9503087116)
समुपदेशक
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगांव
NCERT व SCERT RECOGNIZED