26/03/2026
मी बेबीताई कांबळे रा. माधवनगर सध्या माझे वय 78 वर्ष असून दहा वर्षापूर्वी माझ्या उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते.
आता दुसऱ्या डोळ्याची ऑपरेशन करणे गरजेचे होते. त्यामुळे मी सांगलीतील अनुराधा सुपर स्पेशलिटी आहे हॉस्पिटल येथे तपासणी करून घेतली व मोतीबिंदू चे ऑपरेशन करून घ्यायचं निर्णय घेतला.
हॉस्पिटल मधील स्टाफ हा अत्यंत प्रेमळ तसेच संपूर्ण काळजी घेणारा स्टाफ आहे. माझी सून याच हॉस्पिटलमध्ये गेली दहा वर्षे पासून कामास आहे. त्यामुळे आम्हाला हे हॉस्पिटल अगदी घरासारखे वाटते. डॉ. किल्लेदार सरांच्या बद्दल तर काय सांगावे अत्यंत गुणी असे व्यक्तिमत्व.....
सर्वांना समजून घेऊन आपुलकीने त्यांची चौकशी करून त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन खूप छान पद्धतीने ते ऑपरेशन करतात हा त्यांचा नावलौकिक आहे. म्हणून मला डॉक्टर किल्लेदार सर व त्यांच्या हॉस्पिटल बद्दल कवितेतून चार ओळी सांगाव्याशा वाटतात.
!!किल्लेदार सरांच्या पुण्यकर्मी हाताने माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आणि मन आनंद हर्षाने भरून गेले!!
नव्या नजरेने आगमन केले म्हणून मला हे स्वच्छ सुंदर जग पाहता आले!!
अनुराधा सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जनसमुदायाचा आशीर्वाद आहे मोठा आणि गुण कर्तुत्वाने बाप सवयी घडो किल्लेदार सरांचा बेटा!!
जाता जाता अवतीभवती वळून पाहूया जरा!!
वाया जाणारी दृष्टी गरजू लोकांना दान करा गरजू लोकांना दान करा.!!!!
मला या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्याचे भाग्य मिळाले त्यामुळे मी सर्वांची अत्यंत आभारी आहे धन्यवाद 🙏