26/08/2022
्नसमाज(©डॉ अर्चना बेळवी)
अवंती आणि अविनाश च्या लग्नाला 3वर्षे झाली होती. गेले वर्षभर प्रयत्न करूनही अवंतीला गर्भधारणा होत नव्हती PCOD आणि अनियमित येणारी पाळी हे त्याचे कारण होते आता प्रेग्नंन्सी राहावी म्हणून उपचार करणे गरजेचे होते आणि या उपचारांसाठी लागणारा सारा खर्च अवंती च्या माहेरच्यानी करायचा यावर अविनाश ची आई ठाम होती .लग्न ठरताना ,"अवंती ची पाळी व्यवस्थित येते ना?"असे सासूने तिच्या आईला विचारले होते तेव्हा तिच्या आईने तिची पाळी अगदी नीट आहे असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात अवंतीला दीड दोन महिन्यातून एकदा पाळी येत असे ; तिला PCOD ची सारी लक्षणे होती यावरुन आम्ही लग्नापूर्वी स्पष्ट विचारले असताना सुध्दा आमची फसवणूक झाली त्यामुळे आता सारा खर्च अवंती च्या माहेरच्यानी केला पाहिजे असे तिचे ठाम मत होते.
दुसरे उदाहरण लतिका चे .. लतिका ला PCOD चा त्रास होता . त्याबद्दल ची तिला विस्तृत माहिती होती . या सगळ्याची तिने इतकी धास्ती घेतली होती की ती लग्नाला च तयार नव्हती ... लग्न, त्यानंतर मुलं होण्यासाठी घ्यावी लागणारी ट्रीटमेंट या चक्रात तिला अडकायचे नव्हते
'शमिका' ही स्टेज शो करणारी आर्टिस्ट होती ... त्यामुळे अनियमित झोप, अनियमित खाणे इत्यादी नेहमीचेच .. तिला PCOD चा त्रास होता आणि त्यामुळे अंगावर , चेहऱ्यावर येणारे केस तिच्या profession मध्ये तिचा look बिघडवत असत. तिला PCOD साठी दिलेली हॉर्मोन्स ची ट्रीटमेंट तिला अगदी परफेक्ट लागू पडली होती पण आता तिला त्या गोळ्यांची इतकी सवय झाली होती की 8 वर्षे झाली तरी ती त्या गोळ्या थांबवायला तयार नव्हती.
PCOD किंवा PCOS हा असा आजार आहे जो केवळ मुलींच्या मध्ये शारीरिक बदल च घडवतो असे नाही तर वर दिलेल्या उदाहरणा प्रमाणे मुलींच्या मनावर ही त्याचा परिणाम होत असतो.
अनियमित येणारी पाळी, वाढणारे वजन, अंगावर मानेवर चेहऱ्यावर येणारे जास्ती चे केस , पिंपल्स, मानेच्या मागे, काखेत येणारा काळेपणा ही लक्षणे दिसत असतील तर वेळीच योग्य त्या तपासण्या करून PCOD आहे का?याचा शोध घेतला पाहिजे .
सोनोग्राफी , पेशंटला असणारी लक्षणे आणि काही हॉर्मोन्स च्या रक्त चाचण्या यावरुन PCOD चे निदान (diagnosis) केले जाते .
'जीवनशैलीतील बदल' ही pcod ची महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. पुरेशी झोप, व्यायाम आणि योग्य आहार ही त्रिसूत्री pcod बरा होण्यासाठी पाळणे गरजेचे !
स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली योग्य औषधे चालू करणे हितावह आहे
आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट...आपल्याला किंवा आपल्या मुलीला PCOD आहे या वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्या दृष्टीने पुढची दिशा ठरवली पाहिजे
1. नियमित व्यायाम - ४५ मिनिटे रोजचा व्यायाम ज्यामध्ये पळणे( running) आणि पोटाचे व्यायाम आवश्यक आहेत
2. आहार - सकस आहार पण तेल , तूप आणि गोड अगदी कमी खाणे गरजेचे आहे
3. पाळी ची योग्य नोंद ठेवणे गरजेचे आहे निदान दोन महिन्यातून एकदा तरी पाळी यायला हवी
4.लग्न करायचे असल्यास योग्य वयात लग्नाचा विचार करायला हवा.
5. मूल हवे असल्यास लग्नानंतर जितके लवकर शक्य असेल तितके लवकर पहिल्या मुलाचा विचार करावा . Pcod मध्ये प्रेग्नंन्सी राहण्यास वेळ लागणे, अबोर्शन होणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात त्यामुळे मुलाचा विचार लवकर करणे योग्य.
6.pcod असण्याऱ्या स्त्री मध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची
इच्छा( sexual desire), योनी मार्गातील ओलसरपणा(lubrication) उद्दीपित होणे(arousal) आणि यातून मिळणारे समाधान( sexual satisfaction) या सगळ्यावर हॉर्मोन्स कमी जास्त असल्यामुळे परिणाम होतो असे दिसून आले आहे.
7.वाढलेले वजन आणि नको असलेले केस (hirsutism)या गोष्टी नी sexual desire कमी होते असे दिसून आले आहे
8. या सगळ्याचा परिणाम स्त्री च्या वैवाहिक जीवनावर किंवा लैंगिक जीवनावर होऊ शकतो.
9. Pcod चे उशिरा दिसणारे परिणाम म्हणजे डायबेटीस , ब्लड प्रेशर आणि Ischimic heart disease.... त्यामुळे व्यायामाला पर्याय नाही.
म्हणून मला असे वाटते की pcod असणाऱ्या मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी घाबरून न जाता डोळसपणे या सगळ्याचा विचार करावा आणि योग्य वेळी योग्य गोष्टी करण्याला महत्त्व द्यावे .
डॉ अर्चना बेळवी
PCOD व स्त्री रोग तज्ञ
नंदिनी क्लिनिक वानवडी
पुणे