22/09/2025
*PROBLEMS अनेक, SOLUTION एक : संमोहन उपचार (HYPNOTHERAPY)*
आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक समस्या वेगाने वाढत आहेत. आपण डोळ्यांना त्रास झाला तर डोळ्यांना चष्मा लावतो,रक्तदाब चढ-उतार झाला तर रक्तदाब मोजतो, हृदयाची तपासणी करतो, शारीरिक जखम झाली तर ती दाखवू शकतो पण मन थकलेलं असेल तर?,मनाच्या वेदना कशा दाखवणार? मानसिक त्रास कसे सांगणार? सांगितल्यावर ते पटतील का? लक्षात घ्या तुमचं मन त्याला होणारा त्रास ते अश्रूंमध्ये सांगतं, चिडचिडीतपणातून व्यक्त होतं, किंवा शांततेच्या मागून झुरत राहतं. अनेकदा आपल्याला समजतंच नाही की आपण मानसिक आजाराच्या विळख्यात अडकत चाललो आहोत.
*तुम्हालाही मानसिक मानसिक लक्षणे तुमच्यात दिसतात का?*
खालील लक्षणांपैकी लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही मानसिक आरोग्याच्या बाबतीत सिरीयस होणे आवश्यक आहे.
▪️रात्री शांत आणि गाढ झोप लागत नाही.
▪️कोणत्याही कामात लक्ष लागत नाही.
▪️सतत छातीत धडधड होते, थोडं काही झालं तरी घाबरायला होतं.
▪️पोट बिघडतं, कधी भूकच लागत नाही, कधी वारंवार शौचास होतं.
▪️डोके सतत जड वाटतं, मायग्रेन वाढतो.
▪️चिडचिड, राग, असहायता जाणवते.
▪️कुणाशी बोलायची इच्छाच होत नाही, एकटं वाटतं.
▪️भूतकाळाच्या आठवणी सतावतात, आणि मनात नकारात्मक विचारच फिरत राहतात.
▪️शरीर थकलेलं वाटतं, तरी झोप झाली तरी फ्रेश वाटत नाही.
▪️वारंवार आजारी पडता पण तपासणीत काही सापडत नाही. रिपोर्ट नॉर्मल असतात.
जर या लक्षणांपैकी चार किंवा अधिक लक्षणं तुमचं आयुष्य व्यापून टाकत असतील, तर ही मानसिक त्रासाची लक्षणं आहेत हे ओळखा.
*वेळेवर उपचार घेणे का आवश्यक आहे ?*
मानसिक त्रास हे फक्त “मनातलं काहीतरी” नसून त्याचे खोल परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होतात. संशोधन सांगतं की सुमारे ७०% पेक्षा जास्त शारीरिक आजारांमागे मानसिक कारणं असतात, रक्तदाब, पचनतंत्राचे विकार, त्वचाविकार, हृदयविकार, निद्रानाश यामध्ये तणाव मोठं कारण असतो. या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास नातेसंबंध बिघडतात, कामकाजावर परिणाम होतो आणि शेवटी आयुष्याचा आनंद हरवतो.
*उपचाराचा प्रभावी पर्याय: संमोहन उपचार (Hypnotherapy)*
सध्याच्या काळात संमोहन उपचार ही मानसिक त्रासांवरची एक अत्यंत प्रभावी आणि आधुनिक उपचारपद्धती मानली जाते. संमोहन म्हणजे मनाच्या खोल पातळीवर पोहोचून, त्यातील नकारात्मक विचार, जुने अनुभव, भय, चिंता यांना समजून घेऊन त्यात सकारात्मक विचारांची पुनर्स्थापना करणं. यामध्ये औषधं लागत नाहीत, साइड इफेक्ट्स नसतात.
*उपचारानंतर:
▪️झोप सुधारते,
▪️पचन सुरळीत होतं,
▪️शरीर आणि मन दोन्ही हलकं वाटतं,
▪️आत्मविश्वास वाढतो,
▪️भीती आणि चिंता दूर होतात.
*मनोजप्रमाणे तुम्ही एक योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.!*
मनोज, वय ३८. एक कुटुंबवत्सल, जबाबदार आय टी इंजिनियर. पण गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तो खूप अस्वस्थ होता. सतत चिडचिड, झोपेची तक्रार, अपचन, छातीत धडधड असे त्रास त्याला व्हायचे पण तपासण्या केल्यावर मात्र डॉक्टरांचे रिपोर्ट्स मात्र नॉर्मल! नोकरीत मन लागत नव्हतं, घरात संवाद हरवला होता. त्याचं म्हणणं होतं, “माझ्यात काही बिघडलं आहे, पण कुणाला ते कळत नाही. मला काहीतरी होतंय.”
एक दिवस त्याच्या पत्नीने वर्तमानपत्रात लेख वाचला, “मानसिक त्रासांना लपवू नका, त्यावर उपचार घ्या. आनंदी रहा” त्या लेखातून त्यांनी साई स्नेह माइंड हिलींग आणि वेलनेस सेंटर, कात्रज येथे संपर्क केला.तेथे संमोहन उपचाराची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच सेशनमध्ये मनोजला असं वाटलं की कुणीतरी त्याला समजून घेतंय. त्याचा त्रास समजून घेतंय, यामागे पण वैज्ञानिक कारणे आहेत. आठवड्याभरात झोप सुधारली, दोन आठवड्यांत एक एक करत त्याचे त्रास कमी होत गेले, दीड-दोन वर्षांचा त्रास महिन्याभरात कमी झाले. आज मनोज सांगतो, त्याला जसे त्याचं जीवन जगू इच्छित होता तो जगतोय.
लक्षात घ्या, वेळ वाया घालवू नका! मन थकलंय, हरवलंय, सतावलंय हे मान्य करा. मानसिक त्रास ही लाज वाटण्याची गोष्ट नाही. हे समजून घ्या, त्यांना स्वीकारा आणि उपाय करा. Anxiety, तणाव, चिंता, नैराश्य यावर संमोहन उपचार एक प्रभावी, नैसर्गिक आणि शाश्वत उपचारपद्धती आहे.
तुमचे मन निरोगी, तर तुमचं आयुष्य आनंदी हीच खरी प्रगती आहे. तणाव व्यवस्थापन, समुपदेशन, मनोविकास मार्गदर्शन आणि संमोहन उपचारसाठी आमच्या सेंटरला नक्की भेट द्या.
*साई स्नेह माइंड हींलिंग अँड वेलनेस सेंटर, पी.एम.टी. बस डेपोसमोर, कात्रज,पुणे.*
सम्पर्क : 8888150101
*लेखक : मल्हार शिंगाडे* (सायकॉलॉजिस्ट आणि हिप्नॉथेरपिस्ट)
मोबा. 9960631066