23/07/2022
डॉक्टर साहेब, माझा बीपी नेहमीच 180 च्या वर असतो
माझ्या कडे अस म्हणणारे बरेच रूग्ण येत असतात, ज्यांच्या ब्लड प्रेशर मी तपासतो आणि त्यांना सांगितले की मला असले उत्तर मिळते....नक्कीच हा आपला स्वभाव आहे...
एक उदाहरण देतो समजा आपल्या घराच्या बाजूला घाणीचे साम्राज्य आहे आणि नेहमीच त्याची दुर्गंधी येते तर आपण या बाबतीत ही दुर्गंधी नेहमीच येते म्हणून हाता वर हात ठेवून बसू का, नक्कीच नाही आपण त्याचा ताबडतोब काही न काही इलाज करून त्या दुर्गंधी पासून मुक्त होऊ कारण असल्या घानी च्या साम्राज्य मूळ आपल्या परिवाराचे आरोग्य धोक्यात येईल....
उदाहरण द्यायचं कारण हेच की वाढलेला बीपी हा शरीरात साचलेल्या घाणी सारखाच असतो ज्याने आपल्या आरोग्यास धोका असतो...
वाढलेला बीपी एका वळवी प्रमाणे आपले शरीर पोखरून काढते आणि 90% शरीराचं नुकसान होई पर्यंत आपल्याला काहीच त्रास होत नाही, जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा वेळ हातातून निघून गेलेला असतो पण त्रास होऊ नये म्हणून मग आपण बीपी च्या गोळ्या सुरू करतो...
म्हणून आधीच जर व्यवस्थीत गोळ्या जर घेतल्या तर नक्कीच उच्च रक्ताबामुळे आपल्या शरीराचे नुकसान होणार नाही...
आधी काहीच त्रास नव्हता आणि आत्ताच सगळ झाल असे उदगार काढण्या आधी आपण कुठे तरी आपल्या तब्बेती बद्दल दुर्लक्ष केलेले असतेच....
मला तुम्हाला भीती दाखवायची नाही पण सत्य परिस्थिती ची जाणीव करून द्यायची होती...
कृपया काळजी घ्या आणि निरोगी रहा...
धन्यवाद
आपला
डॉ विजय च-हाटे
एम एम बी एस
एम डी (मेडीसीन)
मातोश्री हॉस्पिटल, मेहकर