07/09/2021
https://m.youtube.com/watch?v=Z2F72eLSt-g
ऋत्विक हर्बल प्रॉडक्ट्स यांचे पारंपरिक "रजगुनी तेजोमय सुगंधी उटणे"
तेज आप आणि वायुवर्धक उटणे चैतन्य फलप्राप्तीच्या दृष्टीने अधिक लाभदायक!
ऋत्विक हर्बल प्रॉडक्ट्स यांचे सुगंधी उटणे आहे तब्बल १० नैसर्गिक वन औषधींचा गुणांनी युक्त पारंपरिक सुगंधी उटणे..
उद्वर्तन वातहरं कफमेदोविलापनम्।
स्थिरीकरणमड्गनां त्वक्प्रसादकरं परम्॥
सिरामुखविवि'त्वं त्व'स्थस्याग्नेश्च तेजनम् ॥
वेळ असल्यास सुरुवातीला सर्वांगास तेल लावून मग उटण्याने मर्दन करून स्नान करावे. अन्यथा इतर दिवशी उटणे वाटीत काढून पाणी यामध्ये 15 मिनिटे उटणे भिजवावे. ते चांगले भिजले की थोडया वेळानंतर सर्वांगास घासून उटणे लावावे. या मर्दनाने त्वचेची रंध्रे मोकळी होतात. सर्वांगाचे मर्दन होईपर्यंत त्वचेच्या बाकी भागांवर असलेले उटणे त्वचेवर राहिल्यामुळे त्याचे चांगले शोषण होऊन त्वचेला लाभ मिळतो. मर्दनानंतर शरीरास सहन होईल इतक्या गरम पाण्याने स्नान करावे. अशा पध्दतीने शुध्द सुगंधी औषधींनी निर्मित उटण्यासह शाही स्नानाचा अनुभव घ्यावा.
आपल्या गडबडीत स्वत:साठी विशेष वेळ काढून त्वचेची काळजी घेणे आपण केव्हाच बंद केले आहे. जुन्या, लहानपणीच्या तेलापाण्याच्या अंघोळी, सुगंधी उटण्याने पाठ रगडून घेणे हे सगळे अगदीच कालबाह्य होण्याआधी पुन्हा त्या आठवणींचे जतन करू या.
उटणे हे फक्त स्त्रियांनीच लावावे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. उद्वर्तन विधी फक्त स्त्रियांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीही आहे. आयुर्वेद शास्त्र जेव्हा लिहिले गेले, तेव्हा कोणतीही आधुनिक उपकरणे/यंत्रे नसतानाही मानवी शरीराचा व चिकित्सेचा अत्यंत सूक्ष्म विचार केला गेला आहे. आपण आज आधुनिक विज्ञानाने सांगितलेली Skin rejuvenation cycle बघतो, त्यातल्या मृत पेशींच्या स्तराच्या एक्सपोलिएशनचाचा विचार आयुर्वेदाने लेप, उद्वर्तन या क्रियेतून आधीच मांडला आहे. आपण इतर अधुनिक प्रक्रियांद्वारा त्वचेचा पोत सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अभ्यंग-उद्वर्तनाचा दिनचर्येत समावेश केला, तर अशा कोणत्याच प्रक्रियांची त्वचेला गरज पडणार नाही.
ऋत्विक हर्बल प्रॉडक्ट्स यांचे पारंपरिक "रजगुनी तेजोमय सुगंधी उटणे"तेज आप आणि वायुवर्धक उटणे चैतन्य फलप्राप्तीच.....