17/01/2026
विज्ञान प्रदर्शनात ‘समस्या व उपाय’ या थीमवर आधारित १३० प्रयोगांचे सादरीकरण
मुंबई माता बाल संगोपन संस्थेचा उपक्रम उत्साहात संपन्न
मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या वतीने आज भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे मानद सचिव डॉ. माधव साठे यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने मोठ्या उत्साहात राबवला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच समाजातील विविध समस्या ओळखून त्यावर शास्त्रीय व व्यवहार्य उपाय सुचवणारे भावी शास्त्रज्ञ घडवणे, हा या विज्ञान प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे.
यावर्षी विज्ञान प्रदर्शनासाठी ‘समस्या व उपाय’ ही अत्यंत समर्पक व सामाजिक भान जागवणारी थीम ठेवण्यात आली होती. या थीमनुसार पाणीटंचाई, प्रदूषण, ऊर्जा बचत, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, शेती व पर्यावरण यांसारख्या विषयांवर आधारित एकूण १३० नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. प्रत्येक प्रयोगामध्ये समस्या स्पष्ट करून त्यावर शास्त्रीय व व्यवहार्य उपाय मांडण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांची विशेष दाद मिळाली.
संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या डॉ. पवार उपस्थित होत्या. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण शीतल चासकर, सुप्रिया चकाते, तनुजा चव्हाण, अश्विनी देवकर, पल्लवी कुरडले, प्रथमेश वेव्हाळे व आदेश बोऱ्हाडे यांनी केले.
🏆 परितोषिक विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे :
🔹 गट : इयत्ता १ ली ते ५ वी
प्रथम पारितोषिक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जालिंदर नगर
प्रयोग : स्मार्ट व्हिलेज
🔹द्वितीय पारितोषिक : के. टी. एस. इंग्लिश मीडियम स्कूल
प्रयोग : ऑटोमॅटिक वॉटर सप्लाय
🔹तृतीय पारितोषिक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खरपुडी
प्रयोग : कडबा कुट्टी
🔹उत्तेजनार्थ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकी
प्रयोग : जैविक सापळा
🔹 गट : इयत्ता ६ वी ते ८ वी
🔹प्रथम पारितोषिक : के. टी. एस. इंग्लिश मीडियम स्कूल
प्रयोग : डिजिटल मोटार कंट्रोल
🔹द्वितीय पारितोषिक : के. टी. एस. इंग्लिश मीडियम स्कूल
प्रयोग : फिजिओ इलेक्ट्रिसिटी टाईल
🔹तृतीय पारितोषिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई विद्यालय
प्रयोग : एअर पॉल्युशन कंट्रोल
🔹उत्तेजनार्थ : ज्ञानवर्धिनी विद्यालय, चाकण
प्रयोग : अपघात प्रतिबंधक प्रकल्प
🔹 गट : इयत्ता⁶ ९ वी ते १२ वी
🔹प्रथम पारितोषिक : भैरवनाथ विद्यालय, दोंदे
प्रयोग : अॅग्रीकल्चर प्रोजेक्ट
🔹द्वितीय पारितोषिक : आर्य स्कूल, चांडोली
प्रयोग : चार्जिंग पॉइंट
🔹तृतीय पारितोषिक : के. टी. एस. इंग्लिश मीडियम स्कूल
प्रयोग : रेंज कंट्रोल वॉटर टॅप
🔹उत्तेजनार्थ : रेणुका माध्यमिक विद्यालय, रासे
प्रयोग : स्मार्ट फाईल
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सुर्वे यांनी केले, तर वर्षा पवार यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शर्मिला सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या माता-बाल सर्व टीमने उत्कृष्टरीत्या करून विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडले.
या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळून समाजोपयोगी संशोधनाची दृष्टी विकसित होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.