20/10/2021
शास्त्रात ‘गोमय वसते लक्ष्मी’ असे विधान आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या, मुरबाड तालुक्यात कुड्याची वाडी, उंबरवाडी, वाघाची वाडी अशा २५-३0 वनवासी वाड्या आहेत. हे वनवासी/ आदिवासी फायदा-तोट्याचा विचार न करता, परंपरांचे पालन करत देशी गाई सांभाळतात. कुटुंब लहान व पैशाची अडचण असली तरी प्रत्येक घरी १५-२० गाई असतात.
देशी गाईंच्या संवर्धनाला चालना व वनवासी बांधवांना आर्थिक मदत मिळावी म्हणून संघाकडून वनवासी जनांना शेणापासून विविध प्रकारच्या उपयुक्त वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या २-३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. वनवासी दिवे, पणत्या, सामरानी कप ई.वस्तू बनवतात, आपण त्यांना विकायला मदत करतो. यामुळे २ गोष्टी साध्य होतात-
१) ख्रिस्त्यांचे वाड्यांवर यायचे प्रमाण कमी होवून धर्मांतरणाला आळा बसला
२) देशी गाईंच्या पालनाला हातभार लागतो.
आपला फायदा : या वस्तू स्वस्त आहेत. धुळ, वहानांच्या व फटाक्यांच्या धुरामुळे दुषीत झालेल्या वातावरणाची शुद्धी, कुंड्यातील झाडांसाठी खत
सर्वांनी एकत्र येवून आपले पर्यावरण आणि देशी गाय वाचवूया.
ll जय श्रीराम ll