09/04/2020
आज लोक १० रुपयाच्या तंबाखु साठी ५० रुपये मोजत आहेत आणि ते पण गपचुप... पण इकडे मेडिकल वाल्याकडून चुकून १ रुपया जास्त घेतला गेला की समोरचा असा बगतो की त्याचा जीवच मागितला आहे, जर चुकून कधी होणार नाही पण मेडिकल वाल्यांना तंबाखु विकायला परवानगी मिळाली अन जर १० ची पुडी ५० ला विकली ना तर अगदी सगळ्या सरकारी यंत्रणा येतील चौकशी करायला आणि समाजकंटक पण अशी अरेरावी करतील की सांगायला नको..... हे लिहिण्या मागचा हेतू म्हणजे आम्हाला तंबाखु विकायची परवानगी हवी आहे असे नाही पण बारीक विचार केला तर मेडिकल चालु करायचे असेल तर किती कागद पत्र द्यावे लागतात किती नियम पाळावे लागतात आणि चालू झाल्यावर तर हे रेकॉर्ड सांभाळा ते रेकॉर्ड सांभाळा हेच नियम पाळा तेच नियम पाळा आणि नाही पाळले तर एखादा शेंबडा पण धमकी देऊन जातो बगतोच तुला, म्हणजे इमानदारीत व्यवसाय करा तर करा आणि नालायक लोकांचे ऐकून पण घ्या, मध्यंतरी एका मोठया कलाकाराने काही नालायक लोक(मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या लोकांचा) नफ्या विरोधात कार्यक्रम घेतला होता, तसा विचार केला तर प्रत्येक व्यवसायात अशी टाळूवरचे लोणी खाणारे लोक असतातच, पण त्या कार्यक्रमामुळे लोकांनी सरसकट सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, त्यामुळे जो येईल तो शेम्बडा पण म्हणतो एवढे मार्जिन असते तुम्हाला मग द्या की १५% ते २०% डिस्काउंट अगदी ज्या प्रॉडक्ट ला ८ ते १३% मार्जिन असते त्यात सुद्धा. त्यात पण भरपूर असे महानग आहेत जे अश्या प्रॉडक्ट वर पण डिस्काउंट देतात(नक्की ते खरा खुरा प्रोडक्ट विकतात की नाही माहिती नाही). असो हा विषयच वेगळा आहे बोलेल तेवढे कमी आहे मुद्याचे बोलायचे म्हणजे मेडिकल वाला सगळे सरकारी नियम पळून सगळ्या नियमांना धरून इमाने व्यवसाय करतोय तर लोक त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत आहेत. आणि काही व्यावसायिक अगदी शॉप ऍक्ट न काढता सुद्धा काहीही अगदी कितीही किमतीला विकत आहेत त्यांना काहीच नियम नाहीत का, वरती मी साधे तंबाखु चे उदाहरण दिले आहे एक वेळ माणसाला औषध नाही दिले तरी चालेल पण वेळेला तलफ भागवायला तंबाखु हवीच, मग तंबाखु पण आलीच ना अत्यावश्यक वस्तूत🙂 (ज्याचे त्याने ठरवावे वाटले म्हणून बोललो) मग ती का नाही कमी किमतीत!! असो तो माझा विषय नाही.
आताच्या कोरोनाच्या दिवसात ते थोर कलाकार सुद्धा दिसेनासे झालेत ज्यांनी सामान्य मेडिकल वाल्याला लुटारूच्या भूमिकेत मांडले होते, कुठे तरी वाचण्यात आले होते की त्यांनी काहीतरी मदत केली आहे मुख्यमंत्री मदत निधीत पण नक्की माहिती नाही. आता कुठे गायब आहेत देव जाणे जेव्हा सगळे अत्यावश्यक सेवेत मदत करत आहेत आणि त्यांच्या पाठीवर साधी कौतुकाची थाप द्यायलाही विसरलेत. नंतर मात्र परत येतील मेडिकल वाल्यांनी कसे सामान्य लोकांना लुटले हे दाखवायला. जाऊद्या हा विषय इथेच सोडुन पुढे जाऊयात.
आता ऑनलाईन वाले सुद्धा कुठे मेले आहेत जेव्हा लोकांना संचार बंदी मध्ये बाहेर पडता येत नाहीये आणि घरपोच औषधांची गरज आहे तेव्हा, पण यावेळी लोकांनी समजून घ्यायला हवे की अश्या आणीबाणी च्या वेळी त्यांना जवळचा मेडिकल वालाच कामाला आलाय नाकी तो ऑनलाईन वाला जो फसव्या डिस्काउंटच्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल करत आहेत. सामान्य जनतेने या कोरोना च्या परिस्तिथी नंतर आता समजुन घ्यायला हवे की कोन जवळचा आणि कोण वेळेला कामाला आला आणि कोणाला नंतर किती महत्व दयायचे.
हे सगळे लिहिण्याचा अट्टाहास हाच की, कृपया आपल्या जवळील मेडिकल वाल्याला लुटारूखोर न समजता तुमच्या जवळचा च माणुस समजा आणि तुम्ही त्याला सांभाळा तो तुम्हाला आयुष्यभर एकदम मस्त सांभाळेल.
(टीप- मेडिकल वाला हा शब्द बोली भाषेतील आहे त्याला केमिस्ट व ड्रगिस्ट हा कायदेशीर शब्द आहे)
सर्वसामान्य, इमानदार, सामाजिक बांधिलकी असणारा फार्मासिस्ट!!!!!!!😇☺️😊