30/12/2023
आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेणे ही एक वचनबद्धता आहे आणि जागरूकता ही पहिली पायरी आहे.
तुम्हाला तुमच्या मधुमेहाची स्थिती माहीत आहे का? जर होय, तर ते छान आहे! नसल्यास, काळजी करू नका; आजच तुमच्या जवळच्या केंद्राला भेट द्या आणि मधुमेहाची तपासणी करा.
मधुमेहाबाबत जागरुक राहणे अत्यंत आवश्यक आहे कारण आजकाल मधुमेह तरुण पिढीलाही सोडत नाही, त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत सजग व जागरूक राहा.