27/11/2024
हेमंतऋतू मध्ये केल्या जाणारे बस्ती पंचकर्म
बस्ती पंचकर्म - आयुर्वेदातील अर्धी चिकित्सा
बस्ती हि आयुर्वेदातील श्रेष्ठ व वैशिष्टपूर्ण अशी चिकित्सा आहे. ज्या उपक्रमामध्ये गुदमार्गाने औषधी द्रव्ये (यामध्ये काढा , तेल, तुप, दुध वेगळे वेगळे किंवा सर्व एकत्र असू शकते) शरीरात प्रविष्ट केली जातात त्यास बस्ती असे म्हणतात. बस्ती व एनिम यांची तुलना केली जाते. पण दोन्हीत जमीन अस्मानाचा फरक आहे. एनिमा मलनिर्हरणासाठी आहे, तर बस्ती ही मलनिर्हरण करतेच, त्याचबरोबर शारीरस्थ वातदोषाचे संतुलन करते. आयुर्वेदामध्ये वाताचे 80 आणि पित्ताचे 40 विकार सांगितले आहेत या सर्व 120 आजारांमध्ये बस्ती चा खूप छान उपयोग होतो .
बस्ती चे अनेक प्रकार आहेत, प्रत्येक आजारानुसार बस्ती ची औषधें वेगवेगळी असतात .
तोंडावाटे आपली औषध घ्यायची क्षमता खूप कमी असते परंतु तेच औषध जर बस्तीतून दिले तर 60 ml ते 650 ml इतके दिले जाते त्यामुळे त्याचा परिणाम हि जास्त होतो आणि results हि लवकर येतात .
बस्ती चे उपयोग
संधीवात , आमवात , कटीशूल,
मणक्याचे सर्व विकार (spondylitis)
हाडांची झीज
पक्षाधात (Paralysis )
गुडघेदुखी
किडनी स्टोन
मूळव्याध
भगंदर, गुदभ्रंश ( रेक्टाल प्रोलाप्स )
पाळीच्या तक्रारी , गर्भाशयाचे आजार, वंध्यत्व (स्त्री व पुरुष)
पोटावरील फॅट कमी करण्यासाठी
वजन कमी करण्याकरिता
असे बरेच आहेत . सर्व लिहले तर 2 पाने हि कमी पडतील …
बस्ती बद्दल असलेले गैरसमज
गैरसमज 1.
बस्ती घेतला की जुलाब होतात
सत्य -
बस्ती चे जे औषध दिले जाते ते काही प्रमाणात बाहेर पडते तो जुलाब नसतो असे एकदाच होते ,वारंवार नाही
गैरसमज 2.
बस्ती घेतला की खूप थकवा येतो
सत्य -
असे काहीही होत नाही उलट बस्ती ने थकवा जातो आणि आतड्याला चिकटून असलेली घाण बाहेर पडते त्यामुळे उत्साह वाढतो . एक सलाईन लावल्याने जितके बळ वाटले त्यापेक्षा जास्त एका बस्तीने वाढते .
गैरसमज 3.
बस्ती घेण्यासाठी सुट्टी घ्यावी लागते , काम करू शकत नाही
सत्य :-
बस्ती हि 10 मिनिटांची प्रक्रिया आहे त्यानंतर तुम्ही तुमची रोजची कामे सुरळीत करू शकता . सुट्टीची अजिबात गरज नाही
गैरसमज 4.
बस्तीमधून इन्फेक्शन ( infection ) होत
सत्य :- बस्ती मध्ये वापरण्यात येणारी सर्व औषध असतात आणि ती गरम करून घेतलेली असतात त्यामुळे इन्फेक्शन ( infection ) चा प्रश्नच नसतो .
स्थानिक बस्ती :-
स्थानिक बस्ती म्हणजे जिथे त्रास असतो त्याच ठिकाणी पिठाचे आळे करून त्यामध्ये औषधी सिद्ध तैल कोमट करून थोडा वेळ तसेच ठेवले जाते. सांध्यांच्या ठिकाणी हे बस्ती केले जातात. त्या सांध्यांचा त्रास कमी करून तिथली हाडांची झीज भरून येते .
यामध्ये खालील बस्तीचा समावेश होतो
मान्याबस्ती (For Upper Spine )
कटी बस्ती ( For Lower Spine )
मेरू बस्ती (Whole Spinal )
जानू बस्ती ( For Knee Joint )
शिरोबस्ती (For Head & Hair )
हृदय बस्ती (For Heart Disease)
वैद्य हितेश जाधव
निरामय आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटर.
नागपूर.
9730290974
9730290967