NutriWise

NutriWise NutriWise is a online fitness centre We promote the importance of diet towards achieving

04/06/2022

From the wall of a friend:-

M E D I CI N E is not always found In
Bottles
Tablets or
Vaccines

Let us Understand 22 world's Best medicines...

*1 Detoxification*
is a medicine

*2 Quitting Junk Food*
is a medicine

**3 Exercise*
is a medicine.

*4 Fasting*
is a medicine.

*5 Nature*
is a medicine.

*6 Laughter*
is a medicine.

*7- Eating Vegetables And Fruits*
are medicines

*9 Sleep*
is a medicine.

*10 Sunlight*
is a medicine

*11-12 Gratitude & Love*
are medicines

*13 Friends*
are medicines.

*14 Meditation*
is a Medicine.

*15 Being Fearless*
is a Medicine

*16 Postive Attitude*
is a Medicine

*17 Unconditional Love towards all living beings*
is a medicine

*18 Listening*
is a medicine

*19 - 20 Speaking up & Sharing*
are medicines.
*21 Accepting*
is a medicine.

and

*22 Staying in*
*PRESENT MOMENT*
is the
*Best Medicine*👏

29/03/2022

*माठातील पाणी पिण्याचे फायदे*

माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे

👉🏻 माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन असते. शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते.

👉🏻 मातीमध्ये कोणतीही हानिकारक रसायने नाहीत. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही.

👉🏻 नैसर्गिक थंडावा- लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.

👉🏻 मातीचे गुणधर्म- माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

👉🏻 मेटॅबॉलिझम (चयापचय) सुधारते- माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

👉🏻 उष्माघाताला आळा बसतो
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.

👉🏻 घशासाठी चांगले असते
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी अतिथंड नसते त्यामुळे घशासाठी चांगले असते.

मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा.

Cp

21/03/2022

उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -

शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

उपाय ---
१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
१०) प्रत्येक काम सावकाशच करा.
११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.
१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.

# आरोग्य संदेश #

पाणी प्यावे आवडीने,
आजार पळवा सवडीने.
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*

❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄

कलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
लिंबू - थंड
कांदा - थंड
आलं/लसूण - उष्ण
काकडी - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो कच्चा - थंड
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कोथिंबीर/पुदिना - थंड
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
भेंडी साधी भाजी - थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
कॉफी - थंड
पनीर - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी - उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*
Fwd

15/03/2022

*उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*

❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄

कलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
लिंबू - थंड
कांदा - थंड
आलं/लसूण - उष्ण
काकडी - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो कच्चा - थंड
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कोथिंबीर/पुदिना - थंड
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
भेंडी साधी भाजी - थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
कॉफी - थंड
पनीर - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी - उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*

✍🏻 आयुर्वेदातून संकलन
🙏

15/02/2022

*औषध केवळ बाटल्या आणि गोळ्यांमध्येच असतं असं नाही..*

*व्यायाम* हे औषध आहे.
*उपवास* हे औषध आहे.
*निसर्गोपचार* हे औषध आहे.
*खळखळून हसणं* हे औषध आहे.
*भाजीपाला* हे औषध आहे.
*गाढ झोप* हे औषध आहे.
*स्वच्छ सूर्यप्रकाश* हे औषध आहे.
*कृतज्ञता आणि प्रेम* ही औषधे आहेत.
*चांगले मित्र-मैत्रिणी असणं* हे औषधाच दुकान आहे.
*मित्र मैत्रिणीसह गेट टुगेदर* हे औषध आहे.
*कुटुंबासोबत एकत्र जेवण करणे* हे औषध आहे.
*कुटुंबासह सहल* हे औषध आहे.
*सतत आनंदी व हसत मुख असणं* हे औषध आहे
*नियमित योग व ध्यानधारणा करणे* हे औषध आहे.
*कांही प्रसंगी मौन आणि एकांतवास* हे औषध आहे.
🙏🏻 *स्वस्थ रहा निरोगी रहा* 🙏🏻

01/02/2022

*" बाजरी " ..... किती गुणकारी :-*

सध्या थंडीचे दिवस आलेले आहेत. आपण बाजरीची भाकरी खातो, ती फक्त संक्रांती दिवशी न खाता या थंडीच्या तीनही महिन्यांमध्ये खाल्ली पाहिजे.
◼️बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे त्यामुळे हृदय चांगले राहते.
◼️बाजरीतील पोट्याशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
◼️बाजरी मध्ये फायटिक ऍसिड, फेनोल आणि टानिन हे तीन अँटिऑक्सिडंट आहेत.
◼️बाजरीमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.
◼️बाजरीत खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ होते.
◼️बाजरीमध्ये झिंक विपुल असल्यामुळे त्वचा चांगली होते आणि प्रतिकारशक्तीही वाढते.
◼️बाजरीतील फॉस्फरस मुळे हाडे बळकट होतात.
◼️ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी बाजरी खावी.
◼️प्रोटीन भरपूर प्रमाणात देणारी बाजरी थंडीच्या दिवसात रोज खा आणि उत्साही बना.

21/01/2022



आयुर्वेद समज/गैरसमज

1) रोज सकाळी उठल्यावर गार पाणी ,साधे पाणी कोमट पाणी ,लिंबू पाणी,गरम पाणी मध लिंबू,पंचामृत असे पिल्यास शरीर शुद्ध होते आणि अनेक छोटे मोठे त्रास कमी होतात असे कुठे ही आयुर्वेदात म्हणलेले नाही..
2)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये.
3)आयुर्वेदात शाम्पू,conditionar,साबण,फेस पॅक बनवण्याची कृती लिहिलेली नाही.
4) कडधान्ये खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते हा अजून एक गैरसमज आहे.
5)एका आठवड्यात ३ पंचकर्म असे आयुर्वेद सांगत नाही
6)रोज ३,४ लिटर पाणी पिल्यास बाथरूम धुतल्याप्रमाने किडन्या पण धुतल्या जातात..हे आयुर्वेद सांगत नाही.
7)तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे..जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे.
8)आयुर्वेदात बिस्किटांची कृती नाही. आयुर्वेदीक बिस्किटे असा प्रकार अस्तित्वात नाही.ते एक निव्वळ थोतांड आहे
9)स्पा आणि wellness center म्हणजे आयुर्वेद नव्हे.
10)मासिक पाळी च्या वेळी लोणच्याला हात लावू नये ..लोणचे खराब होते हा अजून एक गैर समज आहे.
11) कोणत्याही वस्तूच्या मागे किंवा पुढे आयुर्वेद शब्द जोडला की वस्तू विकण्यास सोपी होते.हा केवळ मार्केटिंग चा फंडा आहे...आयुर्वेदात नसलेल्या गोष्टी आयुर्वेदाच्या नावावर खपवल्या जातात.
12)आयुर्वेदीक औषधांना side effects नाहीत हा एक गोड गैरसमज आहे ..आयुष काढे पिऊन कित्येक लोकांना acidity,piles, तोंड येणे असे अनेक त्रास झालेले प्रत्यक्ष पाहिले आहेत.
13) कोलेस्टेरॉल फ्री वस्तू अस्तित्वात नाहीत .
14)आयुर्वेदीक चहा,tooth paste, तेल, डिटर्जंट हे हर्बल प्रॉडक्ट्स आयुर्वेदाच्या नावाखाली खपवले जात आहेत.
15) आयुर्वेदीक औषधांनी गुण येण्यास वेळ लागतो हा अजून एक गैर समज.. आजार जुना असेल तर कोणत्याही औषधांनी बरा होण्यास वेळ हा लागतोच.
16)Sugar free गोष्टी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही ..असे आयुर्वेद सांगत नाही
17) मंत्रतंत्र, बुवाबाजी,भोंदू वैद्य,रस्त्याच्या कडेला बसणारे हकीम ..हा खरा आयुर्वेद नाही
18) An apple a day keeps a doctor away .. हा सुविचार आयुर्वेदात नाही

Health is Wealth
वैद्य स्वप्ना कुलकर्णी

20/01/2022

*सुंठ*
1) हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.

2) आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.

3) आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते.

4) पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीचूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.

5) आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.

6) आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.

7) सुंठीवाचून खोकला गेला' ही म्हणं असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही हेच त्यातून स्पष्ट होते.

8) आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून खडीसाखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिऱ्यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.

9) सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.

10) याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो. सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे व त्वचेचे विकार असणार्यांनी वापरू नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात जास्त वापरू नये.
*------------------------------------*

11/01/2022

*Medicine Is Not Always Found In Bottles, Tablets or Vaccines*

Detoxification is Medicine
Quitting Junk Food is Medicine
Exercise is Medicine.
Fasting is Medicine.
Nature is Medicine.
Laughter is Medicine.
Vegetables And Fruits Are Medicine.
Sleep is Medicine.
Sunlight is Medicine.
Gratitude And Love Are Medicine.
Friends are Medicine.
Meditation is Medicine.
Being Fearless is Medicine
Postive attitude is Medicine
Unconditional love towards all living beings is Medicine
*ACCEPTING & STAYING IN PRESENT MOMENT IS THE BEST MEDICINE*

29/12/2021

दही आरोग्यासाठी सही

भारतीय घरांमध्ये प्रत्येक प्रांतात दही आवडीने खाल्ले जाते. दही हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे रोज एक वाटीभर नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला तुम्ही दही खाऊ शकता.दही कॅल्शियमचा देखील उत्तम स्त्रोत असल्यामुळे यामुळे हाडे बळकट होतात. तुमच्या पोटाचे आरोग्य दह्यामुळे चांगले राहते उपयोगी बॅक्टेरियाची वाढ तुमच्या आतड्यात होते आणि त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती अनेक पटीने वाढते. दही खाल्ल्यामुळे कॉर्टीसोल या तणावाच्या हार्मोनची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ज्यांना उच्चरक्तदाब आहे त्यांनी रोज दही खावे. रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. हेमामालिनी यांनी आपल्या चिरतरुण दिसण्याचे रहस्य दही आहे असे सांगितले होते. रोज एक वाटीभर घरचे दही खा आणि स्वस्थ, सुंदर रहा.

27/11/2021

🌺 स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?
तर आता आपण जाणून घेऊ की मनाचा,भावनेचा,वीचारांचा,स्वभावचा कसा व कोठे परीणाम होतो........
१).अहंकारामुळे हाडा मध्ये ताठरता निर्माण होते.
२).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे वीकार होतात.
३)अतीराग व चीडचीडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.
४)अती ताण व चिंतेमुळे स्वादुपींड खराब होतो.
५) भीतीमुळे कीडन्या व मुञाशयाला हानी पोहचते.
६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात.
७) आपलतेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दीशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता होते
८) दु:ख दाृबुन ठेवल्याने फुफुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.
९)अधीरता,अतीआवेश,घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.
१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात, कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळे शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग नीर्माण होतो.
११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देते.
१२) स्मित हास्य स्वत:लाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते
१३) हासत खेळत राहील्यास ताणतणाव कमी होतो.
तर मग आता आपल्या रागावर, विचारांवर,भावनेवर,अहंकारावर,स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा.हासत,खेळत,आनंदी ,समाधानी,सुखी,संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.
🌹🌹🌹🌹सुप्रभातम्🌹🌹🌹🌹🙏🙏

27/11/2021

Cp
आहारवेद – आवळा
डॉ. शारदा महांडुळे
आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं.
डॉ. शारदा महांडुळे

आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. िहदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे.
आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. उत्तर व दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं. गुजरातमध्ये पावागड, डांग आणि सापुतारा येथील जंगलात आवळ्याचे वृक्ष मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो.
औषधी गुणधर्म –
cn07आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधामध्ये वापरावे. आवळा चूर्णमध्येही ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
उपयोग –
* खरं तर आम्लधर्मी पदार्थाने पित्ताची वृद्धी होते, परंतु आवळा आम्लधर्मी असला तरी त्याचा विपाक मधुर असल्यामुळे त्याच्या मधुर व शीतल गुणांमुळे त्याच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो. त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर अशा अवस्थेत आवळ्याचा रस प्यावा.
* रक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, मुळव्याधीतून रक्त जात असेल तसंच स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर या सर्व विकारांमध्ये आवळाचूर्ण किंवा आवळा रस घ्यावा.
cn06* आवळा, हिरडा, बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण बनवावं यालाच त्रिफळा चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करून गाळलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. असं केल्याने डोळ्यांचं तेज वाढतं. तसंच रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास साफ होतं.
* जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो.
* केसांच्या तक्रारींवर उदा. केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, केस निस्तेज होणं या सर्वावर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते.
* तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते.
* गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी व सरबत यांचा वापर करावा. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन मळमळ कमी होते.
* नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा.
* आवळा, हिरडा, बेहडा, जांभुळ बी, कडूिलबाचं चूर्ण, गुळवेल व कारली सुकवून त्यांची पूड समप्रमाणात घेतल्यास मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवता येतो. हे चूर्ण मधुमेही रुग्णांनी पाण्यासोबत सकाळ – संध्याकाळ १-१ चमचा घ्यावं.
* नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो.
* ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा हे उत्तम औषध आहे. एक चमचा आवळा चूर्ण नियमितपणे सेवन केल्यास त्वचारोग होत नाहीत.
* नियमितपणे आवळा सेवन केल्यास त्यात असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे हृदय, केस, मांसपेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं व त्यामुळे तारुण्यावस्था जास्त दिवस टिकून ठेवता येते. म्हणूनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषींनी आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतलं. म्हणूनच बाराही महिने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व त्यातून आरोग्य टिकण्यासाठी नियमितपणे च्यवनप्राश सेवन करावा.
सावधानता –
हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप हे आजार झाले असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेले थंड आवळे सेवन करू नयेत. तसंच कच्चे आवळे खाऊ नयेत. यामुळे वरील आजार वाढतो. याशिवाय आवळा कुठल्याही स्वरूपात शरीरास रसायनाप्रमाणे उपयुक्तच आहे. नियमितपणे रोज आवळा किंवा त्याचे पदार्थ सेवन केले तर तुम्हाला डॉक्टरांची गरज भासणार नाही.

Address

Navi Mumbai
410210

Telephone

+918087751240

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NutriWise posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to NutriWise:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category