Abhi nalawde

Abhi nalawde आयुरवेद ज्ञान आयुर्वेदानुसार आहार कसा असावा , आयुर्वेदाच्या अनेक औषधींचे ज्ञान ......

04/10/2021

*चिकनगुनिया*

चिकनगुनियावर ‘रामबाण’ औषधाचे काम करतो ‘हा’ काढा, आहेत अनेक फायदे
चिकनगुनिया हा हंगामी आजारांपैकी एक आहे. या आजाराचा परिणाम एक दोन दिवस नव्हे तर बरीच वर्ष राहू शकतो. अशा परिस्थितीत चिकनगुनियावर योग्य उपचार करून त्याला पूर्णपणे बरे करणे फार महत्वाचे आहे. तुम्ही आयुर्वेदाच्या मदतीने चिकनगुनियाचे मुळापासून उपचार करू शकता आणि त्याचे परिणामही कमी करू शकता. जाणून घेऊया त्या काढ्याबद्दल, जो चिकनगुनियाचा प्रभाव अत्यंत कमी करू शकतो...
चिकनगुनियावर अद्याप कोणताही उपचार नाही आणि त्याच्या उपचाराचे मुख्य उद्दीष्ट ताप आणि वेदना योग्य प्रकारे हाताळणे हे आहे. इंग्रजी औषधांद्वारेही त्याची लक्षणे टाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि चिकनगुनियाचा योग्य उपचार केला जात नाही. यातून आराम मिळवण्यासाठी तुम्हाला बराच काळ त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

*हा काढा आहे खूप फायदेशीर *

आयुर्वेदात चिकनगुनियाच्या लक्षणांबद्दल बरेच उपाय उपलब्ध आहेत, ज्याद्वारे रुग्णाची सांधेदुखी कमी करण्यास मदत होते. तुळस, गुरुती, चिरयिता, यष्टिमधु, काळमेघ, सुष्टी, काळी मिरी, भुआवळा, पपईची पाने, भृंगराज, अडुसा आणि वेलची याचा काढा दिल्याने रुग्णाला फायदा होईल. अशक्तपणा जास्त वाटत असेल तर अश्वगंधा, पला आणि शतावरी यांचे मिश्रण दिल्याने फायदा होईल.

तसेच चिकनगुनिया, डेंग्यू किंवा कोणत्याही विषाणूजन्य आजारात गिलॉयचा रस आणि कडुलिंब, हरसिंगार, तुळस आणि काळमेघची पाने रामबाण सिद्ध होतात. यापैकी कोणतेही एक वापरले जाऊ शकते आणि रिकाम्या पोटी दोनदा समान मिश्रण वापरल्याने रुग्ण बरा होतो.

तसेच डासांची समस्या दूर करण्यासाठी गुगुल, राळ, फ्रँकन्सेस, वचा, राई आणि गिलोय, चिरयिता, मोहरी आणि कडुनिंबाची पाने समप्रमाणात मिसळून धूर करा.

चिकनगुनिया
04/10/2021

चिकनगुनिया

आलेले संक्रमण पावसात वाहून जाईल का? कि पावसाळा आल्यावर रुग्ण अजूनच वाढतील? एवढ्या तफावतीचे अंदाज वर्तविले जात असताना मना...
09/08/2020

आलेले संक्रमण पावसात वाहून जाईल का? कि पावसाळा आल्यावर रुग्ण अजूनच वाढतील? एवढ्या तफावतीचे अंदाज वर्तविले जात असताना मनात अनेक शंका, भीती, साशंकता असणे साहजिकच आहे.
पण आयुर्वेद या सगळ्या समस्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबतीला सतत आहे. गरज आहे ती आयुर्वेदाकडे पूर्ण विश्वास ठेवून वळण्याची.
आयुर्वेद केवळ रोग, औषध, बिघडलेले स्वास्थ्य याबद्दल निराकरण करणारे शास्त्र नसून, *आयुर्वेद एक शास्त्रशुद्ध निरामय जीवनशैली आहे* . प्रतिदिनी दिवसभर करण्याची कार्ये, आदर्श रित्या आयुर्वेदात विस्ताराने सांगितली आहेत, याला "दिनचर्या" असे म्हणतात. आणि प्रत्येक ऋतू नुसार दिनचर्येमधे विशेष असे आहार विहार बदल ज्यात सांगितले आहेत तिलाच "ऋतुचर्या" असे म्हणतात.

आदान काळ संपून विसर्ग काळ लागण्याचा काळ म्हणजेच ग्रीष्म ऋतू संपून वर्षा ऋतू लागण्याची चाहूल. विसर्ग काळाची सुरुवात म्हणजेच दक्षिणायनाची सुरुवात.

🍀"विसृजति जनयति आप्यं अन्शं प्राणिनां च बलं इति विसर्गः |"
~सर्व सजीव गोष्टींना जीवन प्रदान करणारे तत्व म्हणजे जल. अशा आपल्या जलीय अंशाने प्राणिमात्रांचे विसृजन करणारा काळ, तो *विसर्ग काळ*.

🍀"आदान दुर्बले देहे पक्ता भवति दुर्बलः |
स वर्षासु अनिलादिनां दुषणैः बाध्यते पुनः ||"
~ग्रीष्म ऋतूतील उष्णता, काहिली आणि आदानकाळातील बल हानी यांनी क्षीणलेल्या मनावर व शरीरावर वर्षा सरींच्या शिडकाव्याने आल्हाददायी वातावरण तर निर्माण होते. परंतु, आदानकाळात (वर्षा ऋतुच्या आधीच्या काळात) उष्णतेच्या योगाने शरीरातील रस आणि स्नेह शोषले गेल्याने शरीरातील अग्नी (संपूर्ण शरीराची पचन शक्ति) दुर्बल झालेला असतो व मनुष्यांची शरीरे दुर्बल झालेली असतात. तशात वर्षा ऋतूमध्ये दोषांचा अधिकच प्रकोप झाल्याने अग्नी अधिकच मंद होतो आणि मंदाग्नि मुळे दोषप्रकोप अधिकच वाढतो. असे विश्चक्र सुरु होते. यामुळे भूक मंदावणे पचनाचे विकार आणि वात विकार देखिल डोकं वर काढतात.
तसेच ग्रीष्म ऋतूत तप्त झालेल्या भूमीवर पावसाचे पाणी पडल्याने जे बाष्प तयार होते व सतत पावसाची धार लागते त्यामुळे जल हे आम्ल विपाकी बनते.

🍀 ऋतुचर्येचे तीन प्रमुख विभाग आहेत:
आहार, विहार आणि औषध.

🍽️ *आहार* : वर्षा ऋतू मध्ये प्रकुपित दोष व कमकुवत झालेले पचन बघता, आहार अतिशय सांभाळावा लागतो.
🍀अपथ्य/ वर्ज्य/ खाऊ नये असे :
साधारण पित्त आणि वात वाढेल असे कोणतेही पदार्थ त्याज्य समजावे. तरी ढोबळ यादी खाली देत आहे.
१. पाण्यात मिसळलेले सातू
२. पालेभाज्या जपून खाव्या. पालेभाज्या खाण्याचा अट्टाहास नसावा.
३. नदीचे पाणी.
४. चमचमीत सगळेच पदार्थ या ऋतूत खावेसे वाटले तरी असे सर्व पदार्थ पित्तकर असतात त्यामुळे त्यांचे सेवन टाळावे. लोणचे, पापड, इत्यादी.
५. सुके मांस. सुकवलेले मांस हे आयुर्वेदात त्याज्य मानले आहे. कारण त्यामुळे सर्व दोष प्रकोप होतो.
६. ज्या दिवशी ढग दाटून राहिले आहेत आणि सूर्यदर्शन होत नसते त्या दिवशी शक्यतो पूर्ण भोजन करू नये. खायचे च झाल्यास लघु आणि गरम (स्पर्शाने) आहार घ्यावा.

🍀पथ्य / सेवन करण्यास योग्य :
१. मध: "पान भोजन संस्कारान् प्रायः क्षौद्रान्वितान् भजेत् |"
खाण्या पिण्याच्या सर्व पदार्थांसोबत योग्य मात्रेत मधाचा उपयोग अवश्य करावा. पण तो अल्प प्रमाणात हवा. अधिक मात्रेत मध घेतल्यास अत्यंत घातक अजीर्ण होते. अशा अल्प प्रमाणात सेवन केलेल्या मधाने वर्षा ऋतूमध्ये उत्पन्न होणाऱ्या अन्नातील क्लेदाचे पचन होते. (चक्रपाणी टीका)
२. "व्यक्ताम्ल लवण स्नेहं वातवर्षाकुले अहानि |"
विशेषतः अम्ल, लवण( खारट) व स्निग्ध पदार्थाचा भोजनात वापर केला पाहिजे. परंतु विदाह निर्माण करणारे नसावे. (उदाहरण: लोणचे,पापड, इत्यादी नको.)
३. जुने यव, गहू, षष्टी शाळी यांचे सेवन करावे. नवीन धान्य टाळावे.
४. उकळून गार केलेले पाणी.
५. विहिरीचे पाणी.
६. मांसरस (सूप) किंवा मुगाचे यूष (कढण) यांसोबत यव आदि जुने धान्य सेवन करावे.
७. सुंठ सतत रोजच्या भोजनात वापरावी.

🍀 *विहार* / उपक्रम:
१. दिवस झोपू नये.
2. दव पडलेल्या स्थानी वावरू नये.
३. व्यायाम : (अति मात्रेत) करू नये. आधीच्या आदानकाळातील बल हानी लक्षात घेता.
४. उन्हात बसणे टाळावे
५. व्यवाय (शरीर संबंध) टाळावे
६. शरीराला उटणे लावावे.
७. सुगंधी द्रव्यांनी स्नान करावे.
८. हलके, स्वच्छ, कोरडे वस्त्र धारण करावे.
९. राहण्याचे ठिकाण स्वच्छ व कोरडे असावे.
१०. घरात व कामाच्या ठिकाणी धूपन द्रव्यांनी धूपन करावे.
११. पावसात भिजणे टाळावे. भिजल्यास त्वरित केस पुसून गरम पाण्याने स्नान करावे.

🍀 तिसरा भाग ऋतुचर्येचा म्हणजे औषध.
व्यक्तिपरत्वे प्रकृति व व्याधी आणि समस्या वेगवेगळ्या असतात. या सगळ्या सूक्ष्मातीसूक्ष्म संकल्पनांचा विचार आयुर्वेदात केल्या गेलेला असल्याने कुठलेही औषध हे मात्र तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

ऋतूमध्ये जरी सुरुवातीला शरीर बळ दुर्बल असले तरी, चंद्राचे अधिपत्य असते. व गार वारा, पाऊस, यांच्या योगाने पृथ्वीतील उष्णता कमी होऊन स्निग्ध अम्ल, लवण, मधुर रस पुष्ट होत असतात. त्यामुळे निसर्ग हा बळ देत असतो. विसर्ग काळ बळ देणारा असतो , आणि ते बळ कसे घ्यायचे हे समजावणारा आयुर्वेद आपल्याला लाभला आहे...!
प्रकृति भरभरून आपल्याला द्यायला उभी सज्ज आहे... आपली झोळी दुबळी न करता आयुर्वेदाने ती भरून घेऊ....
मनाच्या उत्साहापेक्षा आणि मनाच्या शक्ति पेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट तत्परतेने व्याधीक्षमत्व / immunity वाढवू शकत नाही. unlocking च्या साखळीमध्ये त्याच उत्साहाने आणि शक्तीने आलेल्या संक्रमणाला मनातून पण unlock करूया आणि आयुर्वेदीय जीवनशैलीचा मार्ग अवलंबून निर्भय राहूया.

https://youtu.be/uqkpTiCPfuI
20/04/2020

https://youtu.be/uqkpTiCPfuI

Don't Worry, Fight Corona|Boost your immune system|Prevention's and Precautions against corona virus Hello Friends, In this video we are going to see all the...

नक्की पाहा आयुष मंत्रालय दिल्ली ने सांगितलेले घरगुती उपाय
16/04/2020

नक्की पाहा आयुष मंत्रालय दिल्ली ने सांगितलेले घरगुती उपाय

आयुष मंत्रालयाच्या टिप्स | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Prevention against Corona virus नमस्कार मित्रांनो, या विडीओ म...

"ताक"शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार श...
24/03/2020

"ताक"
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
१०)महत्वाचे म्हणजे *तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास* आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.

चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी शेअर करायला विसरू नका.

08/03/2020

Sefty trick for Corona virus
______*भीमसेन आयुर्वेदीक कापूर*_____
*हा कापूर कुठल्याही विशिष्ठ* *आकारात येत नाही*
स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते
सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत.

♦नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
♦रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
♦ पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास तो हुंगावा.
♦तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .

♦कोंड्याकरीता : -
सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे
♦ नेहमीच्या कापरात मेण असते , त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर,
दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात, श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.
♦दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व तू लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
♦ खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात
सर्वात शेवटी
हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध

♦संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा,
प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही, तेही एका मर्यादेपर्यंतच

08/03/2020

कोरोना होऊ नये यासाठी एक उत्तम उपाय
________*भीमसेनी कापूर*_________
तिरुपती परीसरात कापुर ह वेगळा असतो तो भिमसेनी कापुर म्हणुन ओळखला जातो हा कापुर आयुर्वेदीक औषधामध्ये वापरला जातो, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा बेटावर कपुर नावाचे अतिउंच मोठे सदा हिरवेगार वॄक्ष असते, त्यापासुन डायरेक्ट कोणतीही प्रक्रिया न करता मिळणारे कापुर हे औषधाचे असते. सर्वात महत्वाचे म्हणजे औषधी कापुर व बाजार किराणा दुकानात मिळणारे रासायनिक कापुर याचे गुणधर्म एकदम विरुध्द आहेत. डायरेक्ट झाडापासुन मिळणारा अपक्व कापुर हा औषधी गुणधर्माचा असुन कित्येक आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा मुक्तहस्त वापर केला जातो. किराणा दुकानात मिळणारा कापुर हा रासयनिक कारखान्यांमध्ये उपयोगी पडतो व अतिमात्रेमध्ये तो विषारी असतो. डायरेक्ट झाडापासुन मिळणारा कापुर पाण्यामध्ये बुडतो व रासायनीक हानीकारक कापुर पाण्यावर तरंगतो. या करीता सर्वांना विनंती आहे की केमिकल युक्त कापुर न जाळता होळी मध्ये दशमूळ, गुग्गुळ, राळ, पुनर्नवा, देवदार, शिरीष, वड, पिंपळ, वेखंड, कडूनिंबाची पाने, शेणाची गोवरी, भिमसेनी कापुर, अनंतमुळ यापैकी जे काही भेटेल अशा वनस्पतीं व शुध्द तुप जाळुन त्याचा धुर करा. यामुळे हवेतून येणाऱ्या जंतूंपासून संरक्षण मिळते. *आयुर्वेदिक काष्ठौषधींच्या दुकानांमध्ये या वनस्पती सहज मिळतात किंवा होम हवन सामुग्रीचा तयार पुडा दुकानात मिळ्तो .* अशा वनसपती जाळल्याने वातावरण शुध्दी साठी आवश्यक असे घटक धुरातून बाहेर पडतात, यावर भरपुर संशोधन झालेले आहे.
भिमसेन कापूर चे फायदे जाजून घेण्या साठी फॉलो करा व पुढील पोष्ट वाचा

08/02/2020

एसिडिटी की समस्या के लिए करें आयुर्वेदिक उपचार

एसिडिटी एक आम समस्या जो है सभी उम्र के लोगों को प्रभावित करती है। आयुर्वेद के अनुसार, एसिडिटी का कारण शरीर में पित का असंतुलन होता है। पित पेट में तेज, तीव्र, गर्म और अम्लीय ऊर्जा के रूप में पाया जाता है।

इन कारणों से होती है एसिडिटी

जब कोई व्यक्ति सिरका, खट्टा जूस, टमाटर, मिर्च, प्याज, लहसुन, शराब और तले हुए खाद्य पदार्थों का ज्यादा सेवन करता है, तो पित उत्तेजित होकर पेट में एसिडिटी का कारण बनता है, इसके अलावा कैफीन और सोडा भी पित को बढ़ा देते हैं। तनाव, अनियमित खाने की आदत, मसालेदार भोजन, नींद का अभाव, व्यायाम की कमी और पेनकिलर के साथ-साथ एंटीबायोटिक दवाइयां भी विषाक्त पदार्थों से पेट में गर्मी बढ़ाकर एसिडिटी करते है।

आयुर्वेद में एसिडिटी के लिए बहुत सरल और उत्तम उपचार उपलब्ध है।
1) पानी
कुछ सरल प्राकृतिक उपचार पेट की एसिडिटी के इलाज के लिए इस्तेमाल किए जा सकते हैं। उदाहरण के लिए पानी की मदद से पेट के अतिरिक्त एसिड को बाहर निकला जा सकता है।
अगर आप अक्सर एसिडिटी की समस्या से पीड़ित हैं तो सोने के लिए जाने से पहले और सुबह में जागने के तुरंत बाद हर दिन गुनगुने पानी का एक गिलास पीने से आप अपनी समस्या से निजात पा सकते है।

2) तुलसी की पत्तियां
तुलसी की पत्तियां तुलसी के पत्तों के सुखदायक और वातहर गुण से आप एसिडिटी, गैस और उलटी से तत्काल राहत पा सकते है। आप एसिड की समस्या से परेशान होना शुरू होते ही कुछ तुलसी के पत्ते खा लें और ये जरूर सुनिश्चित करें कि उन्हें बिना चबाएं ना खाएं।एक अन्य विकल्प के लिए पानी के एक कप में तीन से पांच तुलसी के पत्ते तोड़कर डाले और फिर इसे कुछ मिनट के लिए उबालें। आप शहद डालकर इस तुलसी के उबले पानी को मीठा कर सकते है। यह बार-बार पीएं, इससे एसिडिटी खत्म हो जाएगी।

3) दालचीनी
दालचीनी पाचन स्वास्थ्य के लिए अच्छी होती है। यह एक प्राकृतिक एंटी एसिड के रूप में काम करता है और पेट की गैस को दूर करने में मदद करता है।1. पानी के एक कप में दालचीनी पाउडर का आधा चम्मच डालें। 2. इसे उबाल लें और फिर कुछ ही मिनट के लिए इसे ठंडा होने के लिए छोड़ दें। 3. इस दालचीनी चाय को एक दिन में दो से तीन बार सेवन करें। आप अपने सूप या सलाद में भी दालचीनी पाउडर जोड़ सकते है।

4)जीरा
जीरा भी अम्लता के इलाज के लिए के एक एंटी एसिड न्यूट्रलाइजर के रूप में काम करता है। इसके अलावा यह पाचन में भी मदद कर पेट दर्द से राहत दिलाता है।थोड़ा सा भुना हुआ जीरा लें और इसका पाउडर बना लें और एक गिलास पानी में मिलाकर पिएं। हर भोजन के बाद इसे पीने से एसिडिटी की समस्या एक हफ्ते में गायब हो जाती है। • एक अन्य विकल्प के लिए एक चम्मच धनिया बीज पाउडर, जीरा पाउडर, सौंफ बीज पाउडर और पानी का आधा कप में डालकर मिश्रण बना ले और इससे खाली पेट पिने से एसिडिटी गायब हो जाती है।

5)लौंग
लौंग अम्लता को कम करने और गैस को दूर करने में मदद करती है। आम धारणा के विपरीत एसिडिटी पेट में बहुत कम एसिड के कारण भी हो सकती है।दो से तीन लौंग को अच्छी तरह चबाकर इतना रस मुँह में बना ले की वो आपके सिस्टम में जाकर घुल जाए। • भोजन में लौंग और इलायची को समान मात्रा में मिलाकर खाने से एसिड की परेशानी और बुरी सांस की समस्या को कम किया जा सकता है।

*रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय*रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय : Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. ब...
23/09/2019

*रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय*
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय : Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते. या आजारपणास कारण बॉडी इम्युनिटी चांगली नसणे हे असते. जर Immune system मजबूत नसेल तर शरीराची रोगांच्या सोबत लढण्याची शक्ती कमी होते ज्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. वयस्क लोकांच्या तुलनेत लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. काही लोक इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी औषधे (मेडिसिन)घेतात पण विना औषधाच्या घरगुती उपायाने आणि आयुर्वेदिक उपायाने देखील याचा इलाज केला जाऊ शकतो.

रोग प्रतिकार शक्ती कमी असण्याचे कारण:-

वजन जास्त किंवा कमी असणे. मद्य आणि धुम्रपान यांचे सेवन जास्त करणे.

शरीराला आवश्यकतेनुसार पोषण न मिळणे.

वेदनाशामक औषधांचा अतिरिक्त वापर.

जास्त टेन्शन घेणे आणि खाण्यापिण्याकडे लक्ष न देणे.

झोप पूर्ण न करणे आणि शरीराला आराम न देणे.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय आणि घरगुती पद्धती

आजकाल हवे मध्ये अनेक प्रकारचे हानिकारक बैक्तीरीया आणि वायरस असतात जे श्वासाच्या सोबत शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे आपली इम्यून सिस्टम आपल्याला यापासून वाचवते. जेव्हा इम्युनिटी कमजोर होते तेव्हा हवे मध्ये असलेले वायरस आपल्या शरीरात वाढतात. ज्यामुळे सर्दी-खोकला आणि ताप या समस्या होतात.

इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी ब्लैक टी आणि ग्रीन टी दोन्ही उपयोगी आहेत. दररोज यांचे 1-2 कप पिने इम्युनिटी पावरसाठी चांगले असते. लक्षात ठेवा याच्या अतिरिक्त सेवनामुळे नुकसान देखील होऊ शकते.

शरीरास इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी विटामिन सी अत्यंत फायदेशीर असते. लिंबू आणि आवळा विटामिन सीचे भांडार आहे. त्यामुळे यांचे नियमित सेवन करा.

शरीर निरोगी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग आणि व्यायाम यांची मदत मिळते आणि सोबतच बॉडी डीटॉक्स करण्यासाठी यांची मदत होते.

शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कच्चा लसून औषधाचे काम करते. लसून मध्ये विटामिन ए, सल्फर आणि जिंक असते जे Immunity increase करण्यास फायदेशीर असते.

वजन कमी असणे किंवा जास्त असणे हे देखील इम्युनिटी कमजोर असण्याचे एक कारण आहे. यासाठी आपल्या Weight ला नियंत्रणात ठेवा.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय म्हणजे शतावरी, अश्वगंधा, शिलाजित, तुळस आणि हळद इत्यादी वापरणे.

विटामिन डी मुळे शरीराला आजारा सोबत लढण्याची शक्ती मिळते आणि सोबतचे हे हृद्याचे रोग दूर करणे आणि हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर असते.

नवजात बालकांसाठी आईचे दुध हे रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी रामबाण आहे. जे बालकास एलर्जी, ताप, जुलाब आणि इन्फेक्शन यापासून वाचवते.

बादाम मध्ये विटामिन ए जास्त असते. दररोज 8 - 10 बादाम खाण्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावे - Immunity Boosting Tips in Marathi

दही सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याच सोबत पचन शक्ती व्यवस्थित करण्यासाठी देखील उपयोगी ठरते.

फळांमध्ये आंबट फळे, अननस आणि संत्री यामध्ये विटामिन सी असतात जे शरीरातील चांगले कोलेस्ट्रोल वाढवते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते.

इम्युनिटी वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम मानल्या जातात. पालक मध्ये फोलिक एसिड असते जे शरीरात नवीन सेल्स बनवण्यासाठी आणि जुने सेल्स चांगले करण्यासाठी उपयोगी आहे. पालक मध्ये फाइबर, आयरन एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी पण असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मशरूम खाणे देखील फायदेशीर ठरते.

इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी dry fruits उपयोगी ठरतात कारण यामध्ये इम्युनिटी सिस्टम मजबूत करणारे पोषक तत्व असतात. यामध्ये फाइबर, जिंक, मिनरल्स आणि आयरन असते.

ब्रोकली मध्ये विटामिन सी आणि ए असते ज्यामुळे इम्युनिटी पावर वाढते. सोबतच बॉडीला प्रोटीन आणि कैल्शियम मिळते.

लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय
आहारात हिरव्या पालेभाज्या खाण्यास द्याव्यात.

झोप पूर्ण न होणे रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्याचे एक कारण आहे. मुलांची इम्यून सिस्टम मजबूत राहावी यासाठी त्यांना 10-12 तास झोप आवश्यक आहे.

लहान मुलांना कोणतेही औषध देण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा आणि वेदनाशामक औषधांचा वापर देखील कमी करावा.

बिडी आणि सिगरेट यांच्या धुरा पासून मुलांना दूर ठेवावे. यामुळे देखील रोग प्रतिकारक शक्तीचा विकास होत नाही.

04/06/2019

मीठ व राक्षस यांची गोष्ट
--------------------
एका गावात एक गुंड होता. तो गावकऱ्यांना विनाकारण मारहाण करायचा आणि सर्वांकडले अन्न हिसकावून खायचा. एकाने सांगितले त्याला विरोध करु नका. फक्त त्याच्या रोजच्या अन्नात रोज थोडे मीठ ( Sea Salt ) टाका. त्याची चव द्या. ते हळू हळू नकळत मीठाचे प्रमाण वाढवत जा. लोकांनी तसेच केले. त्या जादा मिठाने उच्च रक्त दाब ( Blood Pressure ) होवून लवकरच तो गुंड मेला.

पण गावकऱ्यानांही मीठाची चव घेता घेता मिठाची चटक लागली. ते भरपूर मीठ खाऊ लागले. घरोघरी सर्वाना उच्च रक्त दाब ( Blood Pressure ) झाला. मरणाऱ्या तरुणाची संखा वाढली.

त्या लोकांप्रमाणे उच्च रक्त दाब ( Blood Pressure ) हेच आज भारतीयांचे मृत्यू नंबर 1 चे कारण आहे. दर चौथ्या माणसाला उच्च रक्त दाब आहे. त्यानंतर हर्ट अॅटक, पॅरालिसिस व इतर आजार होतात, बहुतेकांना हे माहिती नाही. ही माहिती सांगून सर्वांना आपला रक्त दाब मोजायला सांगा. सर्वांना वाचवा.

नैसर्गिक पदार्थ सेवनातुन मीठ मिळतेच, म्हणुनच मीठाची शरीरातला गरज नाही. टि.व्ही वरील जाहिरात हा एक व्यापाराचा भाग आहे. जास्त मीठ खाण्याचा थेट उच्च दाबाशी ( B P ) संबंध आहे.

माणसाला दररोज 2 ग्रम मीठ खाण्यास हरकत नाही जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की प्रत्येकाने दररोज 2 ग्रॅमच्या वर मीठ खाऊ नये.त्यापेक्षा जास्त खाणाऱ्यांना उच्च रक्त दाब होण्याची शक्यता जास्त असते. आपण सरासरी 10 ग्रॅम मीठ खातो काही लोक तर दररोज 30 ग्रॅम इतके मीठ खातात. आपले जसे वय वाढते तसा आपला रक्तदाब अधिक वाढतो.

2 ग्रॅम पेक्षा कमी मीठ रोज खाणाऱ्यां मध्ये उच्च रक्त दाबाचे प्रमाण कमी आहे. वय वाढले तरी त्यांचा रक्त दाब वाढत नाही.

मीठ खाणे कमी केले की उच्च रक्त दाब होण्याची शक्यता कमी होते.

लोणची, पापड, सॉस,केचप, अजिनोमोटो , खारवलेले पदार्थ, शेव चिवडा, फास्टफुडस अशा अनेक खारे पदार्थ यातून मीठ पोटात जाते.

जादा मीठाने [ जठर ] पोट खराब होते, त्याचे अन्न पचनाचे काम बिघडते. जठराचा कर्क रोग, कॅन्सर पण होतो. मीठाने शरीरातील कॅलशीयम शरीरा बाहेर टाकले जाते. याने हाडे ठिसूळ होतात. सर्वाधिक लोकांना मान दुखी, पाठदुखी व सांधेदुखी आहे. ती यामुळेच वाढते. जरा धक्का लागला की आपले ठिसूळ झालेली हाडे मोडतात.

आपल्या रोजच्या सर्व नैसर्गिक अन्नातून [ वरून न टाकता ] आपल्याला 3 ते 4 ग्रॅम मीठ आपोआप मिळतेच. ते शरीर वापरून घेते.

आश्चर्याची गोष्ट अशी कि, जगभर पहिल्या वाढ दिवसापर्यंत मीठ व साखरेची चवच मुलाना देत नाही. त्यापुढेही ती देणे शक्यतो लांबवतात. आपणही असे करू या.

आपण ताटात, जेवणात वरून मीठ घेवू नये. अन्न शिजवतांना रोज थोडे थोडे मीठ कमी टाकायला सांगा.

पण आपल्याला मिठाची सवय लागली आहे. मिठाचे व्यसन लागले आहे. मिठाशिवाय जेवणच जात नाही. हे चुकीचे आहे. जादा मीठ खाणे हे व्यसन आहे .

दारू , तंबाखूच्या सवयीने जेवढे लोक मरतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक जादा मीठ खाऊन होणाऱ्या उच्च रक्तदाब ( BP ) मुळे मरतात.

एक माणूस मारला तर फाशी होते.मीठ खूप लोकांना सहज मारते. म्हणुनच मिठालाच फाशी द्या.

किराणा दुकानातील छोट्या काट्यावर 2 किंवा 4 ग्राम मीठ किती होते ते मोजून बघा. माणसी तेवढे, किंवा त्यापेक्षाही कमी मीठ रोज खा.

घरच्या छोट्या चमच्यात किती मीठ येते हे मोजा.

एक किलो मिठाशी नवीन पिशवी आज उघडा. त्यावर आजची तारीख टाका. ही किती दिवस चालते ते बघा.
दररोज 2 ग्रॅम रोज प्रमाणे 1 किलोची पिशवी
एका माणसाला 500 दिवस चालवा.
2 माणसांना 250 दिवस,
3 माणसांना 180 दिवस, 4 माणसाना 125 दिवस
5 माणसांना 100 दिवस पुरवा. लोणची पापड, हे सर्व यातूनच करा. बाजारचे केचप सॉस, खारट पदार्थ टाळा.

शक्यतो आयुर्वेदीक सैधव मीठ ( Rock salt ) वापरा. कारण सैंधव मीठात sodium potassium असते. ते शरीरातील पाणी शोषुन घेत नाही.

समुद्रीय मीठ ( sea salt ) विष आहे हे जाणा. कारण त्यामध्ये Sodium Cloried ) असते. ते शरीरातील पाणी शोषुन घेते. त्यामुळे रक्त वहिन्या आकुंचन पावतात. व रक्तदाब ( Blood Pressure ) सुरु होतो. आपण रोज जादा मीठ घालून स्वतः ला व घरच्यांना आजारी करतो, मारतो हे ज्यादिवशी महिलांना व सर्वाना कळेल त्यादिवशी हे आजार , ही मरणे बंद होतील.*

खाल्ल्या मीठाला जागायचे असेल तर कमी मीठ खा. आणि तेही सैंधव मीठ ( Rock salt) मीठ खा. नाहीतर उच्च रक्त दाबाने मराल.

ही माहिती राष्ट्रीय आहार संस्थेच्या “ भारतीयांसाठी जेवणाची मार्गदर्शक तत्वे “ या पुस्तिकेतून घेतले आहे.

धन्यवाद....... 🙏

10/05/2019

वाचा, चेहरा झटपट उजळवणारे साधे सोपे घरगुती उपाय

उजळ चेहरा कोणाला आवडत नाही, परंतु बहुतांश लोक या दुविधेमध्ये राहतात की, एवढ्या कमी वेळेत चेहरा कसा उजळ करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेक जणांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहे. या उपायांमुळे तुमची त्वचा उजळ होण्यास नक्कीच मदत होईल.
1. दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. अंघोळीच्या आधी तयार केलेला लेप चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा.
2. डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल.

आणखी उपाय पुढील ब्लॉग मध्ये कळवण्यात येतील धन्यवाद आवडल्यास नक्की शेयर करायला विसरु नका 🙏😇

Address

Shubhashree Polyclinic Monika Chauk Otur 412409

412409

Telephone

+917745882811

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhi nalawde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Abhi nalawde:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram