09/11/2025
महाराष्ट्र शासनाच्या *एकत्रित प्रधानमंञी जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वरद हॉस्पिटल & आय.सी.यू.बिडकीन* ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे आणखी एका रुग्णाला मिळाले जीवदान. *डॉ.सुरेश जंगले यांच्या वरद हॉस्पिटल & आय सी यू बिडकीन* येथे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी *सौ.नंदा रावसाहेब पवार ह्या दुपारी 4.30pm वाजता एकदम बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटल च्या अपघात विभाग(casualty) मध्ये दाखल झाल्या.* वरद हॉस्पिटल & आय सी यू चे इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन डॉ. श्याम हिवरकर यांनी रुग्णाला तपासले असता रुग्ण सौ.नंदा पवार यांचे *हृदय बंद पडलेले होते व बीपी पल्स लागत नव्हते डोळ्यांच्या बाहुल्या फिक्स झालेल्या होत्या म्हणजे रुग्ण पूर्ण मयत अवस्थेत होती.* डॉ. श्याम हिवरकर यांनी वरद हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.सुरेश जंगले यांना कल्पना दिली असता डॉ.जंगले यांनी रुग्णाला सी.पी.आर देऊन एक प्रयत्न करून बघू असा विश्वास दिला आणि नातेवाईकांना याची पूर्ण कल्पना दिली.रुग्णाचे पती व मुले, इतर नातेवाईक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक काकासाहेब टेके, विजुभाऊ चव्हाण, मधूभाऊ सोकटकर,स्वराज हिवाळे,नितीन वाघ यांनी पेशंटचा जीव वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळे प्रयत्न करा असे डॉ.जंगले यांना सांगितले.वरद हॉस्पिटल च्या सर्व टीमने तब्बल दोन तास अथक प्रयत्न करून 5डिसी शॉक देऊन रुग्ण वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सुरुवातीला रुग्ण कोणत्याच उपचाराला प्रतिसाद देत नव्हता डॉक्टरांच्या पण आशा मावळ्यासारख्या झाल्या होत्या पण त्यांनी प्रयत्न थांबवले नव्हते आणि शेवटी काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि देव तारी त्याला कोण मारी याप्रमाणे तासाभराने सौ. नंदाबाई पवार यांचे *ई.सी.जी. मध्ये अचानक बदल सुरू झाले व रुग्णाचा बीपी आणि पल्स पुन्हा सुरू झाले आणि सौ.नंदाबाई यांचे हृदय पुन्हा धडधडू लागले* असे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आणि या परिस्थित वरद हॉस्पिटलच्या सर्व टीमच्या चेहऱ्यावर एक लढाई जिंकल्याची भावना दिसू लागली .बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू झाले आहे याची कल्पना डॉ. जंगले व डॉ. हिवरकर यांनी रुग्णाच्या नातेवाईक व इतर नागरिकांना दिली असता रुग्णाचे पती व मुलगा यांना अश्रू अनावर झाले त्यांनी डॉक्टरांचे पाया पडून तुम्ही खरच देव आहात असे म्हणून तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा असे सांगितले.यानंतर रुग्णाला आय.सी.यू मध्ये व्हेंटिलेटर लाऊन पुढील उपचार सुरू केले.दुसऱ्या दिवशी रुग्ण छ.संभाजीनगर येथे एक खाजगी रुग्णालयात पाठवून MRI व इतर तपासण्याकरुन पुन्हा वरद हॉस्पिटल येथे आणण्यात आले.दहा द