21/06/2023
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
*🔸योग.🔸*
योगदिनाच्या निमित्ताने ग
*योगाचे प्रकार.*
*भारतीय योग शास्त्रा मध्ये पाच योग सांगितले आहेत,*
*ज्ञान योग -- आत्मज्ञान.*
*हठ योग -- आसन आणि कुंडलिनी जागृति.*
*कर्म योग -- योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)*
*भक्ति योग -- भजनं कुर्याम्-भजन करावे.*
*राजयोग -- योगः चित्तवृत्तिनिरोधः (चित्तातील वृत्तींवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)*
*पतंजलीने योगा चा अर्थ चित्तातील वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्याच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत:*
*यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग नियम स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता, आणि ईश्वराप्रती चिंतन) बाहेरचे अंग, योगासन बाहेरचे अंग, प्राणायाम बाहेरचे अंग, प्रत्याहार बाहेरचे अंग, धारणा आतले/मानसिक अंग, ध्यान आतले/मानसिक अंग, समाधी आतले/मानसिक अंग.*
*योगश्चित्तवृत्ति निरोधः या सूत्राचा अर्थ आहे - योग तो आहे, की जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो. चित्तवृत्तींच्या निरोधाने (दमनाने) नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे होय.*
*योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय. याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये - महाभारत, उपनिषद, पतञ्जलीचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात.*
*योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय. चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होऊ शकतात. व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे. योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनि आविष्कृत केले होते. महर्षि पतंजलिनी अष्टांग योग च्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले.*
*जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्या बरोबर मीलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे.*
*योग वैदिक/ हिंदू तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनांमध्येएक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे, जो एक ब्रह्मन् मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे.*
*हिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकारपण आहेत उदा. निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान).*
*योगावर पतञ्जलि मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलीच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते. याच अष्टांग पथा ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला.*
*स्त्रोत: आंतरजाल.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄