10/09/2025
पालक शाळा:
सात सप्टेंबर रोजी जळगाव येथे "पालक शाळा" या उपक्रमांतर्गत
डॉक्टर वीणा महाजन यांचे
यांचे एक व्याख्यान आयोजित केले होते
विषय : मुलांसोबत भावनिक संवाद कसा साधावा?
डॉक्टर महाजन यांनी मांडलेले काही मुद्दे
वय ( 0 ते 5) वर्ष
या लहान वयात भावनिक व्यक्ती करण मुलं मुख्य मुख्यत्वाने भावनात्मक गोष्टी शिकतात ते पालक , आजी आजोबा , पाहुणे आणि घरात येणाऱ्या काम करणाऱ्या कामगार मंडळींकडून वाहन चालक, इत्यादी.
आपण जे दाखवतो त्याचं मुलं नक्कीच अनुकरण करत असतात उदाहरणार्थ टॉम अँड जेरी सारखे कार्टून चुकीच्या भावनांचा प्रभाव मुलांच्यावर पडत असतो,
साधारणपणे आपलं वागणं बोलणं याचा प्रभाव मुलांवर नक्की होतो विशेषतः मुलींवर वडिलांचा प्रभाव आणि मुलांवर आईचा प्रभाव असतो तसचेघरात जर वयस्क मंडळी असतील तर त्यांच्या अनुकरणाचाही प्रभाव मुलांवर असतो
मुलं आणि मुली असा भेदभाव न करता त्यांच्याशी वागताना समानतेने वागणं आवश्यक आहे तसेच नकारात्मक व त्यांच्या वर्तनाचा स्वीकार करणे या वयात आवश्यक आह.
नकारात्मक वर्तन लगेच
त्यांना दाखवून देऊ नका किंवा त्याची खुलासे करणे टाळा , चर्चा जास्त करू नये
*पूर्व किशोर अवस्था 11 ते 15 वयोगट: या वयात मुलं अधिक स्वतंत्र आणि आणि प्रौढ विचार करण्यास सुरू करतात
पालकांना या वयात मुलांच्या वर्तनाची भीती वाटत असते
भावनिक संवाद मार्ग
मुलांच्या मित्रांना ओळखा
त्यांच्याशी मैत्री करून घ्या
मुल या वयात जास्त नकारात्मक गोष्टी शिकत असतात
मुलांच्या समोर नकारात्मक गोष्टींची चर्चा करू नका त्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना द्या त्याच्यावरती सन्मान पुर्वक चर्चा करा
मुलांना समस्या कशा हाताळण्याच्या हे शिकवा.
जर मुलांची मागणी योग्य असेल तर ती पूर्ण करा नाहीतर त्याविषयी त्यांच्याशी आदरपूर्वक बोल
आदर दिला की आपली परिस्थिती स्वीकारतात.
*सकारात्मक संवादाचे मार्ग :
दररोज मुलांची दहा मिनिटे बोला,
अप्रत्यक्ष संवाद टाळा म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल वरून बोलणे चॅट करणे अशा पद्धती.
आदरपूर्वक व सन्मानपूर्वक संवाद करण्याने भावनात्मक विकास होतो
मुलांच्या समोर नकारात्मक बोलणे टाळा तसेच मोबाईल फोन, गेम्स याचा मुलांच्या भावनिक विकासावर परिणाम होतो
तुमची मुलं जवळच्या प्रत्येक वयस्काकडून भावनिक गोष्टी शिकत असतात
चांगल्या वर्तनाचे उदाहरण तयार करा
आदर व समजूतदारपणा यावर भर द्या
सुरुवातीपासूनच किशोरवयीन अवस्थेपर्यंत सकारात्मक भावनिक विकसित प्रोत्साहीत करा हे सगळे मुद्दे मुलांशी भावनिक संवाद साधण्यासाठी आवश्यक आहेत असे सांगितले .