24/10/2025
“ सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे राज्य संपले की काय ?”
फलटन मधील सरकारी डॅाक्टरला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागतो हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी व काळीमा फासणारी घटना आहे.
डॅाक्टरांच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार डॅाक्टरांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची, पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये बदलण्यासाठी खासदारांच्या तर्फे येणारा दबाव याची लेखी तक्रार आगोदरच वरिष्ठ पोलीसांना दिली होती, त्याची दखल योग्य वेळी घेतली असती तर आज एक तरूण डॅाक्टरांचा जीव वाचला असता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आशा पध्दतीने सरकारी हॅास्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॅाक्टरांना राजकिय व प्रशासकीय दबावाखाली काम करावे लागत असेल तर सर्व सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार व डॅाक्टर त्यांच काम कसे करणार ?.
जनतेचा सेवकच जर भक्षक बनत असतील आणि व्यवस्थाच गुन्हेगारांना पाठिशी घालत असेल, तर नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे हे विदारक चित्र या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेसमोर उभे ठाकले आहे.
केवळ आश्वासने न देता, पीडितेला तातडीने न्याय मिळवून देणे आणि दोषींना (ते राजकीय असोत वा प्रशासकीय) कठोर शिक्षा ही तात्काळ झालीच पाहिजे.
फलटणसारख्या अशा दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेचा सरकार आणि व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे संपुष्टात आला आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या अधःपतनाची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे हे विसरून चालणार नाही.
पुढील काळात डॅाक्टरांच्या आत्महत्या टाळण्यासाठी व त्यांना त्यांचे काम नियमानुसार करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवुन प्रशासणाने आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.