16/08/2025
"लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे उदय शिक्षण प्रसारक मंडळ,डोंबिवली - भाग ३"
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.प्रशांत पुंडलिक शिरूडे,शिक्षक व इतिहास अभ्यासक श्री.के.रा.कोतकर विद्यालय,डोंबिवली यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान झाल्याचे वृत्त वाचले व माझी उत्सुकता जागृत झाली व मी "उदय शिक्षण प्रसारक मंडळ,डोंबिवली" या संस्थेचा अभ्यास केला.श्री.प्रशांत पुंडलिक शिरूडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी डोंबिवली शहरामधे "उदय शिक्षण प्रसारक मंडळ" ही शैक्षणिक संस्था का बरे उभारली असावी ? कोणी हे धैर्य दाखवले ? त्यांना काय अडचणी आल्या ?याबाबत संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व AIMS रूग्णालय,डोंबिवलीचे सर्जन डाॅ.मिलिंद शिरोडकर यांच्याकडून व अन्य संबंधितांकडून माहिती घेतली.ती या लेखमालेद्वारे समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांपर्यंत पोहोचवतो.सर्वांनाच अभिमानास्पद असलेली ही माहिती जरूर वाचा.
"विद्या विनयेन शोभते" या ब्रीदवाक्यासह शिक्षणाच्या माध्यमातून लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा पाया "उदय शिक्षण प्रसारक मंडळ,डोंबिवली" या शैक्षणिक संस्थेने
केवळ १८४० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या "ज्ञानमंदिर विद्यासंकुला" त रचला.आज "उदय शिक्षण प्रसारक मंडळ" संचालित "ज्ञानमंदिर विद्यासंकुला" त खालील शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत:
१.पी.एस.वाणी पूर्व प्राथमिक विद्यालय: लहान मुलांसाठी प्रारंभिक शिक्षण.
२.दादासाहेब मो.कृ.वाणी प्राथमिक विद्यालय: प्राथमिक स्तरावरील शिक्षण.
३.केशव रामभाऊ कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय: माध्यमिक (इयत्ता १०वी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता १२वी) शिक्षण, विज्ञान आणि वाणिज्य शाखांसह.
४.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अभ्यास केंद्र: मुक्त शिक्षण प्रणालीद्वारे उच्च शिक्षण.
शाळेत ई-लर्निंग,सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, आणि कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन सुविधा उपलब्ध आहेत.शाळेत
२,९५४ चौरस मीटरचे क्रीडांगण आणि खुला रंगमंच असून विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना प्रोत्साहन दिले जाते.विज्ञान प्रदर्शन,संभाषणकौशल्य वर्ग,तज्ञांच्या कार्यशाळा आणि मान्यवरांची मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातात.वेळोवेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. गरजवंत विद्