25/06/2022
तुका म्हणे कैंसें आंधळे ते जन ।
गेले विसरून खऱ्या देवा |
सर्वच जीव हे परब्रम्ह-परमात्मा किंवा भगवद्स्वरूप आहेत असे गुह्य तत्व भगवान श्री व्यास महर्षींनी सांगितले आहे.
हे तत्व विसरल्यामुळेच सर्व जन आंधळे झाले आहेत असे श्री तुकाराम महाराज म्हणतात.
आणि हाच आंधळेपणा जाऊन डोळसपणा येण्याकरिता जागृती येण्या करीता सद्गुरू सद्शिष्यावर शक्तिपात करतात.
ज्यायोगे शिष्य कृतार्थ होतो कृतकृत्य होतो. या जन्मात जे करावयाचे ते मी केले व जे मिळवावयाचे ते मी मिळवले अशी कृतार्थ भावना शिष्याच्या मनात उत्पन्न होते.
असे कृतार्थ होण्याकरिताच ईश्वराने जीवाला मनुष्य जन्म दिला आहे.
मनुष्य जन्माचे दुसरे काहीच ध्येय असूच शकत नाही. मनुष्याच्या या व पूर्वीच्या सर्व जन्मांच्या प्रयत्नांचे फळ हेच आहे. आणि जे केवळ आणि केवळ गुरुप्राप्तीने जीवाला प्राप्त होते.