19/02/2025
🚩🙏 जय भवानी जय शिवराय 🚩🙏
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणताराजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षीऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।
कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।
🚩 जय भवानी, जय शिवराय 🚩🙏
🚩 ! जय जिजाऊ ! !! जय शंभू राजे !! 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने भारतभूमी पवित्र झाली. सुमारे तीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्र भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला.
दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छाशक्ती व आपल्या मुत्सद्दी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषास त्रिवार मुजरा !
#शिवजन्मोत्सव #महाराष्ट्र #स्वराज्यनिर्माता #राष्ट्रपुरुष #शककर्ते #हिंदवी #स्वराज्य #संस्थापक #धर्मरक्षक