18/03/2025
बऱ्याच जणांच्या दुःखाचे कारण सध्या
*भावकी* दिसत आहे .
अरे कोणाशी भांडता ? बहीण , भाऊ , चुलता , दीर, नणंद, भावजय , जावई , चुलत चुलता , आई , वडील , काका , काकू , आजी , आजोबा यांच्याशी ?
आणि कशासाठी ?
जमीन , सोने , प्रॉपर्टी यासाठी ?
ज्या नात्यांनी एका ताटात जेवायला हवे ती नाती शेजार पेक्षा माझ्या ताटात जास्त कसे पडेल यासाठी स्पर्धा करत आहेत .
काय कलियुग आहे .
मी हे केले की त्याच्या पोटात दुखेल ..
मी हे आणले की त्याची जळेल..
माझ्या मुलाला IIT मिळाले तर यांना बघवणार नाही ...
माझ्या मुलीला मेडिकल मिळाले तर हे २ दिवस जेवणार नाहीत..
कसली आणि कशाला ही स्पर्धा माऊली ? याची आडवा आणि याची जिरवा याने कोण पुढे गेले आहे ?
जमिनीच्या एका तुकड्यासाठी किंवा काही लक्ष रुपयांसाठी , चार सह्या साठी नाती जाळू नका रे...
गेल्या १० वर्षात stress , anxiety , depression वाढायचे एक प्रमुख कारण म्हणजे धनेशणा .. मला भरपूर पैसा मिळेल ही इच्छा .. आमचे चरक त्यांच्या ११ व्या अध्यायात लिहितात .
आपल्या कष्टाने धन गोळा करा . धनप्राप्ती किंवा धन प्राप्ती इच्छा चूक नाही पण कोणत्या मार्गाने ? शेती, पशुपालन, वाणिज्य व्यापार , राजाची सेवा (सध्याच्या काळात सरकारी / खाजगी नोकरी इत्यादी ) … प्रॉपर्टी मधे वाटणी हा धनप्राप्ती चा मार्ग आचार्यांनी सांगितला नाही . बर हे केल्यावर काय मिळेल?
नंबर एक - दीर्घायु
नंबर दोन - तिरस्कार रहित जीवन .
वडिलोपार्जित धन विनकष्ट मिळेल त्यासाठी कोर्टाचे उंबरे झिझवून
एक दोन गुंठे जागा भावकी च्या मोबदल्यात पदरी पडून घेऊन,
भावकीत चर्चा काय असते ? मार त्याच्या मड्यावर… मेला तरी तोंड बघणार नाही , एकदा सह्या झाल्या की गार पाण्याची बदली डोक्यावर घेईन इत्यादी ….. काय मिळाले ?
स्पर्धा कायम मोठ्या माणसांशी करा ..
करा ना अंबानी अदानी शी पैसा बाबत
करा ना टाटा सी आदर्श बाबत
करा ना apple शी technology बाबत
करा ना बफे शी गुंतवणुकी बाबत ..
आपल्याला स्पर्धा करायची आहे फक्त भावकी शी... बंद करा .
त्यांना कमी दाखवायला काहीतरी करत राहणे , स्टेटस टाकत राहणे , चुगल्या करणे बंद करा ... आयुर्वेदाच्या *चांगल्या वागण्यात* हे बसत नाही .
दिवसभर भांडभांड करून रात्री अश्वगंधा gummy खाणे हा आयुर्वेद नाही !
दिवसभर आदर्श वागणे हा आयुर्वेद आहे !!
—————-ॐ——————-
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585
Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K