03/06/2021
काश्याची वाटी ( पादाभ्यांग / पायाला मसाज करिता )
काशाची वाटी म्हणजे काय ?
कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्त मिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
काश्याच्या वाटीने मसाज का कारावा ?
शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काश्याची वाटी प्रभावी ठरते. पायाला तेल, तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला / उपचार पद्धतीला पादाभ्यंग म्हणतात. आबालवृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदानुसार डोकं, कान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. वेळीच त्याचा निचरा न झाल्यास शरीरात काही दोष, आजार वाढण्याची शक्यता बळावते.
काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग / जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात.
शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचे एक टोक पायापाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. शरीरात थंडावा वाढतो.
डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणं फायदेशीर ठरते.
दररोज रात्री पायाला अभ्यंग मसाज केल्यास प्यारालीसीस हा आजार होत नाही असे आयुर्वेद सांगतो
पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.
काश्याच्या वाटीने मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ?
काश्याच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तूपाचा वापर करणे आवश्यक आहे. तूपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तिळाच्या किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता.
याशिवाय कैलास जीवन, चंदनबला लाक्षादि तेल, शतधौतघृत यांचा देखील वापर करू शकता