Vyankatesh Ayurvedic Thyroid Care Center

Vyankatesh Ayurvedic Thyroid Care Center adress- vyankatesh ayurvedic thyroid care center matoshree vaibhav appartment ,2/1 mangalwar peth satara.

THIS IS FIRST AYURVEDIC CENTER IN INDIA WHICH TREATS THYROID RELATED DISEASES WITH AYURVEDIC FORMULATIONS.

24/07/2020
24/12/2017

हायपोथायरॉईडझमच्या उपचारामध्ये खालील योगासनांचा अभ्यास करावा:

सर्वांगासन (खांद्यांवर उभे राहणे) याची या विकारात अतिशय शिफारस केली आहे. या आसनाच्या दबावाच्या परिणामामुळे थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते व व्यवस्थित कार्य करू लागते आणि तसेच दबावाच्या परिणामामुळे डोक्यातील इतर ग्रंथी जश्या पियुषीका ग्रंथी आणि तृतीयनेत्र ग्रंथी यांनासुद्धा चालना मिळते ज्या अप्रत्यक्षपणे थायरॉईड ग्रंथींच्या कार्याला नियंत्रण करतात.
अधोमुख आसन (विपरीतकरणी).
एका पायावर पुढे वाकणे (जानू शीर्षासन).
मत्स्यासन (मत्स्यासन).
हलासन (हलासन).
मांजराप्रमाणे शरीर ताणणे (मार्जरासान).
वेगाने सूर्य नमस्कार केल्याने वजन ताब्यात ठेवणे चांगल्याप्रकारे शक्य होते.

या योगासानंशिवाय, कपाल भाती (कपाळ चमकवणारे श्वसन तंत्र), नाडी शोधन (नाकपुडी आलटून पालटून श्वास घेणे), भस्त्रिका आणि उज्जयी श्वसन यासारख्या प्राणायामाचा सराव (श्वसनाची तंत्रे) केल्याने हायपोथायरॉईडची लक्षणे कमी होण्यात चांगलीच मदत होते.

24/12/2017

तुम्हाला हायपोथायरॉईड​ झालेला असू शकतो जर:

जर तुम्ही हळूहळू दैनंदिन जीवनाच्या बाबतीत उदासीन होऊ लागलात, तुमच्यात अनुत्साह जाणवू लागला आणि सगळ्या गोष्टींच्याबाबतीत तुम्ही निरुत्साही राहू लागलात.
तुम्ही नित्याचीच कामे करीत असलात तरीसुद्धा तुम्हाला नेहमीपेक्षा अतिथकवा वाटू लागतो.
आजकाल तुम्हाला मलावरोध का होतो हे तुम्हाला अजिबातच कळत नाही.
तुमचे अचानक वजन वाढल्याचे तुमच्या मित्रांच्या लक्षात येऊ लागते आणि त्याचे कारण तुम्ही देऊ शकत नाही कारण तुम्ही स्वतःच आश्चर्यामध्ये आहात की अति आहार न घेतासुद्धा वजन कसे काय वाढले आहे ?
हल्ली आरश्यात बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की तुमचा चेहरा सुजलेला दिसतो आहे.
तुमचे लांब जाड केस अचानक गळू लागले आहेत आणि घरभर केसांचे पुंजके पडलेले दिसू लागतात आणि हे बघून तुम्ही चिंतीत होता.
अनियमित मासिक पाळी (याची आणि इतर कारणेसुद्धा असू शकतात, डॉक्टरांकडून तपासून घेणे उत्तम राहील.
तुमच्या चेहऱ्यावर केसांची लव इतक्या अतिप्रमाणात दिसू लागली आहे की त्याची तुम्हाला लाज वाटू लागली आहे.
तुमच्या घश्याला सूज आलेली तुम्हाला दिसते आहे. आता नक्कीच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आलेली आहे.

24/12/2017

थायरॉईडचा विकार खरोखर कोणालाही होऊ शकतो, अगदी मलासुद्धा ! असा प्रकाश माझ्या डोक्यात पहिल्यांदा पडला. सुरुवातीला मी थोडीशी घाबरले होते, पण नंतर माझ्या लक्षात आले की योगा आणि आयुर्वेद हे थायरोईड विकाराचे सुरक्षित आणि सरल उपाय आहेत, आता तर मी त्याबद्दल अजिबात विचारसुद्धा करीत नाही. जीवन आधी जसे सामान्य होते तसेच आत्तासुद्धा आहे आणि दैनंदिन योगाच्या सरावाने लक्षणांबरोबर जुळवून घेण्यात मदत होते आणि त्यामुळे जीवन अधिकच चांगले झाले आहे.” –निखिला सिंग, २००६ पासून हायपोथायरोईडने ग्रस्त.

होय, अति तणाव आणि डायबेटीस यांच्या पाठोपाठ थायरॉईड विकार हे आता घरगुती नाव झाले आहे. अमेरिकन थायरॉईड असोसिएशननुसार अमेरिकेतील जवळजवळ २० करोड लोकांना कोणता ना कोणता थायरॉईडचा त्रास आहे आणि यापैकी ६० टक्के लोकांना त्याची कल्पनासुद्धा नाही. तसेच, असे मानले जाते की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या विकाराचे प्राबल्य अधिक आहे. थायरॉईड विकाराचे एक मुख्य कारण आहे आपण जगत असलेली तणावपूर्ण जीवनशैली.

08/10/2015

मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल ला गेले १० वर्ष "स्पाईन सर्जन" म्हणून काम पाहणारे ,तसेच स्पोर्ट्समेड क्लिनिक चे मुख्य सुप्रसिद्ध डॉ.उदय पवार सातार्यातील रुग्णांना उद्या दुपारी १२ ते ४ या वेळेत उपलब्द्ध होणार आहेत.

प्रतिभा हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटर येथे डॉ उदय पवार रुग्ण तपासणी करतील

कंबरदुखी , मणक्यांचे विकार ,मानेचे मणके,कंबरेचे मणके यावरील अत्याधुनिक उपचार आणि सल्ला .

" सर्वच रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते." - डॉ उदय पवार .

आपल्या कंबरदुखी साठी व मणक्यांच्या उपचारासाठी एकदा अवश्य सल्ला घ्या .

संपर्कासाठी नं . ८६०००१९०७१, (०२१६२) २२६२००,२२६२०१

17/09/2015
एक रुग्ण दवाखान्यात आली. साधारण त: वय ३५.तक्रार अंगावर सूज ,सांधे दुखणे. कुणीतरी thyroid  चे निदान केले होते व २ वर्ष ती...
15/09/2015

एक रुग्ण दवाखान्यात आली. साधारण त: वय ३५.तक्रार अंगावर सूज ,सांधे दुखणे. कुणीतरी thyroid चे निदान केले होते व २ वर्ष ती रुग्ण thyroid चा उपचार घेत होती. पण फरक नव्हता. कुठून तरी माझ्याकडे आली. रेपोर्ट पाहिल्यावर वाटले या रुग्नेस thyriod चा त्रासाच नाही,. म्हणून मी परत तपासण्या करून घेतल्या. त्यात सांधे दुखीच्या तपासण्या केल्या आणि तिला सांधेदुखीचा rheumatoid arthritis नावाच्या आजाराचे निदान झाले. thyroid चा उपचार पूर्ण बंद करून सांधेदुखीचा उपचार सुरु झाला आणि रुग्णास बरे वाटू लागले.

असे बरेच रुग्ण आहेत जे thyroid म्हणून फिरत असतात पण निदान काही वेगळेच निघते. किंवा निदान वेगळे केलेले असते आणि thyroid चा त्रास निघतो.

सगळे गोंधळून टाकणारे आहे.

योग्य उपचार , योग्य सल्ला
आयुर्वेदिक थाय्रो केअर सेंटर सातारा

05/02/2015

आपणास वाटत असेल कि हा दुर्धर आजार आहे तर तसे नाही , " thyroid " छे आजारच नव्हे ?????

आपणास thyroid या ग्रंथीचा आजार असून देखील आपण उत्तम प्रकारे त्यावर उपचार घेत असाल ,नियमित उपचार हाच त्यावर मार्ग आहे . प...
05/02/2015

आपणास thyroid या ग्रंथीचा आजार असून देखील आपण उत्तम प्रकारे त्यावर उपचार घेत असाल ,नियमित उपचार हाच त्यावर मार्ग आहे . पण हल्ली thyroid सारखे आजार हे मानसिक ताण तणाव तसेच ज्यापाधातीने डायबेटीस होतो तसा हा आजार खूप सर्वसामान्यान पाने आढळू लागला आहे.

चिंता करण्याची गरज नाही थोडेसे लाईफ modification केले आणि आयुर्वेदाची साथ लाभली तर हा आजार बराचसा नियंत्रित ठेवता येतो . आशर्य म्हणजे हा आजार काही लोकांमध्ये पूर्णत: बारा होणे हीच खरी उपचाराची पोहोचपावती असते.

अश्या प्रकारचे काम करणारे कदाचित व्यंकटेश क्लिनिक हे महाराष्ट्रात एकमेव सेंटर असेल जेथे केवळ thyroid या आजारावर special आयुर्वेदिक उपचार केले जातात .

आपणास लाभ घ्याचा झाल्यास ९८२२५४००९३ या क्रमांकावर सायंकाळी ५ ते ९ पर्यंत फोन करून थेट डॉक्टर यांच्याशी संपर्क साधा .

15/01/2015

The thyroid is one of the most important, and often mismanaged, glands we have working in our body. Located in the front of our neck, this butterfly-shaped gland secretes hormones that control some major functions including weight management, how we use energy, how we metabolize food, and even how we sleep. For women, hormones can shift out of balance during childbearing and menopause, and even under chronic stress, putting them at a higher rate of thyroid conditions than men, and at various times of life.

Address

Matoshree Vaibhav Appartment
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vyankatesh Ayurvedic Thyroid Care Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram