11/01/2022
शिशिर ऋतू आणि कडाक्याची थंडी हे समीकरण तसं ठरलेलंच. शिशिर ऋतू पासूनच उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्य आपल्या तीव्र किरणांनी सृष्टीतील स्नेहांश शोषुन घेतो. म्हणूनच या काळात नुसती थंडी च नाही तर हवेतील कोरडेपणा व रुक्षता ही वाढते. ही रुक्षता केवळ निसर्गापुरती च मर्यादित न राहता शरीरावर ही त्याचा परिणाम होतो. परिणामस्वरूप त्वचा कोरडी व रुक्ष होते.सोरायसिस ,eczema इत्यादी रुक्षतेशी संबंधित त्वचा विकार जास्त बळावतात. टाचांना भेगा पडतात, तळहात, तळपाय अतिशय कोरडे होऊन भेगा पडतात व क्वचित त्यातून रक्त ही येते. सांध्यांमधील स्नेहांश कमी झाल्यामुळे तिथे वात वाढतो त्यामुळे सांधे अखडतात, दुखतात, चालताना कट कट असा आवाज येतो. कंबर दुखी, पाठदुखी जास्त त्रास देते. अशावेळी आपणास आपल्या दिनचर्येत ही बदल करावा लागतो. आपल्या शरीराला आतून व बाहेरून स्निग्धतेची गरज असते म्हणूनच तीळा सारखे स्निग्ध पदार्थ मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ रुपात खाल्ले जातात यामागे हेच शास्त्रीय कारण आहे. परंतु त्वचेवरील रुक्षता व कोरडेपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक सिध्द तेलाने बाह्य स्नेहन व स्वेदन आवश्यक असते.
संपूर्णतः आयुर्वेदिक तत्वांवर आधारीत सिध्द तेलाने सर्वांग स्नेहन ( whole body massage) व आयुर्वेदिक द्रव्यांच्या वाफेने सर्वांग स्वेदन (whole body steam) ही सुविधा "स्पर्शम् आयुर्वेद"श्रीरामपूर येथे उपलब्ध आहे. तरीही गरजू नी अवश्य भेट द्यावी.
*सर्वांग स्नेहन व स्वेदनचे फायदे*
(Benifits of whole body massage and medicated steam therapy)
- शरीरातील वाढलेला वात कमी होऊन हालचाली सुलभ होतात.
- वात दोषामुळे सांध्या मध्ये आलेली रुक्ष ता कमी होऊन सांधेदुखी, कंबर दुखी, पाठदुखी कमी होते.
- शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
- पेशी बळकट व सुडोल होतात.
- त्वचेवरील कोरडेपणा , सुरकुत्या कमी होऊन त्वचेचे नैसर्गिक सौदर्य व कांती वाढते.
- विविध रुक्षतेशी निगडित त्वचा विकार जसे सोरायसिस, eczema यामध्ये होणारा त्रास कमी होतो.
- मानसिक तणाव कमी होतो.
- शांत झोप येते.
*स्पर्शम् आयुर्वेद*.
*जिजामाता चौक, श्रीरामपूर*
*9403789504*
*उपलब्ध सुविधा*-:
*सर्वांग स्नेहन स्वेदन*
*शिरोधारा*
*पादाभ्यांग*
*पंचकर्म*.
*पुरुष व महिला साठी वेगवेगळे प्रशिक्षित थेरपिस्ट उपलब्ध आहेत*