09/05/2021
नमस्कार..
सध्याच्या COVID 19 च्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारकशक्तीचा कस लागलेला पाहायला मिळत आहे. मुळातच निरोगी आरोग्यप्रकृती ही प्रत्येकाच्या जीवनशैलीबरोबरच रोगप्रतिकारकशक्तीवर मुख्यत्वे अवलंबून असते.
आपल्या आयुर्वेद उपचारपद्धतीचा मुख्य गाभा 'रोगप्रतिकारक शक्तीची नियमितपणे वाढ, आणि त्याद्वारे इतर अपायकारक लक्षणांशिवाय शारीरिक व्याधींचे समूळ उच्चाटन' हाच आहे. आयुर्वेदातील ह्याच सूत्राला सर्वांगीण व सखोल संशोधनाची जोड देऊन; शास्त्रोक्त पद्धतीने गेल्या ३४ वर्षांपासून सातत्याने सर्वोत्तम दर्जाची गुणकारी औषधनिर्मिती करणारी सुप्रसिद्ध संस्था म्हणजे *'बागेवाडीकर आयुर्वेद रसशाळा'®
बागेवाडीकर आयुर्वेद क्लीनिकला १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. 'प्राचीन आयुर्वेदीय औषधनिर्माण पद्धती, व काळाच्या कसोटीवर गुणकारी ठरणाऱ्या प्रभावी उपचारांतून रुग्णसेवा' हेच ध्येय उराशी बाळगून वैद्य बागेवाडीकरांची तिसरी पिढी आयुर्वेदाचा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेत आहे. वैद्य बागेवाडीकरांच्या सिद्धहस्त उपचारपद्धतीचा लाभ देश-विदेशातील कित्येक रुग्णांना झालेला आहे, आणि होत आहे.
तर सध्याच्या COVID 19 च्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, घसा खवखवणे व इतर श्वसनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी बागेवाडीकर आयुर्वेद रसशाळेने® *'चैतन्य काढा'* हे अतिशय प्रभावी औषध आपल्याकरता आणले आहे. तुलसी, पिंपळी, काडेचिराईत, रिंगणी, ज्येष्ठमध सारख्या प्राचीन वनौषधींनी सिद्ध अश्या हा चैतन्य काढ्याचे सेवन आबालवृद्ध निर्धोकपणे करू शकतात.
कोणतेही साईड इफेक्ट्स नसलेला आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा *चैतन्य काढा* प्रत्येक घरी हवाच.
_आता नको सर्दी, खोकल्याची भीती_
_'चैतन्य काढा' वाढवे रोगप्रतिकारकशक्ती!