10/12/2025
प्रिय स्वयंसेवकांनो,
तपोवन परिसरात आपण नैसर्गिक रचना (natural hut model) करण्याचा अनुभवाधारित उपक्रम ठेवत आहोत.
यामध्ये माती, गवत आणि शेण वापरून नैसर्गिक बांधकाम प्रत्यक्ष हाताने शिकवले जाईल.
हा उपक्रम पूर्णपणे स्वयंसेवकांच्या सहभागावर आधारित आहे.
कोणत्याही आर्थिक आधाराशिवाय — सर्व स्वयंसेवकांच्या योगदानावर हा उपक्रम चालेल.
महत्त्वाची सूचना: हा उपक्रम फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना खरोखरच माती, शेण, आणि निसर्गाशी हात घालून काम करायचे आहे.
फक्त बघण्यासाठी येणारे किंवा हात खराब होऊ नयेत असे वाटणारे — कृपया सहभागी होऊ नयेत.
हा उपक्रम निसर्गाच्या सेवा, Tapovan Save Tree Andolan आणि नैसर्गिक जीवनशैली शिकण्यासाठी आहे.
---
उपक्रमासाठी लागणारी साहित्य व साधने (अंदाजे):
१. साहित्य
- बांबू (Bamboo) 5 to 10
- माती ( Soil/Clay)
- गवत / भुस्सा (Grass / Straw)
- पाणी (Water)
२. साधने (Tools)
(A) माती कामासाठी (For Soil Work)
- खुरपी (Trowel)
- फावडे (Spade)
- घमेलं (Hoe)
- बादल्या (Bucket)
- भांडी (Container / Pot)
(B) बांबू कामासाठी (For Bamboo Work)
- करवत (Bamboo Saw)
- सुरी / कटर (Knife / Cutter)
- कुऱ्हाड / कुदळी (Axe / Chisel)
- हातोडा (Hammer / Mallet)
- बांबू फोडणी साधन (Bamboo Splitter Tool) – उपलब्ध असल्यास
- फिनिशिंग साधन / सॅंडपेपर (Finishing Plane / Sandpaper)
(C) मोजमाप व बांधणीसाठी (For Measurement & Construction)
- दोरखंड (Rope / String)
- मापनफीत (Measuring Tape)
(D) पाणी व माती वाहतुकीसाठी (For Transporting Soil & Water)
- बादल्या (Buckets)
- भांडी (Containers)
---
३. स्वयंसेवकांकडून आणण्याची अपेक्षित साधने (Bring From Home, if Available)
- हातमोजे (Work Gloves)
- जुने कपडे / कामाचे कापडे (Old / Work Clothes)
- छोटी फावडे / खुरपी (Small Spade / Trowel)
- जुनी बादली / भांडी (Buckets / Containers)
- कातरणारे / कटर / सुरी (Knife / Cutter)
- मापनफीत / टेप (Measuring Tape)
- दोर / पट्टा (sutli) (Rope / String)
---
स्वयंसेवकांकडून अपेक्षा
- वेळेची बांधिलकी (Time Commitment)
- प्रत्यक्ष हाताने काम करण्याची तयारी (Willingness to Work Hands-On)
- निसर्गाबद्दल आदर आणि संवेदनशीलता (Respect for Nature)
- Tapovan Save Tree Andolan मध्ये मनापासून सहभाग (Active Participation)
- नम्रता, टीमवर्क आणि सहकार्य (Humility, Teamwork & Cooperation)
---
ज्यांना खरोखर शिकायचे आहे, हाताने काम करायचे आहे आणि निसर्गाशी जोडलेले अनुभव घ्यायचे आहेत, त्यांनी खालील ग्रुपात सामील व्हावे:
👉 WhatsApp Group: