30/12/2023
शुभंकर आयुर्वेद येथील सुप्रजनन प्रोजेक्ट मधील एक pratikriya-
पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधांचे pregnancy मध्ये होणारे चांगले परिणाम आणि अनुभव मला share करायला नक्की आवडेल.
मी माझ्या वयाच्या 16व्या वर्षीपासून वैद्य अनघा डफळापूरकर (मावशी - आईची च मैत्रीण) यांच्याकडे विविध कारणांसाठी औषध आणि इतर treatment घेत आले आहे, त्यामुळे पंचकर्मातील काही प्रकार ( वमन, बस्ती ) याचा मला खूप चांगला फायदा झाला. मी जेव्हा चान्स घ्यायचं ठरवलं तेव्हा मला मावशीने बस्ती करून घ्यायचे सुचवलं ,त्या मागची कारणे म्हणजे आपले कुठलेही chronic आजार आपल्या बाळा मध्ये येत नाहीत,शरीर शुद्धी होते,डिलिव्हरी साठी लागणारे बळ येण्यास मदत होते,त्याच बरोबर वजन सुद्धा काही प्रमाणात कमी होते,त्यामुळे मी त्यांच्या योग्य सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने "बस्ती" ही 7 ते 8 दिवसाची process पूर्ण केली , आणि त्या नंतर 2 महिन्यांनी लगेच concieve झाले. यामुळे मला विशेष करून जाणवलेले फायदे म्हणजे -
1) पहिल्या 3 महिन्यात सर्व साधारण बायकांना होणारे त्रास (उलट्या,मळमळ,चक्कर येणे इत्यादी) काहीही जाणवले नाहीत, उलट जास्त भूक लागायची
2) पूर्ण 9 महिने एकदाही पाठ दुखी झाली नाही
3) चालणे व व्यायाम चालूच होते पण शेवट पर्यंत खूप फ्रेश राहायला मदत झाली
Delivery नंतर जाणवलेले काही फायदे..
1) आपण असे खूप ऐकतो की डिलिव्हरी नंतर जी झीज होते ( नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा C-sec) ज्यामुळे stamina अर्थात कमी होतो,पण breast feeding साठी बसून बसून माझी कंबर व पाठ एकदाही दुखल्याचे मला आठवत नाही
2) सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पोट भरपूर वाढून सुद्धा माझ्या पोटावर एक ही stretch Mark आलेला नाही ( बस्ती प्रक्रिये मध्ये जे तेल सोडतात शिवाय अंगाला जो मसाज केला जातो त्यामुळे असावे),पण खरोखरच एकही stretch mark नाही
3) सगळ्यात महत्त्वाचा उपयोग बाळा साठी झाला, बहुतांशी लहान बाळांना जन्माला आल्यावर अंगावर लव असते जी काही काळ डाळीचे पीठ लावून घासून काढली जाते, मला मुलगा झाल्या झाल्या doctor व घरचे लोक बघितल्या बघितल्या म्हणले की ह्याचा अंगावर एकही केस नाहीए, Skin खरोखर छान आहे
4) त्याला एकही तेल किंवा पीठ यांची allergy आली नाही, सर्व छान सूट झाले.
5) खूप जणांकडून compliments ऐकायला मिळतात की तो खूप expressive आहे, हसतमुख आहे, एखाद्या गोष्टीवर त्याच्या reactions खूप पटकन येतात
6) बाळांची नजर स्थिर होयला थोडा वेळ लागतो असे म्हणतात, पण याची नजर कधी भिरभिरलीच नाही असेही लक्षात आले
असे छोटे मोठे अनेक फायदे मला या सगळ्या प्रोसेस चे झाले हे मी खात्रीने सांगेन.आणि सर्व प्रेग्नन्सी चे प्लांनिंग करून प्रत्येक स्त्री ने किंवा जोडप्याने याचा जरूर फायदा करून घ्यावा🙂