24/09/2025
🌿आयुर्वेद दिवस - आयुर्वेदाची क्रेझ 🤩 तर सगळ्यांनाच आहे, पण नक्की आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये करतात तरी काय❓जाणून घ्यायचंय❓🤔सांगतो सविस्तर...
(लेख मोठा आहे पण महत्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत वाचा...)
असे माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी ⤵️
आपल्या ।। Shree Shraddha Ayurved ।। या फेसबुक पेजला Follow जरूर करा.
फोन - 082087 13119
23 सप्टेंबर 'आयुर्वेद दिवस' 🌿 निमित्त...
एक तशी खूप कॉमन, सध्या प्रत्येक घरात आढळणारी पण अगदी वैशिष्ट्य पूर्ण केस - 👇🏻
मंगळवारी साताऱ्यात ओपीडी होती, सकाळी 11 वाजता अपॉइंटमेंटला 1 नवीन पेशंट येणार होते. 11.15 वाजले तरी आले नाहीत म्हणून कॉल केला तर समजले की त्यांच्या काकांना अचानक 🫀 हृदयविकारचा त्रास होऊ लागला, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले व त्यामुळे थोडं उशिरा येतो म्हणाले.
काकांची अँजिओग्राफी झाल्यावर दुपारी हे पेशंट तपासणीसाठी माझ्याकडे आले.
"तक्रार विशेष अशी काही नाही, फक्त बॉडी डिटॉक्स 🌊 करून घ्यायची आहे." असं त्यांचं म्हणणं. 😊
सध्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सची सगळीकडे क्रेझ आहे, जाहिरातींमधून अनेक वेळा बॉडी डिटॉक्स 🌊 बद्दल बोललं जातं. त्यामुळे अनेकजण त्यासाठी वेगवेगळ्या आयुर्वेदिक सेंटर्सना भेटी देतात व ट्रीटमेंट घेतात. क्रेझ म्हणून ठीक आहे, पण नक्की डिटॉक्स करणे म्हणजे नेमकं काय❓ आयुर्वेदिक ट्रीटमेंट मुळे शरीरात बदल काय होतात❓ हे पण समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे, अन्यथा ट्रीटमेंट तर घेतली पण नक्की फायदा काय झाला हेच समजले नाही❗असे नको व्हायला. 😇
बरोबर ना...
या केसच्या माध्यमातून समजून घेऊयात...
40 वर्ष वय 👨🏻
जन्म डिसेंबर महिन्यातील, म्हणजेच जन्मप्रकृती उष्ण - वात पित्त प्रधान (आईच्या पोटात गर्भधारणा 9 महिने मागे उन्हाळ्यातील ☀️)
IT कंपनीत जॉब (डे / नाईट शिफ्ट ड्युटी)
सोबत स्वतःचा इन्व्हेस्टमेंट फर्मचा व्यवसाय देखील.
शरीरयष्टी मध्यम... ना बारीक ना जाड... फक्त पोटावर थोडी चरबी वाढलेली. 🫃🏻
सुरुवातीला त्यांचं म्हणणं होतं की मला काहीच त्रास नाही होत, फक्त बॉडी डिटॉक्स 🌊 करायची आहे.
पण कोणतेही आयुर्वेदिक उपचार करायचे म्हणजे पूर्ण माहिती घ्यावीच लागते, त्यामुळे सविस्तर केस घेतली त्यांची. 📝
भूक लागते पण थोडी कमी लागते. 👍
पित्ताचा कसलाही त्रास नाही 👍
उष्णतेचाही कसलाही त्रास नाही 👍
विशेष आहे म्हटलं... जन्म प्रकृती उष्ण 🔥 असूनही उष्णतेचा त्रास बिलकुल नाही❗ 🤔
मग त्यांनीच सांगितलं आत्ता त्रास नाही काही, पण लहानपणी नाकाचा घोळणा 👃🏻 फुटण्याचा, नाकातून रक्त 🤥🩸 येण्याचा त्रास होत होता वारंवार... तसेच लहानपणी तळपायांना भेगा पडणे व त्यातून रक्तस्त्राव 👣🩸 देखील व्हायचा नेहमी❗
पूर्वीच्या आजारांची माहिती घेताना समजले की यापूर्वी 2 वेळा टायफॉईड होऊन गेला आहे, आत्ता recently 15 दिवसांपूर्वीच झालेला. त्याआधी एकदा कावीळ सुद्धा होऊन गेली आहे.
टायफॉईड व कावीळ या दोन्ही आजारात मुख्य परिणाम होतो लिव्हर व आतड्यांवर... कावीळीवर एका आयुर्वेदिक वैद्याकडून त्यांनी औषध घेतले होते. कदाचित या आयुर्वेदिक औषधामुळेच काविळीमधील वाढलेल्या पित्तासोबत लहानपणीच्या उष्णतेच्या तक्रारी सुद्धा कमी झाल्या असाव्यात... असा माझा कयास❗🫡
कुटुंबातील आई वडिलांच्या आजारांची हिस्ट्री घेताना समजले की त्यांच्या आई वडिलांना आता उतारवयात ब्लडप्रेशरचा त्रास चालू झाला आहे... पण या पेशंटला स्वतःला सुद्धा रूटीन तपासणीवेळी ब्लडप्रेशरचे निदान झाले आहे व त्यासाठी गेली 4 - 5 महिनेपासून बीपीची गोळी चालू झाली आहे❗ व गोळी खाऊन देखील बीपी कंट्रोल मध्ये रहात नसल्याने डॉक्टरांनी या महिन्यात त्याच गोळीत दुसरे एक औषध ऍड केले आहे.
बघा... आयुर्वेदिक पूर्ण केस हिस्ट्री घेत असताना कसे एक एक आजार, तक्रारी समोर येत आहेत... 😃
ब्लडप्रेशर हा आयुर्वेदिक डॉक्टरांना सांगण्याचा / बरा करून घेण्याचा आजार नव्हे असं बऱ्याच पेशंट्स ना वाटतं का❓मला पडलेला प्रश्न❗🤔
आई वडिलांना उतारवयात असणारा ब्लडप्रेशरचा आजार या पेशंटला वयाच्या चाळिशीतच चिकटला आहे व त्याचे औषध आता पुढे आयुष्यभर म्हणजे 30 - 40 वर्ष घ्यावे लागणार... त्यात हळूहळू एकाच गोळीत 2 - 3 औषधे कधी ऍड होतात, मध्येच रक्त पातळ करायची, कोलेस्टेरॉलची, डायबेटीस ची अशा हळूहळू गोळ्या वाढतच जातात असे इतर बीपीचे पेशंट्स पाहिल्यावर लक्षात येते.
बरं... ब्लडप्रेशर हा आजार काही कोणत्या इन्फेक्शन, जंतू संसर्गाने किंवा लागलं पडल्याने होत नाही, की ज्याला तात्पुरती एखादी गोळी खाल्ली आणि बरा झाला. तो आपल्या चुकीच्या लाइफस्टाइल ने होतो. पण नक्की चुकतंय काय❓ हेच जर डॉक्टरांनी सविस्तर सांगितले नाही, आपणही स्वतःहून जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, चुका शक्य तितक्या टाळल्या नाहीत, किंवा त्यावर नेमका उपाय केला नाही, फक्त गोळ्या खात राहिलो... तर मग पुढे आणखीनच बिकट परिस्थिती ओढवते❗
बरोबर ना❓
आधीच उष्ण प्रकृती असणाऱ्या या व्यक्तीत जर रोज केमिकलयुक्त गोळी / गोळ्या खाण्यात आल्या तर कमी झालेली उष्णता पुन्हा वाढण्याची नक्कीच शक्यता आहे.
👉🏻 विशेष म्हणजे... आज ज्या काकांना 🫀 हृदयविकाराचा त्रास झाला, त्यांच्याबद्दल समजले की त्यांची यापूर्वी एकदा अँजिओप्लास्टी 🔪 झाली आहे, स्टेंट टाकलेला आहेच, रक्त पातळ करण्याची 💊 औषधे देखील चालू आहेत तरी आता पुन्हा त्रास झाला❗😱 आज अँजिओग्राफी केली तर पुन्हा 60% ब्लॉकेज तयार झालेले आहेत... म्हणजे याचा अर्थ काय❓तर... फक्त आधुनिक औषधे खाऊन आजार पूर्ण बरा होतो का❓ किंवा औषधे खात राहिल्यावर देखील कितपत नियंत्रणात राहतो❓ 🤔
आजच्या त्यांच्या घरच्याच केस वरूनच त्यांना अंदाज यायला पाहिजे❗
बरोबर ना....
कदाचित याचा पूर्व अंदाज आल्यानेच ते बॉडी डिटॉक्स साठी माझ्याकडे आले होते. 👍
लाइफस्टाइल बघितली तर...
स्वतःचा व्यवसाय + IT जॉब, सगळं बसून कॉम्प्युटर वर्क, Work from Home पण शिफ्ट ड्युटीज... कधी मॉर्निंग, कधी इव्हेनिंग तर कधी नाईट ड्युटी...
स्वभाव देखील थोडा तापट 😠 (मूळ प्रकृतीच उष्ण❗🔥)
जेवणाची वेळ उशिरा दुपारी 1.30 वाजता व रात्री 9.30 वाजता.
त्यामुळे पचनाची, पोट साफ होण्याची तक्रार... एकदा साफ होत नाही किमान 3 - 4 वेळा जावे लागते, मल भसरट होतो, गॅसेस चा त्रास.
व्यसन फक्त आठवड्यातून एकदा मद्यपान.
चहा मात्र अगदी क्वचित 👍
पूर्वीची कावीळ, टायफॉईड, सध्याच उशिरा जेवण, आठवड्यातून होणारे मद्यपान इ. चा परिणाम म्हणजे Fatty Liver चे सोनोग्राफीत निदान.
आयुर्वेदिक पोटाच्या तपासणीत देखील यकृताच्या व प्लिहेच्या ठिकाणी दोष संचिती जाणवली व मूत्रपिंडाच्या ठिकाणी देखील थोड्या वेदना होत्याच. म्हणजेच शरीरात दोष साठू लागले आहेत. या आधारेच उपचार करणे गरजेचे आहे हे या पेशंट्स ना सविस्तर समजावून सांगितले.
🎯 या संपूर्ण केसचा सार काय❓
तर आयुर्वेद दृष्ट्या या पेशंटच्या शरीरात वात 🌪️ व पित्त 🔥 दोष मोठ्या प्रमाणात वाढले आहेत व ते बाहेर टाकण्यासाठी रक्तावर व हृदयावर 🫀 ताण येऊन परिणाम स्वरूप ब्लडप्रेशर वाढले आहे. ⏫
आधुनिक डॉक्टरांनी दिलेली गोळी 💊 जरी ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवत असली तरी ती तात्पुरती फक्त 24 तासच, त्याचे मूळ कारण शरीरात वाढलेले वात-पित्त दोष, त्यांचा हृदयावर होत असलेला परिणाम ही गोळी कमी करत नाहीत. ❌
हे वाढलेले वात व पित्त दोष कमी करण्यासाठी, शरीरशुद्धी (बॉडी डिटॉक्स) 🌊 करण्यासाठी वेगळे आयुर्वेदिक उपचार करावे लागणार आहेत. ✅
आता बघुयात आयुर्वेदिक उपचार शरीरशुद्धी (बॉडी डिटॉक्स) 🌊 चे काम कसे करणार या पेशंट मध्ये❓
या पेशंटला आजारपणाचा योग्य अंदाज आल्यानेच तो अगदी योग्य उद्देश घेऊन आला आहे - शरीरशुद्धी म्हणजेच बॉडी डिटॉक्स 🌊 साठी 👍
पण बॉडी डिटॉक्स साठी आले आहेत म्हणून लगेच पंचकर्मातील एकामागून एक बस्ती, वमन, विरेचन, नस्य व रक्तमोक्षण ही पाचही कर्मे करून चालणार नाही. नक्की गरज कशाची आहे❓दोष कोणते वाढले आहेत❓ ऋतू कोणता आहे❓दोषांची अवस्था कोणती आहे❓ याचा विचार करून प्लॅन द्यावा लागेल.
सर्वप्रथम मी सर्व केस पेशंटला समजावून सांगितली. नक्की त्यांचं काय चुकतंय❓यानुसार -
- आहार - नुसती वरवरची पथ्ये न सांगता त्यांच्या मूळ उष्ण (वातपित्तप्रधान) जन्मप्रकृतीनुसार पथ्य-अपथ्य, आहाराच्या वेळा
- पाणी 🫗 पिण्याचे नियम, धनापाणी पिण्याने होणारी रक्त शुद्धी
- व्यायाम - उष्णप्रकृतीनुसार जीम 🏋🏻♂️ पेक्षा योगा 🧘🏻♂️ अधिक योग्य
- मनःशांती - नोकरी + व्यवसाय अशी दुहेरी जबाबदारी निभावताना येणारा मानसिक 😨 ताण कमी करण्यासाठी डायरीलेखन, नामस्मरण 🕉️ इ.चा उपाय
(त्यांना स्वतःला मेडिटेशनचा खूप चांगला फरक आधीपासूनच जाणवत आहे.)
- आयुर्वेदिक औषधे - यकृत (Liver), प्लिहा (Spleen), आतडी, मूत्रपिंड इ. अवयवांची शुद्धी करणारी, ताकद वाढवणारी औषधे
- सर्वात महत्वाचे पित्त प्रकृतीच्या पेशंट मध्ये पित्त व रक्तदुष्टी दूर करणारे विरेचन व रक्तमोक्षण 🩸 हे दोन सोप्पे, कमी खर्चिक पंचकर्म उपचार म्हणजेच शरीरशुद्धी म्हणजेच सर्वांचे लाडके बॉडी डिटॉक्स 🌊 😃
तर अशा रीतीने हा सध्या अत्यंत कॉमन भारतात 28 ते 35% लोकसंख्येला झालेला 😱 अगदी प्रत्येकाच्या घरात किमान 1 - 2 तरी वयस्कर, प्रौढ, तरुण व अगदी लहान मुलांमध्ये देखील आढळणारा, त्यासाठी सुरुवातीला अगदी स्वस्त एखादीच गोळी 💊 चालू होऊन पुढे गोळ्यांची संख्या 💊💊💊💊, खर्च वाढत जाणारा, आयुष्यभर औषधे खावी लागणारा व तरी देखील मध्येच हार्ट 🫀 अटॅक येऊन ICU चा खर्च 💰 वाढवणारा ब्लडप्रेशर चा आजार.
याबद्दल एका पेशंटची केस त्या पेशंट व तुम्हा सर्वांपुढे आयुर्वेद दिवस निमित्ताने मांडता आली, तेवढे सखोल आयुर्वेदिक ज्ञान, निदान व उपचार समजण्याची योग्यता माझ्यात आणून दिली, त्याबद्दल माझ्या गुरूमाऊलींना व भगवान धन्वंतरीना शतशः नमन 🙏🏻
कसे वाटले हे केस चे सादरीकरण❓
आयुर्वेदिक उपचार, बॉडी डिटॉक्स इ. बद्दल सविस्तर सगळे समजले का❓
काही शंका, प्रश्न विचारावे वाटले, काही सूचना, सुधारणा सुचवाव्या वाटल्या तर त्यांचेही स्वागत 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
आपलाच The Ayurvedic Family Doctor
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा
फोन - 82087 13119
(बाहेरगावच्या पेशंट्स ना ऑनलाइन फोन कन्सलटेशन उपलब्ध)