15/03/2021
Dr.Vikas Ratnaparkhe sir यांच्या FB वॉल वरून :
This is second article on vaccination
१६ जानेवारीपासून प्रारंभ झालेल्या लसीकरण मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास अडीच कोटी लोकांनी लसीकरण करून घेतले आहे . या लेखात आपण लसीकरण करण्यासाठी आणि केल्यानंतर काय काळजी घेणे गरजेचे आहे या बदद्दल माहिती करून घेणार आहोत.
लसीकरण करण्यासाठी :आरोग्य सेतूवरून जवळच्या लसीकरण केंद्रावर नाव नोंदणी करून घ्या . दिलेल्या वेळेवरच त्याठिकाणी लसीकरणासाठी जा . विनाकारण गर्दी टाळा .
ज्यांचे वय पंचेचाळीस ते एकूण साठ वर्षांमध्ये मध्ये आहे त्यांनी त्यांच्या वैद्यकीय तज्ज्ञाकडून त्यांना असलेल्या आजारांचे प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे.(मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग कर्करोग इत्यादी ) .
औरंगाबाद महापालिकेने त्यांचे स्वतःचे प्रमाणपत्र तयार केले आहे ते त्यांच्या डॉक्टरकडून पूर्ण भरून घेणे आवश्यक आहे.त्याशिवाय लसीकरण करताच येत नाही.
लसीकरण केंद्रावरील सूचनांचे आणि मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करा . सर्व व्यक्ती त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेऊ शकतात.
आपल्याकडील लसीकरण हे दोन मात्रांचे आहे . पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा २८ दिवसानंतर येतो आणि तो डोस ३ महिन्यांपर्यंत कधीही घेता येऊ शकतो .
शरीरात कोव्हीड १९ ची अँटीबॉडी तयार होण्या साठीचा कालावधी हा ६ आठवड्यांचा आहे. आणि हि अँटीबॉडी आपल्याला ५० ते ६० टक्के संरक्षण देते. त्यामुळे या ६ आठवड्यांच्या कालावधीमध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे , दोन व्यक्तीमधील अंतर सहा फूट इतके असणे आवश्यक आहे.
ज्या ठिकाणी गर्दी जमू शकते अशी सर्व सार्वजनिक ठिकाणे टाळावयाची आहेत. लग्न , मुंज , वाढदिवस , व्यायामशाळा , सिनेमागृहे , मॉल्स या ठिकाणी जाणे टाळायचे आहे.
कारण या कालावधी मध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
लसीकरणानंतर होणारे त्रास : लसीकरणानंतर काही सौम्य स्वरूपाचा त्रास काही जणांना होऊ शकतो. तापयेणे , थंडी वाजणे , अंगदुखी , थकवा , इंजेक्शनची जागा दुखणे याप्रकारचे त्रास होऊ शकतात .अशावेळी घाबरून जाण्याचे काही कारण नाही . हा शरीरात अँटीबॉडी तयार होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. जास्त त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्लाघेणे आवश्यक आहे.
अशावेळी सकस आहार , योग्य प्रमाणात पेयपान आणि संपूर्ण ,आराम अत्यंत आवश्यक आहे.आता आपल्याकडे तापमानाचापारा वाढत चालला आहे त्यामुळे पाणी जास्त प्रमाणात पिणे आवश्यक आहे. लिंबूपाणी हि यावरील चांगली मात्र आहे ( साखरेशिवाय) .
लस घेतले कि पँडेमिक संपणार नाही हि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
लसीकरणामुळे आपली आजारा विरुद्धची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे.
लसीकरण पूर्ण झाले आहे याचा अर्थ त्या व्यक्तीचे लसीचे दोन डोस घेऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत.
लसीकरणाने किती प्रमाणात कोव्हीड १९ आटोक्यात येणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळूनच जाईल. पण हि एक खूप चांगली आणि महत्वाची उपलब्धी झालेली आहे हे नक्की. या वरील कोणत्याही शंकेचे उत्तर फक्त आपल्या डॉक्टरांकडूनच करून घ्या . सोशल मीडियावरील अफवांच्या आहारी जाऊ नका.
आपण घेतलेल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र आपल्याकडे अवश्य डाउनलोड करून ठेवा . याचा भविष्यात अनेक गोष्टींसाठी उपयोग अनिवार्य असा होऊ शकतो( विमानप्रवास , विमा ,परदेश प्रवास इत्यादी ).
दुसऱ्या लाटेतील प्रसाराचे महत्वाचे कारण हे आपल्या स्वतःचा फुकाचा आत्मविश्वास आणि लग्नसराई आणि अनिर्बंध जीवनशैलीत दडले आहे. या सर्व गोष्टीनी आपल्या सर्वांचेच मानसिक खच्चीकरण होत आहे. आणि पुन्हा एकदा आपण त्याच दुष्टचक्रात अडकलो जाण्याची शक्यता आहे. एक जबाबदार नागरिक या नात्याने ICMR ने दिलेल्या किंवा आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा .
सर्व जणांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा .
OUR BEHAVIOUR IS RESPONSIBLE AS WELL AS KEY TO THE SPREAD AND CONTROL OF THE DISEASE.
Please share this to your groups .