27/09/2022
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थित:
नमस्तस्यै नमो नम:|
या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने स्त्री ने स्त्री ची शक्ती ओळखणे म्हणजेच तिच्यातील स्त्री तत्वाचा आदर करण्यासारखे आहे...स्त्री तत्व तिच्या वयात येण्यापासून (रजोवृत्तीपासून) ते रजोनिवृत्तीपर्यंतच्या काळात जे मासिक पाळीच्या स्त्रावाच्या रूपात शरीराबाहेर पडते त्याच्या शुद्ध - अशुद्ध स्वरूपाबद्दल जाणीव असणे , योग्य प्रमाणाबद्दल माहित असणे आणि नियमितता,वर्ण याकडे लक्ष असणे खुप गरजेचे असते ते या करता की , दुर्लक्षाचे परिणाम पुढे गंभीर होऊ शकतात. स्त्राव खूप कमी ,अधिक ,वेदनायुक्त ,दुर्गंधीत अनियमित असेल याचा अर्थ असा आहे की आपली जीवनशैली,आपला आहार यात योग्य तो बदल करून औषधी चिकित्सा वैद्याच्या सहाय्याने केल्यास त्वरित अशा लक्षणांना आळा बसू शकतो पुढे येणारे PCOD,PCOS, स्थौल्य,वन्ध्यत्व आदी विकार टाळता येऊ शकतात.
डॉ अर्चना प्रशांत पेशकार
स्त्री रोग व आहार तज्ज्ञ
संजीवन आयुर्वेद रुग्णालय
दि. 26 सप्टेंबर