24/09/2021
#होमिओपॅथी_उपचारपद्धतीबद्दलचे_समज_गैरसमज - (१) होमिओपॅथीने आजार बरा होण्यास वेळ लागतो, हा गैरसमज आहे. कारण ताप-थंडी, जुलाब किंवा अन्य कोणतेही अल्पमुदतीचे आजार होमिओपॅथीने १ ते ३ दिवसांतच बरे होतात. जुनाट व गंभीर आजारांवर (उदा., उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, संधिवात इत्यादींवर) इतर वैद्यकीय उपचार पद्धतींमध्येही वर्षानुवर्षे किंवा आयुष्यभर औषधे घ्यावीच लागतात. होमिओपॅथीने या आजारांबरोबरच बाकीचे आजारही काही दिवसांच्या नियमित उपचाराने पूर्णपणे बरे होतात. त्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागत नाहीत.
(२) होमिओपॅथी म्हणजे घरगुती उपचारपद्धती आहे, अशीही काहीलोकांची चुकीची धारणा झालेली आहे. केवळ ‘होमिओ’ या शब्दामुळेतो गोंधळ आहे. होमिओ याचा अर्थ आहे समचिकित्सा. याचा घरगुती उपचारपद्धतीशी काहीही संबंध नाही.
(३) लोकांमध्ये असणारा अजून एक गैरसमज म्हणजे एवढ्या लहान गोळ्यांनी एवढा मोठा आजार बरा कसा होणार? जुनाट दीर्घ आजारासाठी एका वेळी अनेक गोळ्या घेणाऱ्या किंवा घ्याव्या लागणाऱ्या रुग्णांच्या मानसिकतेमुळे हा गैरसमज आहे परंतु या छोट्या गोळ्यांमध्येच (सूक्ष्म मात्रेमध्येच) आजार पूर्णपणे बरा करण्याचे सामर्थ्य आहे. होमिओपॅथीमधील एक औषध जुनाट आजारांमध्ये ७ –४० दिवसांपर्यंत प्रभाव करत असते.
(४) फक्त एक किंवा दोन थेंबांनी आजार बरा कसा होणार? हा सुद्धा एक चुकीचा समज लोकांमध्ये आहे. वास्तविक पाहता ८–१० थेंबांनी तेवढाच आराम पडतो, जेवढा १-२ थेंबांनी पडतो. होमिओपॅथिक औषध सूक्ष्म मात्रेमध्येच चांगले काम करते.
(५) होमिओपॅथीमध्ये सगळ्या आजारांवर एकसारख्याच गोळ्या दिल्या जातात, हा सुद्धा एक गैरसमज आहे. गोड गोळ्या सौम्य पद्धतीने औषध देण्याचे एक माध्यम आहे, त्यांमध्ये जे औषध टाकले जाते ते प्रत्येक रुग्णाच्या आजारानुसार वेगळे असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तीनिहाय तयार केलेली औषधे दिली जातात. ताप-थंडीची तक्रार असलेल्या दोन रुग्णांमध्ये सुद्धा एक औषध दिले जात नाही. सांधेदुखी, पचनाचे विकार किंवा इतर कोणत्याही तत्सम आजारामध्ये एखाद्या रुग्णाला ठराविकऔषधाने आराम मिळाला म्हणून तशाच आजाराच्या दुसऱ्या रुग्णाला ती ठराविक औषधे देता येत नाहीत. कारण व्यक्तीचे वय, प्रकृती, आजाराचा कल, कारणमीमांसा, आजाराची पूर्वीची माहिती इ. अनेक गोष्टी विचारात घेतल्याशिवाय रामबाण औषध दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे एक-सारखेच औषध हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे.
(६) होमिओपॅथीमध्ये खूप पथ्ये पाळावी लागतात. कांदा, लसूण, कॉफी, मांसाहार पूर्ण बंद करावा लागतो, हा एक गैरसमज आहे. काही ठराविक आजारांमध्ये मांसाहार बंद करण्याचा सल्ला होमिओपॅथिक डॉक्टर देतात.