Goodwill Health Sciences

  • Home
  • Goodwill Health Sciences

Goodwill Health Sciences Online Nutrition, Fitness, and diet plan services
WhatsApp on
9930577669

We provide services such as telephonic consultation for weight loss and other health issues, weekly diet plans and Detoxification therapy at absolutely affordable rate.

17/12/2022

Simple and complex carbs

प्रत्येक ओळीत लिहिलेलं इमॅजिन करून वाचाल तर नीट समजेल, अन्यथा गोंधळ उडेल.

वजन कमी करण्यासाठी आणि विशेषतः बेली फॅट्स कमी करण्यासाठी सिंपल कार्ब वगळून कॉम्प्लेक्स कार्ब घेणं आवश्यक असते. यात नेमका फरक काय असतो, आणि त्याने पचनावर कसा फरक पडतो हे जाणून घेऊ.

सिंपल कार्ब म्हणजे अशी कर्बोदके जी सहज पचतात. उदाहरणार्थ refined sugars, wheat floor, polished rice, वगैरे. अन्नाचे विघटन चटकन होऊन त्यातून शुगर पटकन रिलीज होते तेव्हा त्या पदार्थांना सिंपल कार्ब म्हणतात.
अन्नाचे पचन होण्याच्या तीन स्टेजेस आहेत. पहिली स्टेज अन्न चावून ते अन्न नलिकेतून पोटात जाते तेव्हाच काही प्रमाणात अन्नाचे विघटन झालेले असते. जेव्हा पदार्थांमध्ये सिंपल कार्ब असतात तेव्हा ती या स्टेज मध्ये चटकन रिलीज होतात आणि तिथल्या तिथे रक्तात शोषून घेतली जातात. अशी चटकन रक्तात शोषली जाणारी कार्ब रक्तात साखरेचे प्रमाण चटकन वाढवतात. (Think about diabetes) शरीराला इतक्या चटकन या साखरेची गरज नसेल तर ती वापरली न जाता शरीरात glycogen स्वरूपात साठवली जाते. अशा glycogen चे साठे शरीरातील सर्व स्नायूंमध्ये आणि लिव्हर मध्ये असतात. गरज लागली तर यातून ऊर्जा मिळवली जाते, जर गरज नाही लागली तर मात्र त्या glycogen चे फॅट्स मध्ये रुपांतर होते. (Think about belly fats and fatty liver)

पचानाची दुसरी स्टेज म्हणजे छोट्या आतड्यात अन्न आले की तिथे होणारे पचन. या भागात अन्न पोहोचते तेव्हा फक्त अशा शुगर्स बाकी असतात ज्या सहज पचणाऱ्या नसतात. म्हणजेच ज्यांचे विघटन कठीण असते. यांना म्हणतात कॉम्प्लेक्स कार्ब. याचे उदाहरण म्हणजे फळे, ज्वारीचे पीठ, whole wheat चे पदार्थ, ब्राऊन ब्रेड, oats, etc. यात दोन प्रकारचे फायबर असतात.

अच्छा! एक लक्षात ठेवा, फायबर सुद्धा एक प्रकारचे कार्ब आहेत. पण उगाच गोंधळ टाळण्यासाठी आपण त्यांना फायबरच म्हणू. तर, दोन प्रकारचे फायबर असतात. एक असतात, पाण्यात विरघळणारे आणि दुसरे न विरघळणारे. या फायबर चे आवरण शुगर च्या भोवती असल्याने ती चटकन मोकळी होऊ शकत नाही आणि रक्तात चटकन शोषली जाऊ शकत नाही. म्हणूनच पोटात असताना ती वाचते... आणि लहान आतड्यात येते. इथे आल्यावर मात्र पचनाचे enzyme तिच्यावर काम करून फायबर ना तिच्यापासून हळूहळू दूर करतात. या वाक्यात "हळूहळू" हा शब्द महत्त्वाचा! कारण शुगर हळूहळू रिलीज होत जाते आणि रक्तात सुद्धा हळूहळू शोषली जाते. त्यामुळे रक्तात तिची पातळी अचानक वाढत नाही, आणि साठून राहण्याऐवजी ती ऊर्जेत रूपांतरित होऊन कामांसाठी वापरली जाते. म्हणूनच कॉम्प्लेक्स कार्ब पासून फॅट्स बनत नाहीत.

तिसरी स्टेज म्हणजे जेव्हा अन्न मोठ्या आतड्यात येते. या स्टेज पर्यंत येताना सर्व कार्बचे बऱ्यापैकी विघटन आणि शोषण झालेले असते. परंतु पाण्यात न विरघळणारे काही फायबर जर अन्नात असतील तर मात्र इथेही काही प्रमाणात असे कार्ब असतात ज्यांच्या भोवती हे न विरघळणारे फायबर आपली मिठी घट्ट आवळून बसलेले असतात. या शेवटच्या टप्प्यात उरली सुरली शुगर अत्यंत कमी वेगात रक्तात शोषली जाते आणि उरलेला गाळ आणि न विरघळणाऱ्या फायबर च्या गठ्ठ्याचे विष्ठेत रुपांतर होऊन ते आतड्याच्या टोकाशी ढकलले जाते.

तर अशी आहे पचनाची पूर्ण प्रक्रिया. याचसाठी जेव्हा वजन कमी करायचे असते किंवा बेली फॅट्स कमी करायचे असतात, तेव्हा तुमचे डाएटिशियन तुम्हाला सिंपल कार्ब वगळायला सांगतात, आणि कॉम्प्लेक्स कार्ब खाण्याची अनुमती देतात.

Dipti Kabade
Certified Nutritionist and Fitness Coach
For enquiry WhatsApp on
9930577669

07/12/2022

डाएट आणि व्यायाम दोन्ही एकत्र का?

आजकाल "डाएट नको, व्यायाम नको" अशा जाहिराती करून वजन कमी करण्याचे आमिष देणारे वाढले आहेत. अनेक लोक याला बळी पडतात. मात्र निरोगी जीवनशैली आणि नैसर्गिकपणे वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम दोन्ही एकत्रितपणे कसे काम करतात हे सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहू.

१. वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या डाएट मध्ये महत्त्वाचा फंडा असतो कॅलरी डेफिसिट. म्हणजे दिवसभरात सगळ्या हालचाली आणि सर्व अवयवांना कार्य करण्यासाठी जितक्या कॅलरीज लागतील त्याहून कमी कॅलरीज दिवसभरात शरीराला पुरवणे. असे करताना एकूण कॅलरीज तर कमी केलेल्या असतातच. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे ज्या पदार्थांमध्ये कर्बोदके जास्त असतात ते पदार्थ अत्यल्प प्रमाणात ठेवले जातात.

२. शरीराला सर्व क्रिया आणि हालचाली करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती शरीर ऊर्जेचे एकक म्हणजे ATP पासून मिळवते. हे ATP वेगवेगळ्या अन्नाच्या पचनातून निर्माण झालेले असते. ग्लुकोज किंवा कर्बोदके यांचे ATP मध्ये रुपांतर सहजपणे होते. म्हणूनच ऊर्जेचा मुख्य स्त्रोत कर्बोदके असतात. मात्र जेव्हा कर्बोदके शरीरात कमी प्रमाणात उपलब्ध असतात तेव्हा शरीर इतर पर्याय शोधू लागते. तो पर्याय म्हणजे शरीरात उपलब्ध असणारे फॅट्स.

३. कर्बोदके न मिळाल्याने शरीर फॅट्स मधून ऊर्जा मिळवण्याच्या कामाला लागते. हे करत असताना फॅट्स मधील द्रव्ये वापरली जातात आणि हळूहळू फॅट्स च्या पेशी कमजोर बनू लागतात. याला fats loosening म्हणतात.

४. वेगवेगळे व्यायाम प्रकार करताना जेव्हा शरीराचे वेगवेगळे भाग वापरले जातात तेव्हा कमजोर झालेल्या फॅट्स पेशींवर त्या हालचालींचा प्रभाव होतो. उदाहरणार्थ, crunches. डाएट न करणाऱ्या व्यक्तीच्या पोटावरील फॅट्स पेशी मजबूत असतात. मात्र डाएट करणाऱ्या व्यक्तीच्या पोटावरील फॅट्स पेशी त्यातील द्रव्ये वापरली गेल्याने आधीच कमजोर झालेल्या असतात. अशा व्यक्ती जेव्हा crunches करतात तेव्हा फॅट्स पेशी तुटत असण्याचा आवाज चक्क ऐकू शकतात. म्हणजेच व्यायाम करणाऱ्या दोन माणसांपैकी डाएट करणाऱ्या व्यक्तीला व्यायामाचा फायदा जास्त होतो.

५. व्यायाम न करता नुसते डाएट केले तरीही परिणाम दिसतो. मात्र या केसमध्ये फक्त तितकीच ऊर्जा वापरली जाते जितकी दैनंदिन कामांच्या हालचालींसाठी आणि सर्व इंद्रियांच्या कार्यासाठी गरजेची असते. मात्र जर या व्यतिरिक्त वेगळे खास व्यायाम केले गेले तर जास्त ऊर्जेची गरज लागते. परिणामी जास्त कॅलरीज शरीरातील वेगवेगळ्या भागातून वापरल्या जातात आणि वजन जास्त कमी होते. दोन डाएट करणाऱ्या व्यक्तींपैकी व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला डाएट चा जास्त फायदा होतो.

याचसाठी मी डाएट देतानाच सोबत लहानसा व्यायामाचा प्लॅन नक्की देते. जो दिवसभरात फक्त एकदाच करायचा असतो. त्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनिटे लागतात आणि आठवड्यातून चार वेळा तो प्लॅन केला तरीही योग्य प्रमाणात कॅलरीज खर्च होऊन अपेक्षित परिणाम दिसतो.

"व्यायाम नको, डाएट नको" पेक्षा वजन कमी करण्याची ही पद्धत जास्त सायंटिफिक आणि सेफ आहे.

Dipti Kabade
Certified Nutritionist and Fitness Coach
For enquiry WhatsApp on
9930577669

तुम्ही व्यायामाबद्दल खूप उत्साही आहात का? हे नक्की वाचा.टेक्सास मध्ये राहणारा एक सत्तावीस वर्षांचा मुलगा, तिथल्या जिम मध...
29/11/2022

तुम्ही व्यायामाबद्दल खूप उत्साही आहात का?
हे नक्की वाचा.

टेक्सास मध्ये राहणारा एक सत्तावीस वर्षांचा मुलगा, तिथल्या जिम मध्ये रोज व्यायाम करतो. भरपूर वजन उचलतो. पण व्यायामामुळे शक्ती वाढण्याऐवजी त्याला रोजच थकवा वाटू लागला. जिम ट्रेनर ने परंपरा जपत प्रोटीन पावडर घ्यायला लावली. तीही तो रोज घेतो. तरीही दिवसभर थकवा. त्याने ट्रेनर ला पुन्हा विचारलं, काय करू? ट्रेनर म्हणाला, तुझा हार्ट रेट खूप वाढतो ना, म्हणून होतं असं. तू जरा सावकाश व्यायाम कर. त्याला हे फारसं पटलं नाही. डॉक्टरकडे गेला. त्यांनी आहारात काही बदल सुचवले. टॉनिक दिले, तरीही तीच परिस्थिती. दिवसभर थकवा.

त्याची भारतात राहणारी आई माझी क्लाएंट आहे. तिने मुलाला सुचवलं, दीप्ती शी एकदा बोलून बघ. मग त्याने कॉल साठी अपॉइंटमेंट घेतली आणि कॉल झाला. एक तास समजावून सांगितल्यानंतर म्हणाला, "आता खरंच शंका दूर झाल्या, तुम्ही सांगाल तसेच करीन"

नक्की काय चुकत होते त्याचे? तेच जे अनेकांचे चुकते. व्यायामासाठी जाताना काहीही न खाता जाणे. हार्ट रेट च्या तिसऱ्या झोन मध्ये व्यायाम करणे. बॉडी ला रिकव्हरी साठी अजिबात वेळ न देणे. दर दिवशी व्यायाम करणे...

माझ्या माहितीत असे अनेक आहेत जे या चुका वारंवार करत असतात. व्यायाम करणे गरजेचे नक्कीच आहे. मात्र त्याचा अतिरेक होत असेल तर शरीराला इजा होण्याच्या शक्यता अधिक असतात, फायदा काहीच होत नाही.
220 वजा तुमचे वय = तुमचा कमाल हार्ट रेट.
या अंकाच्या 75 ते 85% मध्येच राहून व्यायाम करायचा. त्यापेक्षा जास्त हार्ट रेट जात असेल तर लगेच थांबून रेस्ट घ्यायची दोन चार मिनिटे. हार्ट रेट वाढत असताना व्यायाम continue करायचा नाही.

नुसता cardio करत असाल, तोही 60 - 75 % हार्ट रेट झोन मध्ये, तरच रोजच्या रोज करू शकता. त्यापेक्षा जास्त हार्ट रेट असेल तर आठवड्यातून चार दिवस खूप झाले! सोबत वेट ट्रेनिंग करत असाल तर आठवड्यातून तीन दिवस सुद्धा खूप झाले! कारण शरीराला recovery ला वेळ दिला नाही तर बॉडी झिजू लागते. इगो वेट लिफ्टींग, इगो रनिंग कधीच करू नका. दर जास्त पल्ल्याच्या मॅरेथॉन मध्ये एक तरी व्यक्ती झेपत नसताना धावत राहिल्याने मृत्युमुखी पडल्याची बातमी असतेच. काही महिन्यांपूर्वी राजू श्रीवास्तव या लोकप्रिय विनोदवीराचा असाच ट्रेड मिल वर धावत असताना cardiac arrest होऊन मृत्यू झाला.
जो व्यायाम फिटनेस वाढून, आयुष्य वाढवण्यासाठी करायचा असतो तोच जर तुमच्या जीवावर उठणार असेल, तुम्हाला रोगी बनवणार असेल तर काय फायदा?

म्हणूनच अतिउत्साही बनू नका. शरीराचा अंदाज घेत व्यायाम वाढवा. खूप धाप लागली, श्वास तोकडा पडू लागला, हृदयाचे ठोके थेट कानात ऐकू येऊ लागले, कानाचे पडदे वाजू लागले की ताबडतोब व्यायाम थांबवा! पाच मिनिटे आराम करून पुन्हा सुरुवात करा.
हा अंदाज स्वतः ला येत नसेल तर अनेक हार्ट रेट ट्रॅकिंग उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत, ती वापरा.
व्यायामाच्या अतिरेकाने स्वतः चे नुकसान करून घेऊ नका.

Dipti Kabade
Certified Nutritionist and Fitness Coach
Goodwill Health Sciences
For enquiry WhatsApp on
9930577669

08/12/2021

डाएट प्लॅन देणारे लोक वजन वाढवण्यासाठी खूप अंडी खायला लावतात, आणि वजन कमी करण्यासाठी पालक ज्यूस, दुधी ज्यूस आणि असलेच बेचव पदार्थ खायला लावतात असा एक जनरल गैरसमज असतो.
शिवाय वेट लॉस डाएट म्हणजे जेवण कमी करून उपासमार करायची असते, असाही अनेकांचा समज असतो.
या सगळ्याला काट देत गुडविल हेल्थ सायन्सेस तुम्हाला असा डाएट प्लॅन देते ज्यात दर आठवड्याला नवनवीन चविष्ट रेसिपीज असतात. कारण आपल्याकडे आहेत तब्बल 200 रेसिपीज!
तुम्हाला ओट्स आवडत नाही? ऑप्शन आहे...
लिक्विड डाएट ने त्रास होतो? ऑप्शन आहे...
चहा कॉफी सोडायची नाही? हरकत नाही...
कधीतरी बाहेर जावे लागते, बाहेर खावे लागते? हरकत नाही...

कोणत्याच जाचक अटी आणि बंधनं न घालता, स्ट्रेस फ्री मनाने पाळता येईल असा डाएट प्लॅन...

महिन्याची फी, फक्त 500रुपये, कोणत्याही छुप्या चार्जेसशिवाय...

पहिलं पाऊल टाकायचं की नाही, फक्त हेच तुम्हाला ठरवायचे आहे. पुढचा रस्ता दाखवण्यासाठी मी आहे!

Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
Whatsapp on
9930577669

वेट लॉस साठी खास रेसिपीज कशासाठी???कुणा प्रोफेशनल व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय किंवा मदतीशिवाय स्वतःच स्वतःवर प्रयोग करणाऱ्य...
10/11/2021

वेट लॉस साठी खास रेसिपीज कशासाठी???

कुणा प्रोफेशनल व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय किंवा मदतीशिवाय स्वतःच स्वतःवर प्रयोग करणाऱ्या व्यक्ती जे अन्न रोज सेवन करतात त्याचेच प्रमाण कमी करत नेतात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. या अशा प्रयोगाने वजन नक्कीच कमी होते. कारण दिवसभरातल्या कॅलरीज कमी होतात. मात्र ही पद्धत एक दोन किलो वजन कमी करण्यासाठी ठीक आहे. परंतु जेव्हा पाच किलो किंवा त्याहून जास्त वजन कमी करायचे असते (जलद गतीने नाही तर नैसर्गिक गतीने) तेव्हा ही पद्धत अत्यंत हानीकारक ठरते. याचे कारण म्हणजे, असे नेहमीचेच अन्न फक्त त्याचे प्रमाण कमी करून खात असताना कॅलरीज सोबतच व्हिटॅमिस, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम व इतर आवश्यक घटक सुद्धा आहारातून कमी होत जातात. वजन तर कमी होते मात्र काही कालावधीनंतर त्याचे दुष्परिणाम शरीरावर नक्कीच दिसू लागतात.

म्हणूनच प्रोफेशनल व्यक्ती डाएट प्लॅन देताना काही रेसिपीज देत असते. ज्यात सर्व प्रकारच्या फूड ग्रुप चे असे कॉम्बिनेशन असते की कॅलरीज तर कमी होतात, मात्र nutrition कमी होत नाही.

याव्यतिरिक्त डाएट प्लॅन फिक्स कधीच नसावा. म्हणजे रोज एकच पदार्थ अनेक दिवस खाणे, मग तो कितीही हेल्दी पदार्थ असो, सूप असो, सॅलड असो किंवा इतर काही... एकच पदार्थ सलगपणे काही दिवस रोज खाण्याने फक्त त्या पदार्थात असणारे घटक शरीराला मिळतात, मात्र इतर घटकांची कमतरता निर्माण होते. म्हणूनच एखाद्याने एकच पदार्थ रोज खाण्याचा... विशेषतः मेन कोर्स रिप्लेसमेंट म्हणून जर असा एकच पदार्थ रोज काही दिवस खाण्याचा सल्ला दिला तर तो कधीही मानू नये. वजन कमी होईल मात्र आहारातून महत्वाची पोषकद्रव्ये कमी झाल्याने काही महिन्यांनी व्यक्तीला व्हिटॅमिन किंवा कॅल्शियम, आयर्न यासाठी सप्लिमेंट्स सुरू करावी लागू शकतात.

मी डाएट प्लॅन देताना या सगळ्या गोष्टी नीट ध्यानात घेऊन प्लॅन बनवते. त्यामुळे nutrition कमी होत नाही, रोज एकच पदार्थ खाऊन व्यक्ती कंटाळत नाही आणि डाएट consistently फॉलो होतो...

Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
For enquiry whatsapp on
9930577669

गुडविल हेल्थ सायन्सेससाठी एक गोष्ट कौतुकाची आहे की, दिवसेंदिवस वेट लॉस किंवा वेट गेन असा स्पेसिफिक हेतू न ठेवता एक आरोग्...
18/10/2021

गुडविल हेल्थ सायन्सेससाठी एक गोष्ट कौतुकाची आहे की, दिवसेंदिवस वेट लॉस किंवा वेट गेन असा स्पेसिफिक हेतू न ठेवता एक आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करण्याच्या हेतूने डाएट प्लॅन घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
म्हणूनच या विषयावर थोडी माहिती द्यावी असे वाटले. सकस आहार कसा असावा याचे धडे आपण शाळेत असतानाच घेतले आहेत. मात्र आयुष्याच्या शाळेत पाऊल ठेवले की एक वेगळाच अभ्यास सुरू होतो आणि स्वास्थ्यासाठी आवर्जून करण्याच्या गोष्टी हळूहळू मागे पडत जातात...
वर्गीकरण करायचे ठरवले तर अन्नपदार्थांचे तीन भागांत वर्गीकरण करता येते.
१) शरीराची बांधणी करणारे अन्न:
यात प्रामुख्याने प्रथिनांचा समावेश असतो. चिकन, अंडी, दूध, ताक, मासे, पनीर, कडधान्ये, शेंगदाणे हे सर्व शरीराची बांधणी करणारे म्हणजेच प्रथिने पुरवणारे पदार्थ आहेत.
२) शरीराला ऊर्जा पुरवणारे पदार्थ:
यात प्रामुख्याने कर्बोदके येतात. गहू व इतर सर्व धान्ये, बटाटे, रताळी, गोड फळे, असे पदार्थ येतात. यात कर्बोदके जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरातील सर्व पेशींना कार्यरत ठेवण्यासाठी ऊर्जा पुरवण्याचे काम ते करतात.
३) संरक्षण करणारे अन्न:
यात प्रामुख्याने सर्व भाज्या, फळे, गाजर, बीट अशी कंदमुळे हे पदार्थ येतात. या सर्व पदार्थांमध्ये कॅलरीज म्हणजेच ऊर्जा जास्त प्रमाणात नसते. मात्र यात शरीरात अत्यंत आवश्यक असणारे antioxidents भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच हे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, एखाद्या आजाराची तीव्रता कमी करतात, तर कधी आश्चर्यकारकपणे एखादा आजार पूर्ण बरा सुद्धा करतात!

खाली दिलेल्या आकृतीतून आपल्या आहारात प्रत्येक प्रकारच्या अन्नाचे quantitative प्रमाण कसे असायला हवे याची कल्पना येते. एक निरोगी आरोग्यदायी जीवनशैली जोपासताना या आकृतीचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
Whatsapp 9930577669

गुडविल हेल्थ सायन्सेसअडीच महिन्याच्या कालावधीत 53 क्लाएंट्स, आणि 70 रिसीट बनवल्या गेल्या आहेत. हे सर्व तुमच्या विश्वासाम...
25/09/2021

गुडविल हेल्थ सायन्सेस

अडीच महिन्याच्या कालावधीत 53 क्लाएंट्स, आणि 70 रिसीट बनवल्या गेल्या आहेत. हे सर्व तुमच्या विश्वासामुळेच शक्य झाले आहे.
दहा वर्षे सायंटिस्ट म्हणून काम केलेल्या आणि न्यूट्रिशिअन च्या क्षेत्रात नवख्या असणाऱ्या माझ्यासारखीच्या ज्ञानावर आणि माझ्या कामाच्या शिस्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलात. मला कधीही पाहिलेले नसतानाही फक्त ती "मी" आहे म्हणून तुम्ही तुमची सर्वात मौल्यवान गोष्ट... तुमची हेल्थ माझ्या हातात सोपवली. मी तुमची अक्षरशः ऋणी आहे.
क्लाएंट्स चा वाढता उत्साह, त्यांना व्यायामात येणारी मजा, शरीरात आणि मानसिकतेत जाणवणारा सकारात्मक बदल या सगळ्या गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास अधिकच वाढत आहे.
I believe, if you exist in someone's life and you don't do any value addition to his life, your existence is useless...

माझ्या क्लाएंट्स च्या आयुष्यात काहीतरी value addition करण्यात मी थोडीफार यशस्वी होत आहे या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. 🙏🙏🙏

Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
For enquiry whatsapp on
9930577669

हेल्दी वेट लॉस म्हणजे काय?समजा एखाद्या वेट लॉस डाएट प्लॅनने तुमचे वजन एका महिन्यात वीस किलो कमी झाले तर तुम्ही खुश व्हाय...
20/09/2021

हेल्दी वेट लॉस म्हणजे काय?

समजा एखाद्या वेट लॉस डाएट प्लॅनने तुमचे वजन एका महिन्यात वीस किलो कमी झाले तर तुम्ही खुश व्हायला हवे का?
उत्तर आहे, अजिबात नाही. कमी वेळात खूप वजन कमी होणे नैसर्गिक नाही. मी असे नाही म्हणत की हे शक्य नाही. नक्कीच शक्य आहे, परंतु ते हेल्दी मात्र नाही.
शरीरातून अतिरिक्त फॅट्स कमी करताना शरीराचा इतर बॅलन्स बिघडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. आपल्या शरीरातल्या संस्थांना आपल्या वजनाची सवय झालेली असते, त्यात अचानकपणे खूप फरक पडला तर त्या संस्थांमध्ये बिघाड होऊ शकतो. असे अचानकपणे वजन कमी केले तर सोबत अशक्तपणा येतोच! कारण इतक्या जलद गतीने वजन कमी करण्यासाठी अशा डाएट प्लॅन मध्ये एखादा फूड ग्रुप पूर्णपणे वगळलेला असतो. जसे की कीटो डाएट, ज्यात कार्ब्स पूर्णपणे वर्ज्य असतात. किंवा पॅलिओ डाएट, ज्यात धान्य वर्ज्य असतात.
अशा प्रकारच्या डाएटमुळे परिणाम झटपट दिसतो मात्र त्याचे दूरगामी दुष्परिणाम शरीरावर होत असतात. थकवा वाटणे, चक्कर येणे, उत्साह न वाटणे, मरगळ, झोप पूर्ण न होणे किंवा दिवसाही सतत झोपावेसे वाटणे अशा गोष्टी घडू शकतात.
म्हणूनच कोणताही फूड ग्रुप न वगळता, सगळे न्यूट्रिएन्ट शरीराला मिळतील आणि आरोग्य सुधारून, पचनसंस्था सुधारून त्याचा परिणाम म्हणून हळूहळू वजन कमी होईल असा जो डाएट प्लॅन असतो, त्यालाच म्हणतात हेल्दी वेट लॉस प्लॅन.
गुडविल तर्फे दिल्या जाणाऱ्या डाएट प्लॅनमध्ये मी याच गोष्टींवर फोकस करते आणि डाएट प्लॅन बनवते. मला लोकांना फिट आणि हेल्दी बनवायचे आहे, अशक्त नाही...
Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
For enquiry whatsapp on
9930577669

हेल्थ सप्लिमेंट...निलेश अभंग सरांच्या वॉलवर एक पोस्ट वाचली होती. टीन एज मधल्या एका तरुणाला त्याच्या मित्रांनी जिम मध्ये ...
13/09/2021

हेल्थ सप्लिमेंट...

निलेश अभंग सरांच्या वॉलवर एक पोस्ट वाचली होती. टीन एज मधल्या एका तरुणाला त्याच्या मित्रांनी जिम मध्ये नेलं आणि काही दिवसांनी तो अगदी अशक्त होऊन गेला. नुसत्या व्यायामाने हे होणं अशक्य आहे. परंतु जिम मधले मित्र, तिथले self proclaimed गुरू, ट्रेनर्स वगैरे लोक या मुलांना झटपट बॉडी बनवण्याचं आमिष देऊन प्रोटीन पावडर विकतात. चांगली दोन हजार ते चार हजार किंमत असते त्याची. मात्र ती घेण्यामागचे दुष्परिणाम मात्र सांगत नाहीत. हा लेख त्याच्याबद्दल...
व्हे प्रोटीन हे दुधातले विलग केलेले प्रोटीन असते. दुधापासून चीज बनवण्याच्या प्रक्रियेत बनणारे byproduct आहे हे. ते पचायला जड असते. सर्वांच्या शरीराची capacity नसते ते पचवण्याची. दीड दोन तासांचा high intencity व्यायाम, त्यात घाम निघेल इतकं वेट लिफ्टिंग, किंवा तासभर रनिंग, अशा heavy exercize नंतरच शक्यतो हे घ्यावे. मात्र प्रत्येकाला याची गरज नसते. नॉर्मल डाएट ने सुद्धा प्रोटीन बॅलन्स करता येतात. तुम्ही वेगन असाल तरच फक्त प्रोटिन्स घेणं हा नाईलाज असू शकतो. परंतु नॉनव्हेज किंवा अंडी खाणाऱ्या व्यक्तीला हा नाईलाज नसतो.
ही पावडर घेणाऱ्याला दिवसाला चार ते पाच लिटर पाणी पिणे गरजेचे असते. मात्र ज्याचे वजन कमी आहे अशी व्यक्ती इतके पाणी पिणे झेपवू शकत नाही. पाणी कमी पडले तर किडण्यांवर या प्रोटीन चा दुष्परिणाम होऊ शकतो.
क्रिएटीन हे प्रोटीन व्हे प्रोटीन पेक्षा जास्त हानीकारक आहे. ते सुद्धा झटपट बॉडी बनवण्यासाठी दिले जाते.

एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा डॉक्टर कोणतेही औषध किंवा प्रोटीन पावडर prescribe करतो तेव्हा त्यावर त्याची सही आणि शिक्का असतो. कोणत्याही दुष्परिणामांची जबाबदारी तो घेणार असतो. तुमचे जिम ट्रेनर किंवा मित्र अशी कोणतीही जबाबदारी घ्यायला कधीही पुढे येणार नाहीत हे मी तुम्हाला माझ्या सही शिक्यासह लिहून द्यायला तयार आहे.
म्हणूनच माझी सर्वांना विनंती आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी कोणतीही पावडर किंवा प्रोटीन सप्लिमेंट घेऊ नका.
Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
Whatsapp 9930577669

Logo for Goodwill Health Sciences.✌️😊🙏This will be displayed on all receipts henceforth...
12/09/2021

Logo for Goodwill Health Sciences.
✌️😊🙏
This will be displayed on all receipts henceforth...

गुडविल हेल्थ सायन्सेस ही एक सरकारमान्य रजिस्टर्ड सर्व्हिस आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करून, मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळव...
04/09/2021

गुडविल हेल्थ सायन्सेस ही एक सरकारमान्य रजिस्टर्ड सर्व्हिस आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करून, मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळवून आणि सरकारकडे योग्य त्या नोंदणी करूनच याची सुरुवात करण्यात आली आहे.
मी प्रत्येक डाएट प्लॅन सोबत एक कॉम्प्लिमेंटरी वर्कआऊट प्लॅन देते जो घरच्या घरी सहज फॉलो करता येईल. कारण व्यायामामुळे शरीर निरोगी बनते आणि डाएटचा अधिक परिणाम दिसून येतो.
हे सर्व प्लॅन तुम्हाला घरबसल्या व्हाट्सअप्प वर पीडीएफ स्वरूपात मिळतात. कोणत्याही अडचणी असतील तर त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करतो आणि पुढे जातो.
रेसिपीज खास अशा बनवल्या आहेत की त्या झटपट तयार होणाऱ्या, जास्त काळ टिकणाऱ्या आणि परिणामकारक असतील. त्यातले ingredients सहजपणे बाजारात उपलब्ध असतील.
प्रत्येक आढवड्यात किमान एक किंवा दोन नवीन रेसिपीज बदल म्हणून दिल्या जातात, ज्यामुळे डाएट बोरिंग वाटत नाही. सतत एकच पदार्थ खाऊन कंटाळा येत नाही.
कोणतेही सप्लिमेंट नाही, कोणतेही विकत मिळणारे हर्बल ड्रिंक्स किंवा डाएट शेक नाहीत.
अति प्रमाणात बंधने न घालता, फ्लेक्सिबल असा डाएट प्लॅन जो अत्यंत हेल्दी पद्धतीने, आहार नियमांच्या अजिबात विरोधात न जाता वजन कंट्रोलमध्ये आणतो, आणि सोबत आरोग्यही सुधारतो.

Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
For Consultation and enquiry
Whatsapp on 9930577669

Good calories and bad calories...हा फोटो पहा. जर वजन कमी करायचे असेल तर कॅलरीज कमी करायला हवा हे बेसिक सायन्स आहे. सगळे ...
25/08/2021

Good calories and bad calories...

हा फोटो पहा. जर वजन कमी करायचे असेल तर कॅलरीज कमी करायला हवा हे बेसिक सायन्स आहे. सगळे डाएट प्लॅन्स याच बेसिक सायन्सच्या पायावर बनवलेले असतात. मात्र फोटो नीट पाहिला तर तुम्हाला समजेल की यातल्या डाव्या बाजूला जास्त कॅलरीज असूनही ते पदार्थ हेल्दी मानले जातात आणि उजव्या बाजूला कॅलरीज कमी असूनही ते पदार्थ मात्र अनहेल्दी! असे का?

याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर थोडी बायोलॉजी समजून घ्यावी लागेल. कॅलरीज हे ऊर्जेचे फक्त युनिट आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा एखादा पदार्थ पोटात जातो तेव्हा तो किती चांगल्या प्रकारे पचू शकेल हे त्या पदार्थांवर अवलंबून असते.
समजा तुम्ही पालेभाज्या नुसत्या हलक्या उकडून खाल्या, किंवा कच्ची फळे खाल्ली, तर आपल्या शरीराला ते पचवण्यासाठी मेहनत कमी घ्यावी लागते. शिवाय, असे पदार्थ जास्त प्रक्रिया न झाल्यामुळे त्यातली ऊर्जा चांगल्या प्रतीची असते. थोडक्यात सांगायचं तर अशा पदार्थांच्या पचनामुळे बनणारी ऊर्जा जेव्हा रक्तात मिसळते तेव्हा ती शुद्ध स्वरूपाची आणि पूर्ण असते. त्यामुळे शरीर त्या ऊर्जेचा पूर्ण वापर करू शकते. काही शिल्लक राहत नाही, त्यामुळे फॅट्स वाढत नाहीत.

आता येऊया अनहेल्दी अन्नावर. या पदार्थांवर इतक्या प्रक्रिया झालेल्या असतात की त्यातल्या कॅलरीज म्हणजेच त्यातली ऊर्जा ही अशुद्ध स्वरूपाची अपूर्ण ऊर्जा असते. त्या पचवण्यासाठी शरीराला फार मेहनत घ्यावी लागते. (याचा अनुभव प्रत्येकाला कधी न कधी आलेला असेल) ते नीट पचत नाही आणि त्यातून शुद्ध कॅलरीज रक्तात न मिसळता, काही प्रमाणात त्या न पचलेल्या कॅलरीज चे रूपांतर फॅट्स मध्ये होते आणि हे फॅट्स शरीरात मांड्यांमध्ये, कमरेभोवती वगैरे साठू लागतात म्हणूनच लठ्ठपणा दिसू लागतो, वजन वाढू लागते. अशा कॅलरीज ना empty calories असं म्हणतात. याचा अर्थ असा, की या कॅलरीज मध्ये शरीराला ऊर्जा पुरवण्याची क्षमता नसते, शिवाय त्यात मायक्रो न्यूट्रिएन्ट अत्यल्प प्रमाणात असतात किंवा अजिबात नसतात!

मित्रांनो, जर शरीर हे यंत्र आहे तर अन्न हे इंधन आहे. चांगल्या तेलाने जसं वाहन चांगलं मायलेज देतं, तसंच चांगल्या अन्नामुळे शरीर हेल्दी राहतं.

Dipti Kabade
Nutrition Consultant
Goodwill Health Sciences
For consultation booking and other enquiry, whatsapp on
9930577669

Address


410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goodwill Health Sciences posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Goodwill Health Sciences:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram