।। Shree Shraddha Ayurved ।।

  • Home
  • ।। Shree Shraddha Ayurved ।।

।। Shree Shraddha Ayurved ।। We provide Pure Ayurvedic medicines & Panchakarma Treatments to all kinds of Diseases. Specially tre

1st consultation 100 ₹
Follow up 50 ₹

Ayurveda Medicines cost extra (500 to 1000 ₹ for 15 days)

Panchakarma Treatments costs 500 to 1500 per day (as per Treatments)

📘 आशांकुर : एका संघर्षाची आणि नव्या उमेदीची कहाणी 🌱(प्रवास: कॉम्प्लिकेटेड वंध्यत्वाकडून... सुदृढ पालकत्वाकडे) #अध्याय_१ ...
22/11/2025

📘 आशांकुर : एका संघर्षाची आणि नव्या उमेदीची कहाणी 🌱

(प्रवास: कॉम्प्लिकेटेड वंध्यत्वाकडून... सुदृढ पालकत्वाकडे)

#अध्याय_१ : एक 'परफेक्ट' सुरुवात... पण❗️

👫 गोष्ट आहे अनिकेत (३१) आणि प्रिया (२४) ची.
दोघेही उच्चशिक्षित, तरुण आणि मॉडर्न विचारांचे. दोघांचाही जन्म योगायोगाने निसर्गरम्य पावसाळ्यातला (अनिकेत १८ सप्टेंबर, प्रिया ०१ ऑगस्ट) म्हणजेच आईच्या पोटात गर्भधारणा हिवाळ्यातील, त्यामुळे निसर्गतःच तब्येत उत्तम❗️

२०२२ मध्ये सनईचे सूर वाजले आणि हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकले. सुरुवातीची ३ वर्षे स्वप्नासारखी गेली. फक्त एक छोटी अडचण होती—प्रियाला मासिक पाळी अनियमित यायची. पण, "हे आजकाल कॉमन आहे" म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
(पण हेच छोटे दुर्लक्ष पुढे किती महागात पडणार आहे, हे त्यांना ठाऊक नव्हते...)

#अध्याय_२: आनंदावर विरजण 💔

२०२३ साल उजाडले. प्रियाने 'गुड न्यूज' 🤰🏻 दिली. घरात आनंदाचे वातावरण होते.
पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. गर्भाची वाढच झाली नाही आणि मिसकॅरेज झाले. डॉक्टरांनी D & E (गर्भपिशवी धुवून) घेतली.

अनिकेतने प्रियाला सावरले. पुन्हा प्रयत्न सुरू झाले.२०२४ मध्ये पुन्हा प्रेग्नन्सी राहिली. पण यावेळी संकट अधिक मोठे होते.
सोनोग्राफी बघून डॉक्टर गंभीर झाले. म्हणाले, "बाळ पिशवीत नाही, उजव्या नळीत (Tube) अडकले आहे." 😱
याला म्हणतात .
जीवाचा धोका नको म्हणून ऑपरेशन करून उजवी ट्यूब आणि गर्भ दोन्ही काढून टाकावे लागले.

त्यात भर म्हणून, पुन्हा जानेवारी २०२५ मध्ये गर्भाशयात पडदा असल्याचे निदान झाले आणि ऑपरेशन करावे लागले.

#अध्याय_३: शरीराचा ‘विद्रोह’ 🔥

आता प्रिया आणि अनिकेत थकले होते. एकामागून एक ऑपरेशन्स, आधुनिक औषधांचा आणि हार्मोन्सचा मारा... प्रियाचे शरीर आता आतून ओरडू लागले होते.
त्याचे परिणाम बाहेर दिसू लागले:
चेहऱ्यावर मोठे पिंपल्स (Pimples) येऊ लागले. 😣
हातापायावर पित्त (Urticaria) उसळून अंगाची आग होऊ लागली.

डॉक्टर बदलून पाहिले, पण उत्तर तेच — "रिपोर्ट्स, तपासण्या करा, त्यात काही दिसलं तर बघू. आधुनिक विज्ञानात जे दिसत नाही, त्यावर इलाज नसतो❗️"

शेवटी, कंटाळून हे जोडपे एका मित्राच्या सांगण्यावरून आले... डॉ. पाटील यांच्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये❗️ 🌿

#अध्याय_४: डॉ. पाटील आणि 'ती' न पाहिलेली बाजू 🕵🏻‍♂️

डॉ. पाटील हे एक चांगले आयुर्वेदिक वैद्य होते. ते तरुण, तडफदार आणि आधुनिक विचारांचे होते. त्यांनी अनिकेत आणि प्रियाचे जाडजूड फाईलचे रिपोर्ट्स बाजूला ठेवले आणि त्यांच्याशी 'गप्पा' मारल्या.
त्या संवादातून जी सत्ये समोर आली, ती धक्कादायक होती❗️ 👇🏻

१. आईकडून आलेला वारसा ( Issue): 🧬
डॉक्टरांनी विचारले, "प्रिया, तुझ्या जन्माआधी आईला काही त्रास झाला होता का❓"
प्रिया म्हणाली, "हो, आम्ही 4 बहिणी, मी सगळ्यात लहान. माझ्यापेक्षा मोठी बहीण 6 वर्षांनी मोठी. मध्ये माझ्या आधी आईचे दोनदा एबॉर्शन झाले होते."

डॉ. पाटील: "हेच बघ प्रिया❗️ आईच्या गर्भाशयात आधीच दोष निर्माण झाले होते, त्याच स्थितीत तुझा जन्म झाला. म्हणूनच तुला लग्नाआधीपासून पाळी ४५ दिवसांनी येत होती. हे 'बीज अशुद्ध' असल्याचे लक्षण आहे, जे आपण वेळीच ओळखले नाही."

२. जमिनीची मशागत (The Soil Logic): 🌾
डॉक्टरांनी अनिकेतला विचारले, "तुम्ही शेतात दुसरं पीक घेण्याआधी जमीन नांगरता की नाही❓"
अनिकेत: "हो, नक्कीच❗️"

डॉ. पाटील: "मग आपण तेच शरीराबाबत का विसरलो❓ पहिल्या एबॉर्शननंतर D & E करून फक्त 'कचरा' साफ केला, पण गर्भाशयाच्या भिंतीत (जमिनीत) मुरलेला दोष काढलाच नाही. त्यामुळे दुसरी प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये अडकली. आयुर्वेदात याला 'वाताचा प्रकोप' (Vata Disturbance) म्हणतात."

#अध्याय_५: सोल्युशन काय? (The Action Plan) ✅

डॉ. पाटलांनी त्या तरुण जोडप्याला धीर दिला आणि 'आयुर्वेदिक रोडमॅप' तयार केला...

पहिली पायरी: डिटॉक्स ( ) 🚿
"आधी शरीरातील उष्णता आणि केमिकल्स बाहेर काढू. तुझे पिंपल्स आणि पित्त कमी झाले, की समजायचे रक्त शुद्ध झाले. अशुद्ध रक्ताने बाळाचे पोषण कसे होणार❓"

दुसरी पायरी: वाताची दुरुस्ती 🌪️
"गर्भ ट्यूबमध्ये अडकणे, हे 'अपान वायू' बिघडल्याचे लक्षण आहे. तो जर नीट केला नाही, तर पुढे जुळी मुले होणे, बाळाच्या गळ्यात नाळ अडकणे किंवा सिझेराईनची वेळ येणे, असे प्रकार होऊ शकतात. यासाठी आपण 'बस्ती' आणि 'विरेचन' हे पंचकर्म करू."

तिसरी पायरी: टायमिंग ⏳
"तुम्ही दोघेही 'पावसाळ्यात' जन्मलेले आहात, म्हणजे गर्भधारणा हिवाळ्यातील. तुमच्या दोघांची जशी प्रकृती उत्तम आहे, तशीच बाळाची देखील व्हावी यासाठी तुमची शरीरशुद्धी करून आपण येत्या हिवाळ्यातच गर्भधारणेचा चान्स घेऊ. तो काळ तुमच्या बाळासाठी बेस्ट असेल❗️"

#अध्याय_६: शेवट आणि नवी उमेद ✨
डॉक्टरांचे बोलणे ऐकून प्रिया आणि अनिकेतच्या खांद्यावरचे ओझे हलके झाले. त्यांना समजले की, "रिपोर्ट्स नॉर्मल असणे म्हणजे 'ऑल इज वेल' नव्हे❗️"

या कथेचे सार ( ):
तुम्ही तरुण असाल, रिपोर्ट्स नॉर्मल असतील, तरीही जर:
१. पाळी अनियमित असेल,
२. पाळीत पोट खूप दुखत असेल,
३. वारंवार मिसकॅरेज होत असेल.....तर फक्त गोळ्या-औषधे बदलू नका. शरीराची मूळ मशागत करा. ' #बीजशुद्धी' ही काळाची गरज आहे.

त्या दिवशी अनिकेत आणि प्रिया क्लिनिक मधून बाहेर पडले, ते एक सुदृढ, निरोगी आणि नॉर्मल डिलिव्हरीने होणाऱ्या बाळाचे स्वप्न घेऊनच! 👶🏻👣

तुम्हालाही गर्भधारणा संदर्भात काही प्रश्न सतावत असतील, तर आजच योग्य मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाची कास धरा❗️

- आपलाच The Ayurvedic Family Doctor
डॉ.उदय पाटील
।। Shree Shraddha Ayurved ।।
कोरेगाव & सातारा
फोन - 82087 13119

Online Detailed & Total Guidance Available❗️

your details on 82087 13119

22/11/2025
आणखीन एक केस  #प्रेग्नन्सी इच्छुक जोडप्याची👫... ती पण   क्लिष्ट अशा  #वंध्यत्व (मूल न होणे) बद्दल ची...नमस्ते, आपण आपल्य...
18/11/2025

आणखीन एक केस #प्रेग्नन्सी इच्छुक जोडप्याची👫... ती पण क्लिष्ट अशा #वंध्यत्व (मूल न होणे) बद्दल ची...

नमस्ते, आपण आपल्या दसरा – दिवाळी फेस्टिव्हल ऑफर दरम्यान आलेल्या काही प्रेग्नन्सी इच्छुक जोडप्यांच्या केसेस डिस्कस करत आहोत.

आज सांगत असलेली केस ही तशी कॉमनच म्हणता येईल अशी... कारण वंध्यत्व / #इन्फर्टीलिटी च्या अनेक जोडप्यांचे योग्य निदान व योग्य उपचार झाले नाहीत तर बऱ्याच वेळेला हे असेच कॉम्प्लीकेटेड होत जाते. कसे ते बघुयात सविस्तर.... 👇🏻

👫तरुण जोडपे... 👨🏻पती 31 वय (जन्म 18 सप्टेंबर), 👩🏻‍🦱 पत्नी 24 वय (जन्म 01 ऑगस्ट) दोघांचीही #गर्भधारणा त्यांच्या आईच्या पोटात अगदी योग्य ऋतूत हिवाळ्यात. 👍

👩‍❤️‍👨 लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. 2022 मध्ये लग्न... लग्नापूर्वी पर्यंत दोघांनाही मोठे कोणते आजार नाहीत. फक्त त्या महिलेला #मासिक_पाळी_अनियमित येत होती. 🙆🏻‍♀️

स्त्री-रोग तज्ज्ञाकडे थोड्याशा उपचारांनी पहिली प्रेग्नन्सी 🤰🏻 राहिली 2023 मध्ये... पण गर्भाची वाढ व्यवस्थित नसल्यामुळे #मिसकॅरेज 🤦🏻‍♀️ झालं... डॉक्टरांनी गर्भ-पिशवी धुवून (D & E) घेतली.... पुन्हा 2024 मध्ये प्रेग्नन्सी 🤰🏻 राहिली... पण ती राहिली ट्यूब म्हणजेच उजव्या बीजवाहिनी नलिकेत 😇 ( )... त्यामुळे तो गर्भ व उजवी ट्यूब ऑपरेशनने काढून टाकावी लागली... त्यानंतर प्रेग्नन्सी बरेच दिवस राहत नव्हती म्हणून डॉक्टरांनी तपासणी केली असता #गर्भपिशवीत_पडदा आहे असे निदान झाले व त्याचे देखील नुकतेच जानेवारी 2025 मध्ये ⚔️ ऑपरेशन करण्यात आले....

एवढे सगळे करूनही अजून प्रेग्नन्सी तर राहत नाहीच 🤷🏻‍♀️ ( )... पण या सगळ्या ऑपरेशन, औषध उपचारांचा परिणाम या महिलेच्या शरीरावर स्वरुपात दिसू लागला आहे... 🦸🏻‍♀️ #चेहऱ्यावर_पिंपल्स, हातावर पायावर पित्त उसळणे ( )... यामुळे कंटाळून, वैतागून या जोडप्याने आधीचे स्त्री-रोगतज्ञची ट्रीटमेंट सोडून दुसऱ्या स्त्री-रोगतज्ञ 👩🏻‍⚕️ ( ) कडे उपचार चालू केले... खरेतर डॉक्टर बदलून फारसा उपयोग होईल का नाही शंकाच आहे❗ कारण दोन्ही स्त्री-रोग तज्ज्ञांचे विचार, नॉलेज, उपचार करण्याची पद्धत, पॅथी सेमच असणार आहे... आधुनिक वैद्यकीय शास्त्रात सध्या ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’... म्हणजेच 🧾 रिपोर्टस, तपासण्यांमध्ये दोष दिसला तरच व त्यावरच आधारित उपचार केले जातात असे दिसते. पण यातील बऱ्याच गोष्टी त्यांनी पहिल्याच नाहीत... किंवा आधुनिक शास्त्रात या गोष्टीचा विचार च केला जात नाही.... कोणत्या ते बघुयात पुढे... 👇🏻

🎯 #आयुर्वेद शास्त्रानुसार या केसचे निदान -

या केस मध्ये सध्या तरी 👨🏻 #पती मध्ये मोठा कोणता दोष दिसत नाही. त्याचे इ. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यामुळे सध्या तरी त्याचा विचार करण्याची गरज नाही. पुढे मात्र जेंव्हा गर्भधारणा ठेवण्याची योग्य वेळ येईल, त्याआधी पतीच्या देखील छोट्या छोट्या का होईना बीजदोषांचे निराकरण केले जाईलच... 👍

सध्या 👩 #पत्नी बद्दल बघुयात... यांची जन्मतारीख 01 ऑगस्ट म्हणजे गर्भधारणा व जन्माच्या वेळी ऋतू उत्तम होता. त्यामुळे त्यांची वजन उंची ठीक आहे. लग्नापूर्वी इतर कोणते मोठे आजार देखील नव्हते. 👍

ून_आलेली_बीजदुष्टी - जर तुम्ही केसपेपर व्यवस्थित पाहिला तर तुम्हालाही दिसेल कि या महिलेला 3 बहिणी आहेत... या महिलेचा 4 था नंबर, हि सर्वात लहान आहे... मोठी बहिण 6 वर्षांनी मोठी आहे... मध्ये आईचे 2 वेळा #एबॉर्शन 😪 झाले आहेत... याचा अर्थ या महिलेच्या जन्माआधी तिच्या आईच्या गर्भाशय व स्त्री-बीजाची दुष्टी निर्माण झाली आहे.... आधुनिक शास्त्र या गोष्टीला बिलकुल महत्व देत नाही, पण आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भधारणा होण्यापूर्वी त्या स्त्रीचे गर्भाशय हे निरोगी असणे आवश्यक समजते अन्यथा पुढे होणाऱ्या बाळामध्ये जन्मजात दोष होण्याची शक्यता वाढते, विशेषतः पुढची #मुलगी झाली तर तिच्या मासिक पाळीमध्ये दोष येण्याची शक्यता जास्त दिसून येते. 🤦🏻‍♀️

🌾 #शेती करताना जसे आधीचे पीक काढून झाल्यावर पुढचे पीक घेण्याआधी ✅ जमिनीची मशागत केली जाते, तसे आपण 1 #डिलिव्हरी किंवा #अबॉर्शन झाल्यावर #गर्भाशयशुद्धी किंवा त्याची ताकद वाढवण्याचे उपाय ❎ सध्या बिलकुल करत नाही.

या महिलेच्या बाबतीत बघितले तर या महिलेला आईकडून आलेल्या दुषित बिजामुळे किंवा सोबत इतर कारणांमुळे लग्नाआधीपासूनच मासिक पाळी उशिरा 45 दिवसांनी येत होती. याचा अर्थ तिच्या स्त्रीबीज निर्मिती मध्ये दोष होता. 🎯

मासिक पाळीवेळी पोटात दुखणे 😢 किंवा पाळीची डेट अनियमित उशिरा (2 - 3 महिन्यातून) किंवा लवकर (15 ते 21 दिवसातच) येण्याला सर्वसामान्य लोक विशेषतः स्वतः त्या महिला फार मोठी अडचण मानत नाहीत. 😇

परंतु अशा प्रकारे मासिक पाळीतील अनियमितता किंवा पोटदुखी हि गर्भाशयात असलेला छुपा दोष दाखवत असते, 🎯 अबॉर्शन्स, कॉपर-टी चा वापर देखील गर्भाशयात दोष निर्माण करू शकतो. अशा वेळी प्रेग्नन्सी राहण्याअगोदर हे दोष दूर झाले पाहिजेत, (आधुनिक औषधे खाऊन तात्पुरते नव्हे) कोणतेही 💊💉 औषध न खाता किमान 3 महिने मासिक पाळी रेग्युलर वेळेवर व बिलकुल पोट / कंबर / पाय न दुखता येणे, हे स्त्रीबीज शुद्ध असण्याचे एक लक्षण आहे. अन्यथा दूषित बीजामुळे होणाऱ्या बाळात अनेक प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात, विशेषतः होणारे बाळ जर मुलगी असेल तर तिच्या गर्भोत्पाद्क सिस्टीम मध्ये व ती पुढे जन्माला घालणाऱ्या पिढीमध्ये देखील अनुवांशिक दोष निर्माण होण्याची शक्यता वाढते. 😱

या महिलेमध्ये देखील लग्न झाल्यानंतर मासिक पाळीच्या दोषांचा विचार न करता प्रेग्नन्सी ठेवली गेली, त्यामुळे पहिल्या 🤰🏻 प्रेग्नन्सी मध्ये बाळाची व्यवस्थित वाढ होऊ शकली नसेल ❎ व त्यामुळे मिसकॅरेज झाले असावे. D & E मध्ये पिशवी धुणे म्हणजे फक्त गर्भाचा शिल्लक राहिलेला भाग स्वच्छ केला जातो, गर्भाशयाच्या भिंतीमध्ये जिथे गर्भ चिकटलेला असतो तेथील, रक्त, मांस इ. धातूंमध्ये निर्माण झालेला दोष दूर केला जात नाही. या मिसकॅरेजचा, त्याच्यामुळे गर्भाशयामध्ये आलेल्या या दोषांचा कोणताही विचार न करता दुसरी 🤰🏻 प्रेग्नन्सी ठेवली गेली ती ट्यूबमध्येच अडकली 😨. याला आयुर्वेद शास्त्रामध्ये 🌪️ वातदुष्टीजन्य गर्भविकृती म्हटले जाते.

आयुर्वेद शास्त्रानुसार ओटीपोटातील अपानवात 🌪️ हा गर्भधारणा प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा असतो, तो जेंव्हा बिघडतो तेंव्हा गर्भ निर्मितीमध्ये दोष निर्माण होणे, गर्भाची वाढ व्यवस्थित न होणे, / जुळे गर्भ राहणे, गर्भजल कमी होणे, गर्भाच्या मानेभोवती नाळेचे तिढे पडणे , पायाळू गर्भ , #नॉर्मल_डिलिव्हरी न होणे #सिझेराईन_सेक्शन_ऑपरेशन करावे लागणे इ. अनेक परिणाम होऊ शकतात.

अशा रीतीने कोणताही सखोल विचार न करता फक्त आधुनिक तपासण्यांचे रिपोर्ट्स पाहून केले जाणाऱ्या आधुनिक उपचारांनी या महिलेमध्ये प्राकृत गर्भधारणा होण्यास कोणतेही सहाय्य मिळाले नाही, पण उपचारांच्या साईड इफेक्ट्स मुळे इतर त्रास मात्र वाढत गेले आहेत.

🌿 आयुर्वेदिक उपचार काय असणार आहेत या केस मध्ये ? -

👩🏻‍🦱 स्त्री ची बीजशुद्धी -
- यासाठी सर्वप्रथम व सर्वात महत्वाचे आत्तापर्यंत झालेल्या केमिकल उपचारांनी वाढलेले टॉक्सिन्स - उष्णता, पित्त जे रक्तातून त्वचेवर जाऊन पिंपल्स, त्वचेवरील पुरळ इ. लक्षणे निर्माण करत आहे ते कमी करणे, रक्तशुद्धी करणे. कारण उद्या हेच रक्त गर्भाचे पोषण करणार आहे, जर रक्तामध्ये दोष राहिला तर गर्भामध्ये देखील काही ना काही दोष येऊ शकेलच.
- त्यानंतर मासिक पाळी नियमित येण्यासाठी आयुर्वेदिक औषधे, बस्ती, विरेचन, रक्तमोक्षण सारखे पंचकर्म उपचार करून अपानवाताची दुष्टी आधी दूर केली पाहिजे.

सोबत 👨🏻 पतीची देखील आयुर्वेदिक तपासणी करून पुरुषबीजशुद्धी व शुक्रबल वाढवणारे उपचार करावे लागतील. याने मग गर्भधारणा व्यवस्थित राहण्याची शक्यता वाढेल. 🥳

📆 🤰🏻गर्भधारणेस योग्य कालावधी मार्गदर्शन – या जोडप्यामध्ये बीजशुद्धीनंतर उत्तम संतती प्राप्त होण्यासाठी दोषांची समस्थिती असणाऱ्या हिवाळा ऋतूमध्येच गर्भधारणा 👩‍❤️‍👨 राहणे योग्य ठरणार आहे. परंतु यासाठी तेवढी उपचारांमध्ये तत्परता या जोडप्याने दाखवणे गरजेचे आहे.

👉🏻 🤰🏻गर्भिणीकाळातील आयुर्वेदिक उपचार व खाण्या-पिण्याची पथ्ये – या काळात खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेतली तर गर्भाचे योग्य पोषण होईल, कोणत्याही कृत्रिम, केमिकल युक्त कॅल्शियम, व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे 💊 सप्लिमेंट्स द्यायची गरज उरणार नाही. त्यासाठी आहाराचे व्यवस्थित मार्गदर्शन लागते.

👉🏻 नॉर्मल डिलिव्हरी व पुढे नवजात बाळ व बाळंतीणीची 🤱🏻 काळजी – सध्याच्या काळात नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा 🔪सिझेराईन डिलिव्हरी कडे डॉक्टरांचा व काही पेशंट्सचा देखील ओढा असतो. परंतु नैसर्गिकरित्या प्रसूती प्रक्रियेतून बाळाचा जन्म होणे हे 👶🏻बाळ व त्या स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप आवश्यक असते. यासाठी काही औषधे, तेलाने अभ्यंग, बस्ती सारखे उपचार योग्य वेळी केल्यास नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी होणे शक्य होते.

सगळ्या गोष्टी योग्य रीतीने झाल्या तर नक्कीच या कॉम्प्लिकेटेड इन्फर्टीलिटी च्या 👫 जोडप्यामध्ये अगदी विनासायास उत्तम, सुदृढ निरोगी संतती 👶🏻 होणे शक्य आहे, त्यासाठी आपण सर्वजण 'श्रीं'जवळ या जोडप्याला योग्य निर्णय घेण्याची व आयुर्वेद शास्त्रावर श्रद्धा ठेवण्याची सुबुद्धी देण्याची प्रार्थना करूयात. 🕉️🙏🏻

यासारख्या आणखीन कोणाच्या कॉम्प्लिकेटेड इन्फर्टीलिटी च्या केसेस असतील तर योग्य मार्गदर्शन साठी जरूर संपर्क साधा -

आपलाच 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'
👨🏻‍⚕️ डॉ.उदय पाटील
🌿 ।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।। 🌿
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा
फोन 📲 82087 13119, 88884 088884 98732
।। Shree Shraddha Ayurved ।।

बाहेरगावच्या पेशंट्स साठी 📲 फोनवरून ऑनलाइन कंसल्टेशन ची सुविधा उपलब्ध. 🙏🏻

 ***m_Count_Motilityफेस्टिव्हल ऑफर मध्ये आलेल्या प्रेग्नन्सी इच्छुक जोडप्यांच्या केस स्टडीज...नमस्ते, नुकताच प्रेग्नन्सी...
12/11/2025

***m_Count_Motility
फेस्टिव्हल ऑफर मध्ये आलेल्या प्रेग्नन्सी इच्छुक जोडप्यांच्या केस स्टडीज...

नमस्ते, नुकताच प्रेग्नन्सी इच्छुक जोडप्यांसाठीचा आपला दसरा-दिवाळी फेस्टिव्हल ऑफर मध्ये कॅम्प होऊन गेला. यामध्ये आलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण केसेस आपण सोप्प्या भाषेत समजून घेऊयात....

आयुर्वेद शास्त्रानुसार #गर्भधारणा, म्हणजेच #प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

“शुक्रासृग्गर्भिणीभोज्यचेष्टागर्भाशयर्तुषु |
य: स्याद्दोषोअधिकस्तेन प्रकृति: सप्तधोदिता || अ.हृ.शा. 3 / 82

शुक्र म्हणजेच 👨🏻 #पुरुषबीज, असृक म्हणजेच 👩🏻 #स्त्रीबीज, गर्भिणीचा आहार, चेष्टा म्हणजेच विहार (काम, फिरणे इ.), गर्भाशय स्थिती (मासिक पाळी इ.) व गर्भधारणा काळातील ऋतू 🌦️ या सर्वांचा विचार करून जे जे दोष त्यावेळी अधिक मात्रेत असतात, त्यावरून त्या 👶🏻 बाळाची 7 प्रकारांपैकी एक प्रकृती बनते.

#होणारे_बाळ जर आपल्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या देखील 💪🏻 #सुदृढ_व_निरोगी हवे असेल तर प्रत्येक जोडप्याने या सर्व गोष्टीचा विचार करूनच 👫 गर्भधारणा ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

अशा प्रकारचे योग्य मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने #गर्भधारणेस_योग्य_हिवाळा ऋतूच्या आधी दसरा व दिवाळी च्या शुभ उत्सव कालावधीत जोडप्यांच्या तपासणी व मार्गदर्शनाचा कॅम्प फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत आयोजित केला होता.

अपेक्षित होते कि... जास्तीत जास्त जोडपी हि सुदृढ बाळाच्या तयारीसाठी येतील, पण बरीच जोडपी हि प्रेग्नन्सी राहत नाही म्हणजेच #वंध्यत्व ( ) ची तक्रार घेऊन आलेली. म्हणजे आधी त्यांना प्रेग्नन्सी राहण्यातील अडथळा दूर करणे गरजेचे होते, नंतरच इतर विचार...

असो... तर यातील काही केसेस आपण बघुयात....

केस नं 1️⃣ – हि केस आहे एका तरुण जोडप्याची... (दोघांच्या केसपेपरचे फ्रंट पेज सोबत जोडले आहे.)

- यातील पतीचा प्रॉब्लेम आहे - Low S***m Count & Low Motility
- त्याची जन्मतारीख_10नोव्हेंबर, म्हणजेच त्याची आईच्या पोटात गर्भधारणा मार्च मध्ये उन्हाळ्यातील, त्यामुळे मुळचीच क्षार (उष्ण) प्रकृती. त्यातच तो सातारा MIDC तील एका फॉन्ड्री मध्ये काम करणारा एक कामगार, त्यामुळे सतत उष्णतेत काम व शिफ्ट ड्युटी देखील. त्यामुळे नेहमी पोटात पित्त - जळजळ होणे, वारंवार पोटदुखी, गॅसेसचा त्रास, अधूनमधून मूळव्याधीचा त्रास, उष्णता अंगात इतकी कि थंडीत देखील फॅन लावून झोपावे लागते. या सर्वांचा परिणाम म्हणून शुक्र धातू मध्ये आले आहे दौर्बल्य... लग्नानंतर प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून टेस्ट केल्यावर समजले कि स्पर्म काउंट व मोटीलीटी कमी आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार “ #शुक्रं_सोमात्मकं_स्निग्धं❗️” शुक्रधातू हा सोमप्रधान म्हणजेच शीतगुणाचा व स्निग्ध असायला हवा. परंतु वाढलेल्या उष्णतेमुळे तो उष्ण व रुक्ष पडू लागला आहे, त्यामुळे त्याची संख्या ( ***m_Count) व गती ( ) कमी झाली आहे.

- पत्नीचा प्रॉब्लेम आहे #मासिक_पाळीतील_दोष
- तिची जन्मतारीख_31मार्च. म्हणजेच तिची आईच्या पोटात गर्भधारणा पावसाळ्यातील, त्यामुळे मुळचीच आम्ल (पाण्यासारखी) प्रकृती. या प्रकृतीच्या लोकांमध्ये त्यांचा अग्नी, पचनशक्ती मंद असते. आयुर्वेद शास्त्रानुसार “ #आर्तवं_आग्नेयं❗️” म्हणजेच स्त्रीबीज हे आग्नेय उष्ण गुण प्रधान असायला हवे. परंतु या महिलांमध्ये आम्लता जास्त असल्याने विशेषतः स्त्रीबीज वेळेवर न फुटणे, / , त्यामुळे मासिक पाळी वेळेवर न येणे, अनियमित 2 – 3 महिन्यांनी येणे, इ. त्रास असतात. या महिलेच्या बाबतीत देखील हे लग्नाआधी होत होते.
- सध्या हि महिला एका #आयुर्वेदिक_MLM_मार्केटिंग करणाऱ्या कंपनीचे मार्केटिंग करण्याचे काम करत आहे. या कामासाठी मात्र तिला भरपूर बाहेर फिरायला लागत आहे. त्यावेळी अवेळी जेवण, उशिरापर्यंत जागरण, मार्च महिन्यात जन्म असलेले लोक हे पावसाळ्यातील गर्भधारणा असलेने मुळचाच स्वभाव पाण्यासारखा चंचल, अतिविचार करणारा, त्यात बिझनेस, मार्केटिंगचे विचार, प्रेग्नन्सीचे विचार त्यामुळे शांत झोप नाही, डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढू लागली आहेत. आठवड्यातून 2 – 3 वेळा #डोकेदुखी, #अपचन, गॅसेस, #एलर्जिक सर्दी, शिंका इ. अनेक त्रास चालू.

या जोडप्याची ही केस पाहिल्यावर लक्षात येते कि खरेतर या दोघांनाही प्रेग्नन्सी राहण्याची खूप मोठी अडचण नाहीये. #पतीचा_शुक्रदोष व #पत्नीचा_मासिक_पाळीचा_त्रास कमी झाला कि प्रेग्नन्सी राहणे सोप्पे जाईल. त्यांच्या तक्रारी या योग्य उपचार, मार्गदर्शन मिळाल्यास दूर होणाऱ्या आहेत. परंतु तसा सविस्तर पूर्ण विचार कोणी केला नसल्यामुळे आता वगैरे करावे का❓ हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होत आहे.

या जोडप्यातील महिला हि एका आयुर्वेदिक MLM मार्केटिंग कंपनीत काम करत आहे. त्यामधील काही प्रोडक्ट्स वापरल्यामुळे तिची पाळी आता वेळेवर येत आहे, परंतु #पाळीच्या_वेळी_पोटदुखी मात्र भरपूर असते, इतकी कि #पेनकिलर गोळी खावीच लागते. मार्केटिंग करणाऱ्या लोकांकडे काही ठराविक प्रोडक्ट्सच असतात व नेमके कोणते कोठे वापरायचे याचे सविस्तर ज्ञान नसते. त्यामुळे या प्रॉडक्टसचा पाळी वेळेवर येण्यापलीकडे काही उपयोग झाला नाही तिला.

त्या MLM कंपनीचे पुरुषांसाठी शुक्र धातू वाढवणारे प्रोडक्ट्स देखील आहेत, ते पतीला चालू देखील आहेत, परंतु बरेच दिवस खाऊनही उपयोग मात्र झालेला नाही. कारण जोपर्यंत शरीरातील उष्णता कमी होत नाही तोपर्यंत या प्रोडक्ट्सने कदाचित वाढलेले शुक्राणू पुन्हा शरीरातील उष्णतेमुळे मरून जाणार आणि हे प्रोडक्ट्स एवढे महाग 💵 आहेत कि यातील एका डबीच्या किमतीत माझ्याकडच्या या दोघांच्या पूर्ण औषधांचे बिल झाले. 🫣 😃

📋 उपचारांचा ट्रीटमेंट प्लान –

👉🏻 सर्वप्रथम दोघांची #बीजशुद्धी –
- पतीच्या शरीरातील क्षारता (उष्णता) कमी करणेसाठी काही आयुर्वेदिक औषधी कल्प व पंचकर्म उपचारांपैकी बस्ती, विरेचन, रक्तमोक्षण उपचार
- पत्नीच्या शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी काही औषधी कल्प, गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी काही औषधी कल्प, व सोबत पंचकर्म उपचारांपैकी वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण उपचार

यानंतर दोघांच्या लॅब मध्ये तपासण्या (Semen Analysis, USG) नॉर्मल आलेल्या दिसल्या कि...

👉🏻 गर्भधारणेस योग्य कालावधी मार्गदर्शन – क्षार व आम्ल प्रकृतीच्या या जोडप्यामध्ये बीजशुद्धीनंतर उत्तम संतती प्राप्त होण्यासाठी दोषांची समस्थिती असणाऱ्या हिवाळा ऋतूमध्ये गर्भधारणा राहणे योग्य ठरणार आहे. परंतु तेवढी उपचारांमध्ये तत्परता या जोडप्याने दाखवणे गरजेचे आहे. 🎯

👉🏻 🤰🏻गर्भिणीकाळातील आयुर्वेदिक उपचार व खाण्या-पिण्याची पथ्ये – आम्लप्रकृतीच्या महिलांमध्ये प्रेग्नन्सीकाळात आम्लपित्ताचा उलट्यांचा 🤮 त्रास खूप जास्त असतो. वजन वाढणे, अंगाला सूज येणे, ब्लडप्रेशर ब्लडशुगर वाढण्याचा धोका जास्त असतो. तसेच मनस्थिती देखील सतत बदलत 😰 असते. त्यामुळे या काळात खाण्या-पिण्याची बरीच काळजी घ्यावी लागते. दुध, फळे, इ. पौष्टिक गोड पदार्थ प्रेग्नन्सी काळात खाल्लेले चांगले पण यांना बऱ्याच वेळेला आवडीचे नसतात. त्यासाठी आहाराचे व्यवस्थित मार्गदर्शन करावे लागते.

👉🏻 नॉर्मल डिलिव्हरी व पुढे नवजात बाळ 👶🏻 व बाळंतीणीची 👩🏻 काळजी – सध्याच्या काळात नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा सिझेराईन 🔪 डिलिव्हरी कडे डॉक्टरांचा व काही पेशंट्सचा देखील ओढा असतो. परंतु नैसर्गिक प्रसूती प्रक्रियेतून बाळाचा जन्म होणे हे बाळ व त्या स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप आवश्यक असते. यासाठी काही औषधे, तेलाने अभ्यंग, बस्ती सारखे उपचार योग्य वेळी केल्यास नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी होणे शक्य होईल. 🥳

एक 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' म्हणून मी या जोडप्याची फॅमिली कशी निरोगी राहील याचा प्लॅन बनवला आहे, पण हा प्लॅन उपयोगात आणायचा आहे या जोडप्यानेच... डॉक्टर फक्त मार्गदर्शक❗

पण हे सर्व त्या जोडप्याने नीट समजून घेतलं पाहीजे व आयुर्वेदिक उपचार नियमितपणे घेतले पाहिजेत, स्वतःच्या खाण्या-पिण्यामध्ये, विचारांमध्ये बदल केले पाहिजेत. तरच सगळं व्यवस्थित होणार आहे.
बघुयात... पुढे कसं कसं होतंय ते...❗

तुम्ही किंवा तुमच्या घरात देखील 👩‍❤️‍👨 नवविवाहित किंवा प्रेग्नन्सी इच्छुक जोडपे 👫 असेल व फॅमिलीचा संपूर्ण विचार करणारा 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' तुमच्या कुटुंबात हवा असेल तर जरूर संपर्क करा.

तुमचा 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' 👨🏻‍⚕️
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा
फोन 📲 82087 13119

बाहेरगावच्या पेशंट्स ना ऑनलाइन 📲 फोन कन्सल्टेशन दिले जाईल.

।। Shree Shraddha Ayurved ।।

 #लहान_मुलांमध्ये_आयुर्वेदिक_उपचार करता येतात का❓ – एक केस स्टडी।। Shree Shraddha Ayurved ।। नमस्कार, सध्या आयुर्वेदिक उ...
07/11/2025

#लहान_मुलांमध्ये_आयुर्वेदिक_उपचार करता येतात का❓ – एक केस स्टडी

।। Shree Shraddha Ayurved ।।

नमस्कार, सध्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे... विशेषतः कोविड नंतर❗ परंतु अजूनही काही भागात #आयुर्वेद म्हणजे झाडपाल्याची ☘️ औषधे, चुर्णांच्या पुड्या, मुळव्याध मुतखडा सांधेदुखी याच्यापलीकडे आयुर्वेद शास्त्र जाताना दिसत नाही...

#प्रेग्नन्सी व #लहान_मुलांच्या_आजारात तर #आयुर्वेदिक_उपचार घेण्याचा विचार देखील अनेकांच्या मनात येत नसणार...

आज एका केसवरून आपण
#लहान_मुलांमध्ये_आयुर्वेदिक_उपचार_करताना_नक्की_काय_काय_विचार_केला_जातो❓ ते किती #गुणकारी व #सुरक्षित असतात❓ हे बघुयात...

तर आजची केस आहे एका 🧒🏻 5 वर्षाच्या मुलाची....
🏷️ सोबत पेशंटचा केसपेपर 📋 (1st विझिट व फॉलोअप पेज) जोडले आहे.

त्याला लहानपणापासून #वारंवार_सर्दी 🤧 #खोकला_कफ 🤒 होणे, वारंवार स्पेशालीस्ट 👨🏻‍⚕️ डॉक्टरांकडे घेऊन जाणे, #हायर_एन्टीबायोटीक्स, #एन्टीएलर्जिक_औषधे 💊 वारंवार खावी लागणे इ. गोष्टी घडत होत्या व औषधे खाऊन देखील तात्पुरता आराम काही वेळेस मिळायचा परंतु बऱ्याच वेळेला विशेषतः थंड वातावरणात ढास, कोरडा खोकला, बोलताना, पळताना, जिना वरचढ करताना धाप लागणे, 😨 रात्री झोपेत सुई सुई किंवा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे असे त्रास होतच असायचे. याचा परिणाम त्याच्या शारीरिक वाढीवर नक्कीच होत होती. आजारी पडला कि वजन कमी व्हायचे. 🫩

🤔 #का_हा_मुलगा_असा_वारंवार_आजारी_पडतोय❓ त्याच्या व त्याच्यासारख्या इतर लहान मुलांच्या आईवडिलांना पडणारा मोठा प्रश्न...❓

समजून घेऊयात या मुलाबाबत....
📌 सर्वात प्रथम पहावी लागते मूळ #जन्मप्रकृती -
त्याची जन्मतारीख 30 मे 2020,
त्याच्या आईची जन्मतारीख 22 मार्च व
वडिलांची जन्मतारीख 07 जुलै.

आयुर्वेद शास्त्र सांगते....
#शुक्रशोणितसंयोगे_यो_भवेत्_दोष_उत्कट_प्रकृतीर्जायते_तेन ।
- सु.शा. 4 / 63

अर्थ - शुक्र-शोणित संयोगावेळी म्हणजेच गर्भधारणे वेळी जो दोष उत्कट असतो त्याप्रमाणे होणाऱ्या बाळाची प्रकृती बनते.

#शुक्रासृग्गर्भिणीभोज्यचेष्टागर्भाशयर्तुषु |
य: स्याद्दोषोअधिकस्तेन प्रकृति: सप्तधोदिता ||
- अ.हृ.शा. 3 / 82

अर्थ - शुक्र म्हणजेच पितृबीज म्हणजेच पित्याचे बीज, असृक म्हणजेच स्त्रीबीज म्हणजेच मातेचे बीज, गर्भिणी काळात घेतलेला आहार, केलेला विहार म्हणजेच कृती, तसेच गर्भधारणेचा व संपूर्ण गर्भकालावधी यामध्ये त्रिदोषांपैकी जो वात - पित्त - कफ दोष अधिक असतो त्याप्रमाणे प्रकृती बनते. अशी 7 प्रकारची जन्मप्रकृती सांगितली आहे आयुर्वेद शास्त्रात.

आपले बाळ सुंदर व निरोगी व्हावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. आयुर्वेद शास्त्रात जन्माला येणारे बाळ कसे असेल याबद्दल छान मार्गदर्शन केले आहे. बाळाच्या शरीराची व मनाची वैशिष्ट्ये यालाच आयुर्वेद शास्त्रात ‘जन्मप्रकृती’ म्हटले आहे, हि जन्मप्रकृती बाळ पोटात आल्यापासून गर्भ काळात 9 महिन्यात ठरत असते. त्यातही सुरुवातीचे 2 महिने अधिक महत्वाचे आहेत, कारण या 2 महिन्यात त्या बाळाच्या शरीराचा पाया घडत असतो.

या काळात निसर्गात असणारे वातावरण, गर्भिणी मातेने केलेला आहार-विहार, व स्वतः त्या माता-पित्याची जन्मप्रकृती हि त्या बाळाची जन्मप्रकृती घडवण्यास कारणीभूत असते.

म्हणून मी नेहमी म्हणतो... 🤰🏻 #मुलं_जन्माला_घालणं_हे_शेती_करण्यासारखं_समजावं... 🌾
🌤️उन्हाळ्यात कधी कोणता शेतकरी पेरणी करत नाही आणि यंदा जिथं जास्त पाऊस 🌧️⛈️ झालाय... तिथे पण अजून पेरणी झालेली नाहीये❗

वर मी या 5 वर्षाच्या मुलाची व त्याच्या आई-वडिलांची जन्मतारीख दिली आहे, केसपेपर वर देखील याची नोंद पाहू शकता.

या #मुलाचा_जन्म_आहे_मे_महिन्यातील, म्हणजेच गर्भधारणा सप्टेंबर महिना पावसाळ्यातील, नंतर ऑक्टोबर हिट व पुन्हा थंडीचे ४ महिने, म्हणजेच आईच्या पोटात असताना निसर्गात थंड वातावरण, सोबत #आईचा_जन्म_मार्च_महिन्यातील म्हणजेच तिची तिच्या आईच्या पोटात गर्भधारणा पावसाळ्यातील, त्यामुळे कफप्रधान जन्मप्रकृती... #वडील_देखील_जुलै_जन्म, गर्भधारणा हिवाळ्यातीलच त्यामुळे त्यांची जन्मप्रकृती देखील कफप्रधानच, त्यांना देखील सर्दी, कफाचा त्रास आहेच.

तुम्ही केसपेपरवरच्या नोंदी नीट पहिल्या तर दिसेल कि या मुलाच्या आईला लग्नाआधी 4 वर्ष सर्दीचा खूप त्रास होता... प्रेग्नन्सी काळात देखील 3 महिने सर्दीचा व उलट्यांचा त्रास होत होता.

तसेच या मुलाचा जन्म झाला आहे ऑपरेशन ने... म्हणजे डिलिव्हरी वेळी आईच्या पोटातून प जो संघर्ष करावा लागतो तो या मुलाला करावा लागला नव्हता❗ त्यामुळे मुळातच रोगप्रतिकारक शक्ती कमी असण्याची शक्यता आहे.

अशा रीतीने या 5 वर्षाच्या मुलाच्या बाबतीत असे दिसून येईल कि त्याच्या
- आई-वडिलांची जन्मप्रकृती कफप्रधान,
- आईला गर्भधारणेपूर्वी कफ-पित्ताचा त्रास (बीजदुष्टी) व
- स्वतः पेशंटचा गर्भकाळ देखील थंड वातावरणात...
त्यामुळे या मुलामध्ये मुलतःच कफ दोष प्राधान्य आहे. त्यामुळे त्याला वारंवार सर्दी, खोकला व कफाचा त्रास होणे हे अत्यंत स्वाभाविक आहे.

अशा केसमध्ये आपण मागे जाऊन काही त्याची जन्मप्रकृती बदलू शकत नाही, पण यापुढे त्याच्या खाण्या-पिण्यात कफ वाढणार नाही अशी काळजी घेतली तरी आजारी पडण्याचे प्रमाण कमी करता येते. सोबत कफ कमी करणारी आयुर्वेदिक साधी-सोप्पी औषधे दिली तरी पटकन रिझल्ट मिळालेला दिसत आहेच. फोलोअप केसपेपर सोबत जोडलेला आहे तो पहा...

#दीड_2_महिन्यापासून_आधुनिक_केमिकल_औषधे_अँटिबायोटिक्स_ला_न_जुमानणारा_कफाचा_त्रास... #फक्त_15_दिवसांच्या_आयुर्वेदिक_औषधाने_कमी_झाला आहे.

आणखीन #कोण_कोणत्या_आजारात_लहान_मुलांना_आयुर्वेदिक_उपचार_देता_येतात❓
तसं तर आयुर्वेदिक उपचार हे सर्वांना अगदी #नवजात_बाळापासून (त्याआधी #प्रेग्नन्ट महिलांनाही) ते #वयस्कर 100+ वयाच्या लोकांनाही सर्व प्रकारच्या आजारात अगदी सुरक्षित रित्या डॉक्टरांच्या सल्ल्याने देता येतात.

लहान मुलांमध्ये #सर्दी_खोकला_ताप, #उलटी_जुलाब इ. छोट्या तक्रारींपासून ते लहान मुलांमधील #डायबेटीस, #थायरॉईड, #हृदयरोग #सांधेदुखी अगदी #ब्लडकॅन्सर च्या #केमोथेरपी चालू असलेल्या लहान मुलीला देखील मी स्वतः आयुर्वेदिक उपचार दिले आहेत.
याशिवाय #सोरायसिस म्हटले गेलेल्या #त्वचारोग मध्ये देखील खूप चांगले, मुळापासून कायमचे बरे झालेले लहान पेशंट्स आहेत.

मुळात कोणतीही औषधे आजार बरे करत नसतात, आपले शरीरच स्वतः स्वतःला बरे करत असते, आपल्याला फक्त शरीराला मदत करायची असते. डॉक्टर तर फक्त उत्तम मार्गदर्शक असायला हवेत❗
आयुर्वेदिक औषधांमध्ये कोणतेही अँटिबायोटिक, स्टिरॉइड्स किंवा एलर्जी कमी करणारे केमिकल वापरलेले नसतात त्यामुळे या औषधांचा कोणताही साईड इफेक्ट, दुष्परिणाम या लहान मुलांच्या डेव्हलपमेंट वर, वाढीवर होत नाही.

उलट अनेक मुलांमध्ये जन्मतः असणारी उष्णता, पचनाच्या, बद्धकोष्ठतेच्या समस्या या त्यांची व्यवस्थित वाढ होऊ देत नसतात, त्या अडचणी दूर झाल्या की लहान मुलांची उंची वजन वाढलेली अनेक मुलांमध्ये दाखवता येईल.

👉🏻 सर्वसामान्य लोकांचे चुकते कुठे ? हे बघणे महत्वाचे आहे....

नेमका माझा मुलगा किंवा मुलगी आजारी का पडतेय वारंवार❓
🎯 नेमका दोष कुठे आहे❓
हे समजून घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही.

आधुनिक शास्त्रातील डॉक्टर्स सुद्धा फार काही आजाराच्या मुळाशी न जाता, फक्त लॅब रिपोर्ट्स 📄 पाहून जास्तीत जास्त औषधे, हायर एन्टीबायोटीक्स,💉 एलर्जि शरीरात दाबणारी औषधे 💊 देत राहतात.
सर्व काही डॉक्टर व औषधांनीच बरे करायचे म्हटल्यावर शरीराची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती काम करेनाशी होते व त्यामुळे शरीर वारंवार आजारी पडू लागते❗

या पेशंट मध्ये सुद्धा मी मागच्या फाईल बघितल्या... वारंवार आजारी पडत असल्याने अनेक स्पेशालीस्ट डॉक्टरांकडे दाखवलेले होते, अनेक प्रकारची औषधे वापरली गेली होती. त्यातील एका डॉक्टरांनी तर त्याला अनेक दिवस #स्टेरॉइड्स देखील दिले होते. याचा परिणाम म्हणून या पेशंट मध्ये विकृत उष्णता (Heat), पित्त वाढून अंगावर पुरळ येणे, अंग सतत गरम राहणे इ. त्रास चालू झालेले. अशा बऱ्याच केसेस बघायला मिळतात कि ज्यात मुख्य आजार राहतो बाजूलाच व इतर तक्रारी, औषधांचे दुष्परिणामच जास्त भोगावे लागतात.

माझे सर्वांना या केसस्टडीच्या माध्यमातून हेच सांगणे आहे कि.... आपले भारतीय आयुर्वेद शास्त्र हे एक सखोल, परिपूर्ण विचार करणारे आरोग्य शास्त्र आहे... विशेषत: लहान मुले व गर्भिणी स्त्रिया यांच्यासाठी साध्या-साध्या तक्रारींपासून ते मोठ-मोठ्या आजारात देखील आयुर्वेदिक उपचारांना प्राधान्य द्या. कारण आपल्या संपूर्ण कुटुंबाचा, आपल्या पुढच्या पिढीचा उत्कर्ष हा त्यांच्याच हातात आहे. गर्भिणी स्त्रिया व लहान मुलांमध्ये निर्माण झालेला आरोग्याचा दोष हा आपल्या आत्ताच्या व पुढच्या कित्येक पिढ्यांना आर्थिक व शारीरिक दृष्ट्या भोगायला लागू शकतो.

✅ आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून (जाहिरात बघून / MLM मार्केटिंग / दुकान विक्रेत्याकडून नव्हे ❌) घेतलेले उपचार हे पूर्णतः सुरक्षित व आजार मुळापासून बरे करणारे असतात.

बघा पटलं तर...

आपलाच 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर,
कोरेगाव & सातारा
फोन - @82087 13119

"श्री व आयुर्वेद शास्त्रावर श्रद्धा ठेवा, सर्व काही बरं होईल❗"

05/11/2025

Perception, Consciousness Belief, Faith, Will Power, how they work in the human system❓
A perspective with some scientific backing...

कोण म्हणतं...  #आयुर्वेदिक_औषधांनी_उशिरा_गुण_येतो...❗ आणि  #आधुनिक_केमिकल_औषधांनी_पटकन_गुण_येतो...❓"बघा... ही केस आणि ठर...
26/10/2025

कोण म्हणतं... #आयुर्वेदिक_औषधांनी_उशिरा_गुण_येतो...❗ आणि #आधुनिक_केमिकल_औषधांनी_पटकन_गुण_येतो...❓"
बघा... ही केस आणि ठरवा तुम्हीच... 😊

असे माहितीपूर्ण मेसेज नियमित मिळवण्यासाठी ⤵️
https://chat.whatsapp.com/EDUIKsg2q91CUtVouuVxqY या लिंकवरून
आपल्या ।। Shree Shraddha Ayurved ।। फॅमिली व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुपला जरूर जॉईन व्हा.

नमस्कार... मी जेव्हा कोणाला मी BAMS डॉक्टर आहे व शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो असे सांगितले की भेटणारा नक्की विचारतो...
"आयुर्वेदिक औषधांनी उशिरा गुण येतो ना❓"
त्यांच्यासाठी अशा अनेक केस दाखवण्यासारख्या आहेत... त्यातली नुकतीच घडलेली ही केस बघा...

या केसमध्ये या मुलीचा लहानपणापासूनचा जुनाट पोटाचा आजार 3 महिन्यात पूर्ण बरा झालेला... पुढे 8 वर्ष पोटाचा काही त्रास नाही❗

तसेच नुकताच झालेला जुलाबाचा त्रास - खाण्यात चुकीचे पदार्थ आल्याने पोट बिघडले, त्यासाठी MD तज्ञ डॉक्टरांकडे सुरुवातीला 4 दिवस ऍडमिट होऊन व 8 - 10 दिवस तोंडावाटे आधुनिक केमिकल औषधे, हायर अँटिबायोटिक्स घेऊन पण जुलाब थांबत नव्हते. त्याच पेशंटला आयुर्वेदिक औषधाने 3 दिवसात जुलाब पूर्णपणे थांबले.

📷 👉🏻 पेशंटचा केसपेपर, MD डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रिपोर्ट्सचे फोटो व तिच्या वडिलांचा बरे झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोबत जोडले आहेत ते देखील अवश्य बघा. (प्रायव्हसीसाठी नाव खोडले आहे)

#नो_केमिकल्स_नो_अँटिबायोटिक्स_नो_साईड_इफेक्टस...लहान मुला-मुलींसाठी 👶🏻👧🏻🧒🏻 तर एकदम #सेफ_ट्रीटमेंट❗

म्हणून म्हणतो...
"तुमच्या कुटुंबातील सर्वांसाठी, विशेषतः लहान मुले 👶🏻 व प्रेग्नन्ट 🤰🏻 महिलांसाठी सर्व प्रकारच्या आजारपणात तुमच्या #आयुर्वेदिक_फॅमिली_डॉक्टर चा सल्ला व उपचार जरूर घ्या❗"

संपर्क -
The Ayurvedic Family Doctor
👨🏻‍⚕️ डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा

📲 अपॉइंटमेंट साठी संपर्क - 082087 13119

#बाहेरगावच्या_पेशंट्सना_फोनवरून_ऑनलाइन_कंसल्टेशन_मार्गदर्शन_उपलब्ध❗

Address

Shree Shraddha Ayurved, Above Buladhana Urban Co. Op. Bank, Bajarpeth Road, Azad Chowk

415501

Opening Hours

Monday 09:00 - 19:00
Tuesday 09:00 - 19:00
Wednesday 09:00 - 19:00
Thursday 09:00 - 19:00
Friday 09:00 - 19:00
Saturday 09:00 - 19:00

Telephone

+918208713119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ।। Shree Shraddha Ayurved ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ।। Shree Shraddha Ayurved ।।:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram