Osteon Hospital Accident & Spine Centre

Osteon Hospital Accident & Spine Centre हाडांचे फ्रॅक्चर, मणक्याच्या आणि सांध्याच्या दुर्बिणद्वारे तसेच प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे रूग्णालय.

05/09/2023
21/08/2022

सर्वाइकल स्पॉन्डिलोटिक मायलोपॅथी आजाराने ग्रस्त रुग्णाला चालता न येणे, दोन्हीही हाताच्या मुठींमध्ये ताकत नसणे, नीट खाता न येने. जेवताना पातळ पदार्थ हातावर ओघळने. केस विंचरताना हातातून कंगवा गळून पडने. एका हाताने शर्टाचे बटन लावू न शकने. अशी लक्षणे आढळतात.

बारीक निरीक्षण करता रुग्णांना हायपर रिफ्लेक्सीया म्हणजे हातापायात ताठरपणा येतो. अशीच एक दुर्मिळ निरीक्षण म्हणजे Hoffman's sign. हया व्हिडिओ मध्ये ती कशी करतात याचे मार्गदर्शन केले आहे.

डॉ मंदार भोसले
ऑस्टीऑन हॉस्पिटल,
०२४१ २४२१२३४

16/08/2022

पोपाय नावाचे प्रसिद्ध कार्टून तुम्ही पाहिले असेल, त्यात पोपायला spinach अथवा पालक खाऊन सर्व शक्तिमान ताकत येते. आणि गंमत म्हणजे ती सगळी ताकत त्याच्या बाहुत म्हणजे bicep स्नायुत जाते. त्यासमान जर bicep स्नायु फाटला तर पोपाय deformity तयार होते.
सारखं मेहनतीचे कष्टाचे काम करून ( मोटार वाईंडींग, घण चालवणे, खड्डे खणने, खुरपने) आदींनी असा आजार होऊ शकतो.
त्यामधे खांद्यात दुखणे, हाताने ताकत न लागणे असे लक्षण दिसू शकतात.
आणि हे पूर्णपणे नीट होऊ शकते.
तुम्हाला अथवा कुणी परिचित व्यक्तींना असा आजार असेल तर तुम्ही संपर्क साधू शकतात.

डॉ मंदार भोसले
ऑस्टिओन हॉस्पिटल
०२४१ २४२१२३४

10/08/2022

मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुक्तपणे चालणाऱ्या माझ्या पेशंट.
त्यांच्या चेहरयवरचा आनन्द लपवताना..

जन्मजात व्यंग नाहीसे करण्यासारखे दुसरे उत्कृष्ट काम जगात काही नाही.
22/02/2022

जन्मजात व्यंग नाहीसे करण्यासारखे दुसरे उत्कृष्ट काम जगात काही नाही.

Thumb must be on talar neck, not on Cuboid.Mind your fingers before putting them on right spot.
29/01/2022

Thumb must be on talar neck, not on Cuboid.
Mind your fingers before putting them on right spot.

11/03/2021

७० वयाचे आजोबा मागील सहा महिन्यापासून दोन्हीही पायात ताकत नसल्याने चालू शकत नव्हते. मणक्याचे ऑपरेशन करून १ महिन्याच्या आत ते पुन्हा उठून चालू लागले. रुग्णाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आपल्या कामाची पावती मिळाली.

यापेक्षा जगात दुसरा चांगला व्यवसाय नाही. असू शकत नाही.

ऑस्टिओन हॉस्पिटल, कोठी रोड, जुना कांदा मार्केट शेजारी, अहदनगर येथे कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू केले आहे. तरीहि ६० वर्षां...
06/03/2021

ऑस्टिओन हॉस्पिटल, कोठी रोड, जुना कांदा मार्केट शेजारी, अहदनगर येथे कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू केले आहे. तरीहि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षां पुढील इतर आजार (बी पी, डायबेटिस, हृदयरोग इत्यादी) असणाऱ्या व्यक्तींना लसीचा लाभ घेता येईल. या लसिकरणासाठी आरोग्य सेतू किंवा कोविन (कोवीन) ॲप वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याची माहिती खालील लिंक वर क्लिक करून मिळेल. https://youtu.be/S1EvnoyXRow
ज्या व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही, अशांना हॉस्पिटलमध्ये नोंदणीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल.
सोबत खालिल पैकी कोणतेही ओळखपत्र आवश्यक आहे.
१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) वाहन परवाना
४) पास पोर्ट
५) पेन्शन पासबुक
संपर्क : (०२४१) २४२१२३४, ९०११११४४४९, ९७६५०९७५७९, ९२७०८१३४६४

ेशात आज १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरची लस घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोद.....

06/05/2020

मोफत शस्त्रक्रिया !!! मोफत शस्त्रक्रिया !!!

महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हाडांचे फ्रॅक्चर, गुढघ्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया होणार आता मोफत.

मोफत शस्त्रक्रिया !!! मोफत शस्त्रक्रिया !!!

ऑस्टिओन हॉस्पिटल,
भाजीपाला मार्केटशेजारी,
सावता लॉज मागे, कोठी रोड, अहमदनगर (०२४१) २४२१२३४
संपर्क : 078220 53835, ९७६५०९७५७९ .

16/03/2020

जन्मल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी ह्या चिमुकलीला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत तिचे पालक घेऊन आले. तिला एक अत्यंत दुर्मिळ असा कॉन्जनायटल नी (गुडघा सटकन किंवा निखळणे ) डिसलोकेशन आजार होता.
केवळ ३ प्लास्टर नंतर तिचा पाय सरळ करण्यात आम्हाला यश आले. कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागली नाही.

बाळ आता सुखरूप आणि संपूर्ण निरोगी आहे. तिला भावी आयुष्यासाठी ऑस्टिओन हॉस्पिटल परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा

08/03/2020

स्पॉन्डिलोटिक मायलोपॅथी आजाराने ग्रस्त २८ वर्ष्यांच्या तरुणावर एक महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रिया पूर्वी रुग्णाला चालताही येत नव्हते, दोन्हीही हाताच्या मुठींमध्ये ताकत नव्हती. सदर रुग्णाला नीट खाताही येत नव्हते, जेवताना पातळ पदार्थ हातावर ओघळायचे. केस विंचरताना हातातून कंगवा गळून पडायचा. एका हाताने शर्टाचे बटन लावू शकत नव्हता.

सदर रुग्णावर मानेच्या पाचव्या आणि सहाव्या मणक्याची सर्वाइकल कॉर्पेक्टॉमी आणि सर्वाइकल फ्युजन (cervical C5_6 corpectomy subtotal and fusion) नावाची शस्त्रक्रिया करून एक महिन्याच्या आत रुग्ण चालायला लागला.

ऑस्टिओन हॉस्पिटल तर्फे रुग्णास पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

Address

Behind Savata Lodge, Kothi Road
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Osteon Hospital Accident & Spine Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Osteon Hospital Accident & Spine Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category