28/11/2025
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय परिसंवादामध्ये ( Conferance) डॉ. महेश मुळे यांचे वंध्यत्वावर व्याख्यान
दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे आयुर्वेद व्यासपीठाच्यावतीने
दृष्टकर्मता निःसंशय कराणाम( Clinical Insights In Ayurveda)या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. This conference was Recognized by NCISM & MCIM. संपूर्ण महाराष्ट्रातून या परिसंवादाला 620 डॉक्टर्स उपस्थित होते.
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पुरुष वंध्यत्वाचे निदान व उपचार( Diagnosis & Treatment of Male Infertility by Ayurveda) या विषयावर डॉ. महेश मुळे यांचे एक तासाचे व्याख्यान झाले.
हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने किती उत्तम प्रकारे शुक्र परीक्षण Semen Analysis करता येते व या पद्धतीने केलेले परीक्षण आधुनिक प्रयोगशाळेच्या तपासण्यानुसार किती तंतोतंत पद्धतीने योग्य ठरते हे त्यांनी अनेक पेशंटच्या अनुभवातून Reports च्या माध्यमातून दाखवून दिले. आजच्या काळामध्ये अतिशय अवघड व गुंतागुंतीच्या समजल्या जाणाऱ्या स्त्री पुरुष वंध्यत्वाचे किती सखोल वर्णन, जे आजही आधुनिक शास्त्राच्या तपासण्यानुसार केलेल्या वर्णनाशी तंतोतंत लागू पडते, हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदात सांगून ठेवलेले स्त्री पुरुष वंध्यत्वावरील उपचार व त्या वर्णनानुसार जर आपण पेशंटचे योग्य निदान व आयुर्वेदिक शास्त्रीय पद्धतीने जर आपण याचे उपचार केले तर किती उत्तम परिणाम रुग्णांमध्ये पहावयास मिळतात हे त्यांनी अनेक रुग्णांच्या Testimonial Video मधून, उपचारापूर्वी व उपचारानंतर केलेल्या रिपोर्टच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवून दिले. पुरुष वंध्यत्वातील उत्तर बस्ती उपचार, विशिष्ट ठिकाणी केलेले विद्धकर्म, अग्निकर्म याविषयीचे अनेक व्हिडिओ त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दाखविले व या सर्व प्रोसिजर्स शास्त्रीय पद्धतीने, उत्तम प्रकारे शिकून घेऊन व न घाबरता करण्याचे आवाहन केले व वंध्यत्वासारख्या आधुनिक काळातील अत्यंत जटिल Social Stigma असलेल्या समस्येवर आयुर्वेदिक उपचार किती प्रभावी आहेत हे लोकांना दाखवून, हा सूर्य हा जयद्रथ या न्यायाप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणाने सर्व गोष्टी सिद्ध करून देऊन आयुर्वेद यशस्वीपणे जनमानसात पोहोचविण्याचे आवाहन केले
श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
अशुकारी ,जीर्णव्याधी व वंध्यत्व उपचार, पंचकर्म उपचार केंद्र, लेंडकर मळा बालिकाश्रम रोड अहिल्यानगर
डॉ. महेश मुळे व डॉ. सौ.अंशु मुळे
Mobile +91 9309039395