08/06/2021
मुलांना कोविड झाला?
*हे करा....*
१. धीराने परिस्थिती हाताळावी . कारण ९०% वेळा लहान मुलांना खूपच सौम्य स्वरूपाचा आजार असतो.
२. लहान मुलांना शक्यतो घरातच विलगीकरण अथवा आयसोलेशन मध्ये ठेवावे.
३. नेहमीच्या कुटुंबीयांसमवेत ठेवावे.
४. भरपूर पाणी पाजणे, लघवीचे प्रमाण ,श्वासाचा दर , ऑक्सिजनचे प्रमाण याचा चार्ट ठेवावा.
५. तान्ह्या बाळाला स्तनपान चालूच ठेवले पाहिजे, आई निगेटिव्ह असली तरीही.
६. बाळाच्या खेळण्याकडे तसेच नेहमीच्या ऍक्टिव्हिटी कडे लक्ष ठेवणे.
खेळणारे बाळ खूपच दिलासादायक असते.
६.पाच वर्षे वरील मुलांना मास्क निश्चित वापरावा दोन ते पाच वर्षांमधील मुलांना ते ठेवत असतील तर पालकांच्या निरीक्षणाखाली मास्क वापरावा.
७. ताप येत असल्यास फक्त पॅरासिटॅमॉल हे औषध 15 मिलीग्राम दर किलोग्रॅम या प्रमाणातच द्यावे इतर औषध शक्यतो देऊ नये.
८. बाळाची आधीची कुठल्याही जुन्या आजाराची औषध चालू ठेवावी.
९. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार, पुरेसे पाणी, पुरेशी झोप व शारीरिक व्यायाम हे महत्त्वाचे आहेत.
प्राणायाम, सूर्यनमस्कार, सुरक्षित गच्चीत धावा थावी , जिने चढ उतर असे विविध व्यायाम प्रतिकार शक्ती वाढवण्यास निश्चित मदत करतील.
१०. बाळ पडून राहत असल्यास श्वासाचा दर जास्त असल्यास अथवा ऑक्सिजनचे प्रमाण सतत पाच-दहा मिनिटं पेक्षा जास्त 94 च्या खाली राहत असल्यास आपल्या बाल रोग तज्ञ यांचा सल्ला घ्या अथवा जवळच्या कोवीड बालरुग्ण रुग्ण विभागात संपर्क साधा अथवा बाळाला तेथे ऍडमिट करा.
*हे करू नका...*
१. मुलांना तापाचे पॅरासिटॅमॉल व्यतिरिक्त कुठलेही औषध देऊ नये.
२. मुलांना वाफ देण्याचा अट्टाहास करू नये त्यातून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.
३. दोन वर्षाखालील मुलांना मास्क वापरण्याचा अट्टाहास करू नये.
४. मुलांना आजी-आजोबांच्या संपर्कात येऊ देऊ नये.
५. घरातील इतर मुलं जरी rt-pcr निगेटिव्ह असली तरीही त्यांना नातेवाईकांकडे पाठवू नये.
६. फळे व खाद्यपदार्थ वर्जित करू नयेत.
७. घरगुती औषधे , काढा याचा भडीमार करू नये.
८. अफवांना बळी पडू नका.
९. प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या बाजारु औषधांवर विश्वास ठेवू नका.
१०. व्हाट्सअप वरील आरोग्य विषयक माहिती आपल्या डॉक्टरांकडून पडताळून घ्या.