25/07/2024
https://youtu.be/Vh6Sa7lXTTs?si=1zmgqHVP6elvZEdR
*AMOGS संघटना व AMOGS जनजागृती समिती* यांच्या विद्यमाने
*AMOGS मी मनस्वी मोहीम*
आज 25 जुलै जागतिक आय व्ही एफ दिवस या निमित्ताने *AMOGS मी मनस्वी* या मोहिमेची सुरुवात करत आहोत.
बदललेली जीवनशैली, प्रदूषण, प्लास्टिकचा अतिवापर या सर्वांमुळे वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांचे प्रमाण कमी होत आहे. योग्य वेळेमध्ये त्याचे निदान करून स्त्रियांना स्वतःच्या फर्टिलिटी पोटेन्शिअल ची जाणीव करून देणे तसेच त्यांच्यासाठी गर्भधारणेचे योग्य वय काय असू शकते व गर्भधारणा काही काळाने करावयाची असल्यास काय पर्याय असू शकतात याविषयीचे योग्य आणि सखोल मार्गदर्शन करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात करत आहोत.
21 व्या शतकातील स्त्री तिच्या इच्छेने या सर्व गोष्टी ठरवू शकते. म्हणून या मोहिमेचे नाव *मी मनस्वी*!!
या मोहिमेमध्ये सामान्य माणसांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचे काम होईलच पण त्याचबरोबर स्त्रीरोग तज्ञ तसेच इतर डॉक्टर यांच्यासाठीही कार्यशाळेचे आयोजन केले जाईल.
आपले,
*डॉ किरण कुर्तकोटी* ,
अध्यक्ष, AMOGS
*डॉ बिपीन पंडित*
सचिव, AMOGS
*डॉ निलेश बलकवडे*
उपसचिव, AMOGS
संयोजक, मी मनस्वी मोहीम
*डॉ रेवती राणे*
अध्यक्ष, AMOGS जनजागृती समिती
*AMOGS संघटना व AMOGS जनजागृती समिती* यांच्या विद्यमाने *AMOGS मी मनस्वी मोहीम*आज 25 जुलै जागतिक आय व्ही एफ दिवस या निमित्ताने *AM...