D.N.S Dental Clinic and Orthodontic Care Centre

D.N.S Dental Clinic and Orthodontic Care Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from D.N.S Dental Clinic and Orthodontic Care Centre, Doctor, D. N. S plaza. Near Shah Dharsi Gas Agency. Bypass Road, Akluj.

02/01/2019

DNS Dental and Orthodontic Care Centre wishes you all a Happy Healthy and a Prosperous new year 2019

24/12/2018

दातांची कीड, उपाय आणि उपचार : थेट दंतवैद्यांच्या शब्दात !!

आजकाल "दोन रूपयांत दातांमधली कीड घालवा"सारखे लेख फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर फिरू लागले आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी असे सगळ्यांनाच वाटतं. पण होतं काय, हे फॉर्वर्ड्समधून आलेले उपाय खरेच असतात की नाही याबद्दल जबरदस्त शंका असते.

अर्थातच, दंतविकार टाळण्यासाठी आपण काय घरगुती काळजी घेऊ शकतो याबद्दलचे पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही प्रश्नोत्तरे मांडण्यात आली आहेत. मात्र गंभीर आजार किंवा विशेष मुलांच्या आजारांच्या बाबतीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. इथं दिलेली उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दाताच्या आजारांबद्दल आहेत.

प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय ?
स्रोत
Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात. ते असो. त्या हातचलाखीबद्दल पुन्हा कधीतरी...
तोंडात असलेले जीवाणू दातावर साठून राहिलेल्या अन्नकणांमधल्या साखरेवर प्रक्रिया करून ऍसिड तयार करतात आणि या ऍसिडमुळे दाताच्या पृष्ठभागावरचे आवरण विरघळायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते. या आवरणाला पडलेल्या छिद्रामध्ये अजून अन्नकण अडकतात, अधिकाधिक जीवाणू ऍसिड हल्ला सुरू ठेवतात, छिद्र वाढत राहते, दाताचा पृष्ठभाग पोखरला जातो आणि मग दाताला मोठा खड्डा पडतो. यालाच आपण कॅव्हिटी म्हणतो. ही दाताची कॅव्हिटी आकाराने लहान असतानाच ती डेन्टिस्टकडून भरून घेणे उत्तम. दाताला एकदा छिद्र पडले की ते (जखम भरल्याप्रमाणे) आपोआप भरून येऊ शकत नाही. कारण दाताला त्वचेप्रमाणे पुनरुत्पादन क्षमता नाही हे लक्षात घेतले पाहिजे. पण जेव्हा वेदना नसते, त्याकडे सामान्यत: दुर्लक्ष केले जाते हे वैश्विक कटूसत्य आहे.
दातावरचं आवरण पोखरून जीवाणू डेन्टीन नावाच्या दाताच्या दुसर्‍या थरात प्रवेश करतात. इथे क्वचित वेदना सुरू होते, गोड खाताना थोडा काळ वेदना होते, पण लगेचच थांबते. दातांमध्ये चांदी किंवा कॉम्पोझिट भरण्याची ही योग्य वेळ आहे. पण यापुढेही थांबल्यास जीवाणू दाताच्या नसेत शिरतात ( pulp exposure) आणि असह्य वेदना सुरू होतात.

प्रश्न 2 : कीड लागणे टाळण्यासाठी काय करावे?
हे समजून घेण्याआधी कीड कशी पसरते हे आधी समजून घ्यावं लागेल.

कीड लागण्यासाठी १. जीवाणू २. दाताचा पृष्ठभाग ३. अन्नातली साखर ४. प्रक्रियेसाठी लागणारा वेळ या चार गोष्टी आवश्यक आहेत. यातली एकही गोष्ट नसेल तर कीड लागणार नाही.
याचा अर्थ कीड टाळण्यासाठी या चार घटकांपैकी जमेल त्या एखाद्या किंवा सार्‍या घटकांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१.आपण तोंडातले जीवाणू संपवू शकत नाही. कारण निरोगी तोंडातही जीवाणू असतात. ज्यांना Normal oral microflora म्हटलं जातं.
२.आपण दातांचा पृष्ठभाग / इनॅमल(आवरण) फ़्लुराईड पेस्टच्या वापराने थोडासा बळकट करू शकतो, ज्यायोगे त्याला सहज कीड लागणार नाही किंवा कीड लागायच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ही प्रक्रिया उलटवता येईल. अर्थातच दुखर्‍या दाताच्या मोठ्या छिद्राला फ़्लुराईडचा उपयोग होणार नाही.
३.अन्नातली साखर / पिष्टमय पदार्थ : यावर नियंत्रण आणणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. दातांच्या पृष्ठभागावर अडकून राहू शकतील असे गोड पदार्थ कमी खाणे, उदा. चॉकलेट्स आणि चिकट मिठाई टाळणे, दोन जेवणांमधले स्नॅकिंग किंवा सतत गोड पदार्थ चरत राहणे टाळणे आणि तंतुमय पदार्थ ( कच्च्या भाज्या, फ़ळे) खाणे महत्त्वाचे.
४. प्रक्रियेचा वेळ : क्वचितच गोड पदार्थ खाल्ले तर लगेचच ब्रशचा वापर करून चिकट अन्नपदार्थ चुळा भरून दातावरून काढून टाकणे. आता हे लगेच म्हणजे किती लगेच? तर लहान मुलाच्या एका हातात चॉकलेट असेल तर दुसर्‍या हातात ब्रश हवा. चॉकलेट संपले की ब्रशिंग सुरू झाले पाहिजे तरच कीड टाळता येईल. अशा प्रकारे आपण चौथ्या घटकावर नियंत्रण आणू शकतो.

लहान मुलांमधील कीड टाळण्याचे उपाय :
१. आहारावरती नियंत्रण : बाळांना बाटलीने दूध शक्यतो देऊ नये, विशेषत: झोपताना गोड दूध रात्रभर वरच्या दातांवरती साठून राहते आणि “ नर्सिंग केरीज” उद्भवतात.
बाटली द्यायचीच असेल तर झोपताना बिनसाखरेच्या पाण्याची बाटली द्यावी. गोड कमी, थेट साखर नको,चॉकलेटे मिठाया, स्नॅकिंग बंद. तंतुमय पदार्थ , कच्च्या भाज्या फ़ळे उत्तम.
२. होम केअर : रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी ब्रशिंगची सवय मुलांना लावणे आणि मुलांसमोर स्वत: रोज रात्री दात ब्रश करण्याचा आदर्श घालून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. लहान बाळांसाठी बेबी ब्रश वापरावा, किंवा मूल एक वर्षाचे होईपर्यंत झोपण्यापूर्वी स्वच्छ ओल्या रुमालाने उगवणारे दात पुसून काढावेत. मुले किमान पाच वर्षांची होईपर्यंत पालकांनी स्वत: त्यांचे दात ब्रश करून द्यावेत. या निमित्ताने दातांची तपासणी पालकांना करता येते आणि दातांवरचे काळे डाग, खड्डे, फ़टी या दात दुखायला सुरू होण्यापूर्वीच शोधता येतात. थोड्या मोठ्या मुलांसाठी त्यांना फ़्लॉसिंग शिकवणे आणि फ़्लॉसिंगची सवय लावणे दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
३. दंतवैद्याकडच्या भेटी : आधी लिहिल्याप्रमाणे दाताची कीड वेदना सुरू होण्यापूर्वी ओळखून फ़िलिंग करणे आणि होम केअर शिकून घेण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी नियमित दंतवैद्याच्या भेटी घेतल्यास उत्तम. (पण अर्थात आपल्याकडे ती संस्कृती यायला वेळ आहे). दातांची ताकद वाढवायला दाढांवर फ़्लुराईड लावायची ट्रीटमेन्ट लहान मुलांच्यात केली जाते. किंवा कीड लागण्यापूर्वीच पक्क्या दाढांमध्ये रेझिन सीलंट लावले जाते, ज्यामुळे दातांत अन्नकण अडकत नाहीत आणि कीड लागत नाही.

प्रश्न ३: सीलंट आणि फ्लुराईड ट्रीटमेन्ट म्हणजे काय ?
बरेचदा डेन्टिस्ट लहान मुलांच्या पक्क्या दाढांमध्ये सीलंट्स भरायला सांगतात. सीलंट्स लावणे ही एक दात किडणे टाळण्यासाठी डेन्टिस्टकडे केली जाणारी उपचार पद्धती आहे. दाढांचा चावण्याचा पृष्ठभाग सपाट नसतो तर तो उंचसखल असतो , ज्यावर खोलगट रेघा असतात. या रेघांना Pits and fissures म्हटलं जातं.

या खोलगट रेघांमध्येच अन्न अडकते आणि कीड लागायची प्रक्रिया सुरू होते. दात किडण्यापूर्वीच या खोलगट रेघा एका रेझिन मटेरियलने भरल्या, तर अन्न अडकणार नाही आणि कीड लागणे टाळता येईल या उद्देशाने लहान मुलांच्या पक्क्या दाढा उगवतानाच ( म्हणजे सुमारे सहा ते सात वर्षे वयाला) या दाढा सीलंटने भरून घ्याव्यात.


प्रश्न ४ फ़्लुराईड ट्रीटमेन्ट म्हणजे काय?
लहान मुलांच्या दाताच्या इनॅमलची ताकद वाढवण्यासाठी फ़्लुराईड वापरले जाते. साधारणपणे लहान मुलांची दाताची सर्व फ़िलिन्ग्ज करून झाल्यानंतर फ़्लुराईड ट्रीटमेन्ट केली जाते. फ़्लुराईड जेल, फ़ोम किंवा वॉर्निश या माध्यमात उपलब्ध असते. डेन्टिस्ट छोट्याशा ट्रेमध्ये फ़्लुराईड मटेरियल लावून मुलांच्या दातावर मिनिटभरासाठी लावून ठेवतात. हे फ़्लुराईड इनॅमलमध्ये पोचण्यासाठी त्यानंतर काही काळ ब्रश करू नये असे सांगितले जाते.
काही मुलांमध्ये कीड लागण्याचे प्रमाण जास्त असल्यास दर सहा महिन्यांनी फ़्लुराईड लावण्याचा सल्ला दिला जातो

प्रश्न ५- हल्लीच्या पिढीत कीड जास्त का दिसते? गेल्या पिढीशी तुलना करता हल्लीच्या मुलांचे दात जास्त किडतात, हे खरे आहे का? खरे असल्यास का?
दाताला कीड का लागते हे या लेखात वरती लिहिले आहे. हल्लीच्या मुलांच्या दाताला कीड लागण्याचे महत्त्वाचे कारण या पिढीचा बदलता आहार आणि दात साफ़ करायच्या (नसलेल्या) सवयी हे आहे.
हा प्रश्न दवाखान्यामध्ये साधारणपणे लहान मुलांच्या आजोबा- आज्जींकडून विचारला जातो. त्यांचा बोलण्याचा रोख साधारणपणे असा असतो की --- “आम्ही आणि आमची भावंडे यांना कधी लहानपणी दातांची दुखणी झाली नाहीत. आम्हीही दोन तीन लहान मुले वाढवली, त्यांना कधी त्रास झाला नाही आणि या एवढुशा पाच वर्षांच्या पोराला तुम्ही तीन तीन रूट कॅनाल ट्रीटमेन्ट करायला सांगताय..”
आजोबांचं म्हणणं बरोबर असतं. मी ते मान्यच करतो. मग त्यांना सांगतो , “एवढुशा मुलाला मग का बरं इतक्या कॅविटीज झाल्या असतील? त्याची कारणं तर शोधूयात. हा मुलगा रोज काय काय जेवतो? आणि दोन जेवणांमध्ये काय काय खातो? “ मग पुष्कळ उत्तरे मिळतात. ९५ % शहरी मुलांमध्ये चॉकलेट्स, अनेक प्रकारचे केक्स आणि पेस्ट्रीज, बिस्किट्स, वेफ़र्स आणि त्याचे विविध प्रकार, बर्गर्स अणि कोला आणि एकूणच जोरदार जंक फ़ूड असते. “हा मुलगा जेवतच नाही, मग तो वेफ़र्सच खातो, टीवी बघत एका बैठकीत कुरकुरेचं पाकीट संपवतो, रोज कोल्डड्रिन्क पितो, झोपताना त्याला चॉकलेट खूप आवडतं “वगैरे.
मग मी विचारतो, तुम्ही यातलं काय काय खात होता? अर्थातच उत्तर येतं, “ आमच्या वेळी असलं काही नव्हतं आणि असलंच तर कधी आमच्यापर्यंत आलंच नाही .. आम्ही कच्च्या भाज्या ( काकडी, गाजर, बीट इ.इ.) आणि कधी कधी फ़ळं खायचो ” ... मग मी त्यांना सांगतो की तंतुमय पदार्थ, कच्च्या भाज्या आणि फ़ळे आहार म्हणून शरीराच्या वाढीसाठी चांगली असतातच, शिवाय दातांच्या आरोग्यासाठीही उत्तम असतात. त्यामुळे हेच अन्न तुमच्या नातवाने खाणे महत्त्वाचे आहे. आणि ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनाच करायचे आहे. कोणताही डॉक्टर त्याला रोज खायला घालणार नाहीये. आता हे जंक फ़ूड शून्यावर आणणे अगदी आदर्श असले, तरी प्रत्यक्षात शक्य होईलच असे नाही. मात्र क्वचित एखादे चॉकलेट मुलाने खाल्लेच तर लगेच ब्रश करून दात आणि दाढा स्वच्छ करायला हव्यात.
आहार खूप उत्तम आणि योग्य असला आणि शिस्तशीर ब्रशिंगच्या सवयी नसल्या तर कदाचित तुम्ही कीड लागण्यापासून स्वत:ला वाचवू शकालही. पण आहारही वाईट ( कचरान्न शब्द कसा वाटतो?) आणि ब्रशिंगच्या योग्य सवयीही नाहीत, तर मग मात्र तुम्ही त्या मुलाच्या चार पाच वर्षाच्या वयामध्ये किडलेल्या दाढा घेऊन डेन्टिस्टाच्या वार्‍या करायची तयारी ठेवली पाहिजे. या सार्‍याचा अर्थ इतकाच की आहार आणि ब्रशिंगच्या चांगल्या सवयी महत्त्वाच्या. पिढीचा यात काहीही संबंध नाही.

प्रश्न ६: दाताची कीड अनुवांशिक असते का?
याचे उत्तर ”दातांची कीड अनुवांशिक नाही” असे आहे. पण कीड लागण्याची कारणे वाढवणार्‍या सवयी मात्र कुटुंबात सर्वांना सारख्या असतात. भरपूर गोड खाणे, दोन जेवणांच्या मधल्या वेळात चॉकलेट्स, बिस्किट्स असे गोड चरत राहणे, रात्री झोपताना दात ब्रश न करता आईस्क्रीम / कोल्डड्रिंक पिऊन झोपणे अशा आहाराच्या वाईट सवयी आणि रात्री ब्रशिंग आणि फ़्लॉसिंग न करायच्या वाईट सवयी या एका कुटुंबात सर्वांनाच असतात. त्यामुळे समजून उमजून या सवयींमध्ये जाणीवपूर्वक बदल करेपर्यंत दातांची कीड लागण्याच्या सवयी पुढच्या पिढीतही दिसत राहतात

24/12/2018

दात किडला की त्यात सिमेंट नाहीतर चांदी भरून घ्यायची किंवा ‘रूट कॅनाल’ करायचे आपल्याला माहीत असते. पण दातांवरच्या या उपचारांमध्ये गेल्या काही वर्षांत बरीच सुधारणा झाली आहे.

दात किडला की त्यात सिमेंट नाहीतर चांदी भरून घ्यायची किंवा ‘रूट कॅनाल’ करायचे आपल्याला माहीत असते. पण दातांवरच्या या उपचारांमध्ये गेल्या काही वर्षांत बरीच सुधारणा झाली आहे. किडलेला दात वाचवण्यासाठीचे उपचार कसे आधुनिक होत गेले हे पाहूया-

पूर्वी आणि आता

दात किडण्याच्या अवस्था

अवस्था क्र. १. या अवस्थेत कीड ही दाताच्या ‘इनॅमल’ या सर्वात बाह्य़ आवरणापुरतीच मर्यादित असते. अशा वेळी किडलेल्या दातात किंवा दाढेत छोटासा खड्डा म्हणजे ‘कॅव्हिटी’ तयार होते आणि त्यात अन्न अडकत राहते; पण वेदना होत नाहीत. दात किंवा दाढा दुखत नसल्यामुळे या प्राथमिक अवस्थेत रुग्ण दातांचा इलाजही करून घेत नाहीत.

अवस्था क्र. २. यात कीड दातांच्या पुढच्या थरापर्यंत म्हणजे ‘डेंटिन’पर्यंत पोहोचते. या वेळी कॅव्हिटी मोठी झालेली असते. क्वचित दात किंवा दाढ दुखतेही. पण रुग्ण दातात अडकलेले अन्नाचे कण विविध प्रकाराने काढून टाकतात, त्या बाजूने खाण्याचे टाळतात. किडलेल्या दाताचा इलाज करणे या अवस्थेतही टाळलेच जाते.

अवस्था क्र. ३. या अवस्थेत कीड दाताच्या सर्वात आतल्या थरापर्यंत म्हणजे ‘पल्प’पर्यंत किंवा नसेपर्यत पोहोचते. दातातली कॅव्हिटी खूप मोठी झालेली असते. दात ठणकत असतो. रुग्णांना वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात आणि दातांच्या दवाखान्यात धाव घेण्याची वेळ येते.

अवस्था क्र. ४ आता मात्र कीड दाताच्या पल्पमधून मुळांपर्यंत पसरते. दाताच्या मुळाच्या टोकाशी जंतुसंसर्ग होऊन तिथे गळू होते. चेहऱ्याला सूज येते; क्वचित तापही येतो. दाताला असह्य़ ठणका लागतो. पूर्वी अशा अवस्थेतली दाढ किंवा दात काढण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता.

पूर्वीचे आणि आताचे उपचार

दात किंवा दाढ किडण्याची अवस्था दाताचा एक्स-रे काढून कळते. अवस्था कोणती यावरून उपचार काय करायचा हे दातांचे डॉक्टर ठरवतात. किडलेल्या दातांवरील पूर्वीचे उपचार आणि त्या उपचारांच्या अत्याधुनिक आवृत्या पाहूया-

१) दातात भरली जाणारी चांदी

किडलेल्या दाढांच्या उपचारांमध्ये पूर्वी दाढेत झिंक ऑक्साईड आणि लवंगाचा अर्क असलेले सिमेंट भरून नंतर त्यात चांदी भरत असत. पण चांदी भरण्याच्या या इलाजाला काही ठळक मर्यादा होत्या. उदा. दाढ किडण्याच्या पहिल्या दोन अवस्थांपर्यंतच चांदी भरण्याचा उपचार यशस्वीपणे करता येई. चांदीचे फिलिंग काळपट दिसत असल्यामुळे दर्शनी भागातल्या किडलेल्या दातांमध्ये चांदी भरता येत नसे. भरलेली चांदीचे फिलिंग दाढेला चिकटून बसत नाही. त्यामुळे दाढेतला खड्डा फारच मोठा असेल तर त्यात केलेले चांदीचे फिलिंग तुटते आणि दीर्घकाळ टिकत नाही. शिवाय चांदीचे फिलिंग करताना त्यात अगदी अल्प प्रमाणात पाऱ्याचा समावेश असतो. पाऱ्याच्या दुष्परिणामांच्या म्हणजे ‘मक्र्युरी पॉयझनिंग’च्या तथाकथित भीतीमुळेही दातात चांदी भरणे अनेक देशांत बंद होऊ लागले आहे. (असे असले तरी जगातील बहुसंख्य दंततज्ज्ञ मक्र्युरी पॉयझनिंग खूपच नगण्य असून त्याचे दुष्परिणाम होत नसल्याचेच मानतात.)

आधुनिक पद्धतीने दातांचे ‘फिलिंग’-

दातात चांदी भरण्याच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर त्या जागी एखादे नवीन ‘फिलिंग मटेरियल’ येण्याची गरज जाणवू लागली. ही गरज ‘ग्लास आयनोमर’ आणि ‘कंपोझिट रेझिन’ या दोन फिलिंग मटेरियल्सच्या शोधामुळे पूर्ण झाली. चावण्याच्या बाबतीत या दोन मटेरियल्सची क्षमता जवळपास चांदीच्या फिलिंगच्या क्षमतेइतकीच असते. शिवाय हे पदार्थ तंतोतंत दाताच्या रंगासारखे दिसतात. त्यामुळे अल्पावधीतच या नवीन फिलिंग मटेरियल्सनी चांदीच्या फिलिंगची जागा घेतली. दातांसारखाच रंग असल्यामुळे दर्शनी भागातील दातांमध्येही ही मटेरियल्स भरता येतात, फिलिंग केले आहे हे कळतही नाही. ही मटेरियल्स दाताला किंवा दाढेला चिकटून बसतात. या गुणधर्मामुळे किडलेला दात कमीत कमी कोरावा लागतो आणि केलेले फिलिंग अधिक काळ टिकतेही. पुढच्या दातांमधील फटी बुजवणे, सदोष आकार असलेल्या किंवा तुटलेल्या दातांचा आकार पूर्ववत करणे, दातावरचे डाग घालवणे, दातांसाठी तात्पुरत्या ‘कॅप’ बनवणे अशा विविध कारणांसाठीही ग्लास आयनोमर आणि कंपोझिट रेझिन ही फिलिंग्ज वापरतात.

२) ‘रूट कॅनाल’ उपचार

दोन दशकांपूर्वीपर्यंत दात किडण्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत केवळ दात काढण्याचाच उपाय उपलब्ध होता. मात्र नंतर ‘रूट कॅनाल’ उपचारांद्वारे असा दात किंवा दाढ वाचवता येऊ लागला. दाताचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे दाताचा ‘पल्प’ किंवा रक्तपेशी आणि नसा असलेला मऊ गाभा. जेव्हा या प्लपपर्यंत किंवा नसेपर्यंत कीड पोहोचते तेव्हा तिथे जंतूसंसर्ग होऊन दाताच्या मुळाशी गळू होते आणि असह्य़ ठणका लागतो. अशा वेळी जंतूसंसर्ग झालेली नस किंवा पल्प काढून टाकतात आणि तिथे ‘गटा-पर्चा’ नावाच्या एका मटेरियलचे फिलिंग केले जाते. या उपचाराने जंतूसंसर्ग कमी होऊन ठणका थांबतो आणि दात खूप किडलेला असूनही वाचतो. यालाच ‘रूट कॅनाल’ असे म्हणतात. आजकाल रुट कॅनालसाठी ‘प्रोटेपर’ नावाचे एक आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे रुट कॅनाल उपचार खूप यशस्वीपणे करता येतात.

कुचके झालेले दात वाचवण्यासाठी

खूप किडून कुचके झालेले, तुटलेले दात आणि दाढा वाचवण्यासाठी आता आणखी एका मटेरियलचा शोध लागला आहे. या मटेरियलचे नाव आहे ‘फायबर पोस्ट’. हे मटेरियल खूप कठीण आणि भक्कम- एखाद्या काडीसारखे किंवा खिळ्यासदृश असते. रूट कॅनाल केलेल्या दाताच्या रुट कॅनालमध्ये हे मटेरियल खोचले किंवा रोवले जाते. या फायबर पोस्टचा एक भाग दाताच्या मुळात जातो, तर उर्वरित भाग दाताच्या कुचक्या आणि तुटलेल्या भागात जातो. अशा प्रकारे हे मटेरियल भिंतीत खोचलेल्या खुंटीसारखे तुटलेल्या दाताला आधार देते. नंतर या फायबर पोस्टवर कंपोझिट रेझिन मटेरियलचे ‘बिल्डअप फिलिंग’ करतात व त्यावरून दातावर ‘कॅप’ बसवतात. अशा रितीने प्रचंड किडलेला, कुचका दातही वाचतो. मात्र हे फायबर पोस्ट लावण्याचे काम तितकेच कौशल्याचे आहे.

11/12/2018

Periodontal flap surgery for advanced periodontitis...

Silver filling vs. Composite filling
11/12/2018

Silver filling vs. Composite filling

10/12/2018
Bleaching treatment. Brighter teeth are just an appointment away.
10/12/2018

Bleaching treatment. Brighter teeth are just an appointment away.

Address

D. N. S Plaza. Near Shah Dharsi Gas Agency. Bypass Road
Akluj
413101

Telephone

+91 90212 61270

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when D.N.S Dental Clinic and Orthodontic Care Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category