04/12/2025
आध्यात्मावरची आस्था विश्वकल्याणरूपी असावी !
आपल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आणि त्यांच्याशी निगडित साहित्यात खरे तर यावर हजारो कोटी खर्च व्हायला हवा परंतु काही कालखंडानंतर येणाऱ्या कुंभ मेळ्यांवर हजारो कोटी खर्च करणार ज्यातून खरच काय निष्पन्न होत हे खरच कुणीही जबाबदारीने सांगू शकत नाही, कुंभ स्नानामध्ये जर कोटींच्या संखेमध्ये लोकांची आवक होते तर मुठभर दगड-माती जरी लोकांनी नेली तर पात्र स्वच्छ आणि मोठं होईल परंतु याउलट तिथे ढीगभर खचरा, विष्ठा टाकून त्याच नदीच्या पवित्र पात्राला अशुद्ध , घान करुन आपण आपले पावित्र्य जपण्याचा आंधळा प्रयत्न करतोय, सोबतच शासन- प्रशासन हजारो वृक्षांची कत्तल देखील करणार यातून फक्त निसर्गाची हानी होणार पर्यायाने माणसाचीच.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।।
संत तुकाराम महाराज म्हणतात जंगलातील झाड , पशु-पक्षी हे माझे नातलग आहेत , आणि ती देखील आपल्या स्वरात देवाचे नामस्मरण करतात. वृक्षतोड करुन कुठलाही संत निसर्गाची हानी इच्छीत नाही मग नाशिक सारख्या ठिकाणी कुंभस्नानाच्या नावावार हजारो वृक्ष तोडीचा अट्टहास कशाला ? दरवर्षी पंढरपूरच्या चंद्रभागेतील स्नान असो की अनेक वर्षातून येणारे नाशिकच्या गोदावरीतील कुभं स्नान इथे तुमच्या पावित्र्यच सोडा नदीच पर्यायाने निसर्गाचे पावित्र्य मात्र घालवतोय येवढं मात्र नक्की , खरच जर आध्यात्म , संस्कृती ,धर्म याची येवढीच ओढ आणि आस्ता आहे तर यातून सकारात्मक आणि जगाला हेवा वाटेल असं काहीतरी घडायला हवे जसं की त्या नदीचे पात्र या कोटी लोकांच्या येण्यामुळे स्वच्छ झाले , तिथली झाडे कापली नाही तर कोटी झाडे येता-जाता लाउन गेलीत , मग बघा पंढरपूर असो की नाशिक प्रत्तेक शहरातील नागरिक अश्या उत्सवांची आतुरतेने वाट बघतील नव्हे मागणी करतील की असा आध्यात्मिक उत्सव किंवा कुंभ मेळा आमच्या शहरात, नदीत एकदा तरी व्हावा ! -डॉ.संदिप चव्हाण