26/09/2025
Lycopodium Lady – एका अंतःसंघर्षांनी भरलेल्या, आत्मसन्मानशील, पण भीतीने आणि शंका-आशंकांनी व्यापलेल्या आधुनिक स्त्रीचे चित्रती दिसायला नाजूक, किंचित कृश.
चेहऱ्यावर उच्च कपाळ, विचारमग्न नजर, ओठावर हलकी चिंता.
चालताना आपल्या खांद्यावर किंचित झुकलेपण, जणू काही जगाच्या अपेक्षा तिच्या खांद्यावर पडल्या आहेत.
घराच्या आणि नात्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली ही बाई बाहेरून शिस्तबद्ध, नीटनेटकी, सोज्वळ. स्वःच्या व्यक्तिमत्वात मात्र भीती, न्यूनगंड, आणि असुरक्षिततेचे सावट असते.
ती समाजात, कुटुंबात “योग्य” दिसण्यासाठी आपली मतं, इच्छा दडपते. तिच्या वर्तणुकीत एक बाजू समजूतदार, नम्र, पण दुसरी बाजू कधी हळूच आक्रमक – पण हे आक्रमकपण तिला स्वतःलाच अपराधी ठरतं.ती घर, ऑफिस, नाती, सगळीकडे “सर्वतोपरी” असण्याचा आटोकाट झटते – पण मनाच्या आत ती सतत अस्वस्थ, आपल्या क्षमतेवर, निर्णयावर शंका घेणारी. “लोक काय म्हणतील?” हा विचार तिला सतत अस्वस्थ ठेवतो.
आपल्या कमकुवत पचनसंस्थेमुळे, वारंवार घशात कडवटपणा, पोटात वायू, अपचन – अशा तक्रारींनी ती त्रस्त असते.
ती दिसते जरी शांत, पण –:सतत मनात शंका, असुरक्षिततेची भावना, भीती आणि न्यूनगंडाने जोडलेली असते.
केव्हा कधी स्वतःवरचा विश्वास डगमगतो, तरीही ती परिस्थितीला सामोरी जाते – पण मनाच्या आत असते भीती, “मी अपयशी तर ठरणार नाही ना?”.
भावनिक अवस्थेत:
ती खूप वेळा राग अनावर होतो – पण लगेच अपराधीपणाची भावना येते. नात्यांमध्ये, ऑफिसमध्ये ती सतत संयम राखते, पण आतून कधी कधी भग्न, खचलेली असते.शारीरिक पातळीवर:
पचनसंस्था कमकुवत, वारंवार अपचन, गॅसेस, पोट फुगणे, सतत अशक्तपणा. चेहऱ्यावर काळजीची रेषा.
ती म्हणते –
“दिसायला मी शांत आहे. पण माझ्यात सतत असुरक्षितता, न्यूनगंड, न्यूनता – याचं मळभ आहे. लोकांसाठी मी योग्य दिसते, पण स्वतःला शोधताना उध्वस्त होते. मी शोधतेय माझ्यातली खरी शक्ती…!”
डॉ.AN