10/09/2025
मूळव्याध , फिशर , फिस्चुला आणि उपचार
मूळव्याध म्हणजे नेमके काय ?
मूळव्याधामध्ये गुदद्वारा (A**s) बाहेरील (External) आणि आतील (internal) मांसपेशी द्वारा (Sphincter) मल विसर्जनावर नियंत्रण ठेवीत असतो.
त्यायोगे आपण अनुकूल परिस्थिती नसल्यास शौचाची प्रक्रिया रोखून धरू शकतो.
सकाळी जेव्हा शौचाची भावना होते तेव्हा डावीकडचे मोठे आतडे आकुंचन पावून मल पुढे ढकलण्यास संदेश देते.
ही प्रक्रिया नीटपणे पार न पडल्यास जोर करावा लागतो. वारंवार जोर लाऊन शौच केल्याने गुद्वारात चिरा ( a**l fissure )पडून शौच करतेवेळी आग होणे, खूप दुखणे व कधी कधी रक्त पडणे असे त्रास होऊ शकतात.
मल कडक असल्यास जखम होणे किंवा फार काळ अंगावर काढल्यास चुंबळ बाहेर येणे ( Re**al Prolapse ) असा त्रास होतो.
या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यात अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो.
त्यामुळे तिखट, मसालेदार, खाण्यापिण्याच्या सवयी, अवेळी खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे पचन संस्थेची कमजोरी, गर्भारपण, नॉर्मल प्रसूतीनंतर याशिवाय मानसिक, कौटुंबिक ताणतणाव, अपुरी झोप इ मानसिक बाबीही अशा कारणीभूत ठरू शकतात. आजाराच्या लक्षणासोबतच आजाराच्या मूळ कारणावरही भर देत असल्यामुळे होमिओपॅथी उपचाराने या आजारावर कायमस्वरूपी उपाय शक्य आहे
हा आजार मध्यमवयीन गटासह हल्ली तरुण वर्गात विशेष करुन नाईट शिफ्ट, जागरण, बैठे काम, जंक फूड, आय.टी.,बी.पी.ओ.मध्ये काम करणाऱ्या मुलामुलींमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.
काही वेळेस जंतुसंसर्ग होऊन गुदद्वाराच्या बाजूला गळू ,( Abscess / Boil ) तयार होते. त्याचा शस्त्रक्रियेद्वारा योग्य पद्धतीने निचरा न केल्यास ते गुदद्वारामध्ये फुटते आणि ‘भगंदर’ ( fistula ) तयार होते. छोटी पुटकुळी येऊन ती फुटून त्यातून पू निघणे असा त्रास अंगावर काढल्यास जंतुसंसर्ग वरच्या दिशेने पसरून ‘हाय अनल फिस्तुला’ होऊ शकतो.
मूळव्याध ही आनुवंशिक असतो का?
आनुवंशिकतेबद्दल खात्रीपूर्वक सांगता येत नाही, परंतु एकाच कुटुंबातील काही लोकांना हा त्रास होत असल्यास जेवणा-खाण्याच्या सारख्या सवयी, जेवण्याच्या वेळेतील अनियमितता, व्यायामाचा अभाव, रात्री उशिरापर्यंत जागणे आदी सवयी विचारात घ्याव्या लागतात. भारतीयांमध्ये सकाळी उठून शौचास जाणे, खाली बसून मलविसर्जन करणे आदी चांगल्या सवयींमुळे मूळव्याधीचे प्रमाण पाश्चात्त्य देशांतील लोकांपेक्षा कमी आहे. हल्ली कमोडचा वापर आणि अनियमित जीवनशैली यामुळे आपल्याकडेही, विशेषत: तरुण वर्गात मूळव्याधीचे प्रमाण वाढते आहे.
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे किंवा दही, ताक याचा वापर करणे, रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे, जेवणानंतर शतपावली करणे, तिखट, मसालेदार, तळलेले चमचमीत पदार्थ टाळणे, रात्रीची झोप व्यवस्थित घेणे, जागरण टाळणे, सकाळी उठल्यावर नियमितपणे शौचास जाणे आदी उपायांची मदत होते.
डॉ प्रधान होमिओपॅथी येथे उपलब्ध विशेष उपचार
1) त्रास : जसे वेदना, खाज, रक्तस्त्राव, पस कमी करण्यासाठी प्रारंभिक उपचार
2) मूळव्याध / गुद्वारातील चिरा पूर्णपणे मुळासकट बरा करण्यासाठी
3) परत त्रास होऊ नये म्हणून कायमस्वरुपी उपचार
4) ऑपरेशन नंतर पण कालांतराने परत परत होणारे मूळव्याध, फिस्तुला, अब्सेस, न भरणारी जखम आणि सतत वाहणारा पस
यावर विशेष कायमस्वरुपी उपचार
आजार किती जुना आहे व लक्षणे किती गंभीर आहेत हे पाहता औषधांनी आराम पडण्यास लागणार वेळ कमी जास्त होऊ शकतो.
ऑपरेशन हा या आजारावरील एकमेव उपाय नक्कीच नाही. ऑपरेशननंतरही काही दिवसांनी परत त्रास होण्याची शक्यता असते.
होमिओपॅथी औषधांनी त्रास कमी झाल्यावर परत होण्याची शक्यता फार कमी असते.
होमिओपॅथी उपचारासोबतच जीवनशैलीमध्ये बदल व आहार नियोजन या दोन उपायांनी मूळव्याध , फिशर , फिस्चुला या आजारांवर मात करता येते.
अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.
संपर्क :
डॉ. पंकज प्रधान
डॉ. प्रधान होमिओपॅथी
दुसरा माळा, शाकंबरी सेंट्रो सोनवणे ऑर्थोपेडिक हॉस्पिटलजवळ श्रीकृष्ण ज्ञान मंदिराच्या बाजूला राम नगर अकोला
संपर्क : 9881447181