25/09/2025
*ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक शाळा, रिसोड येथे आरोग्यदायी गुरुवाराचे आयोजन.*
रिसोड - स्थानिक ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित आनंददायी गुरुवार या कार्यक्रमात रिसोड येथील प्रसिद्ध तज्ञ डॉ. राम बोडखे आणि दंतवैद्य डॉ. महेश खानझोडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य,सामाजिक आरोग्य तसेच दातांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर,श्री संदीप खानझोडे सर, पर्यवेक्षक तवर मॅडम आणि विज्ञान शिक्षिका अंजली सरनाईक मॅडम यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. डॉ राम बोडखे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात रोज सकाळी व संध्याकाळी स्वच्छता राखणे (दात, केस, नखे, अंघोळ ), संतुलित आहार घेणे - दूध,फळे, भाज्या, कडधान्ये खाण्याची सवय. जंक फूड, थंड पेय,जास्त गोड पदार्थ टाळणे. नियमित व्यायाम, खेळ, योगा व पुरेशी झोप घेणे. रोगप्रतिबंधक लसीकरणाचे महत्व. अभ्यासाबरोबर छंद जोपासणे. ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, छंदात वेळ घालवणे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार करणे. अभ्यासात अडचणी आल्या तरी निराश न होता शिक्षक, पालकांशी बोलणे. शाळेत व घरात स्वच्छतेची काळजी घेणे. मोबाईल /टीव्हीचा अतिवापर टाळणे. मित्रांशी प्रेमाने वागणे, भांडण न करणे, परस्पर सहकार्याची सवय लावणे. यासंदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ महेश खानझोडे सर आणि दात स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी व रात्री दोनदा दात घासण्याची गरज, फ्लोराईड युक्त टूथपेस्ट चा वापर, जेवल्यानंतर तोंड स्वच्छ धुण्याची सवय याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. जास्त गोड पदार्थ व थंड पेय टाळण्याची सूचना त्यांनी केली. तसेच दुधाचे दात व कायमचे दात यातील फरक, दात किडू नयेत यासाठी घ्यायची काळजी, चुकीच्या सवयी (पेन्सिल, नख चावणे )यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. विदयार्थ्यांनी आरोग्यसंदर्भात प्रश्न विचारून आपली शंका निरसन करून घेतली. अश्या उपक्रमामुळे शालेय स्तरावर आरोग्यविषयीं जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे मत आदरणीय श्री संदीप खानझोडे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आदरणीय सरनाईक मॅडम यांनी तर आभार आदरणीय भुतेकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. आखाडे सर, श्री राठोड सर, श्री जोगदंड सर, पडघान मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.